दोन स्वतंत्र आणि तर्कदृष्ट्य एकमेकांनी अबाधित अशी तत्त्वे मानणारी एक तात्त्विक भूमिका. उदा., ग्रीक तत्त्वज्ञांनी मानलेली आभास आणि सत्य; तसेच आत्मा आणि शरीर इंद्रियांच्या द्वारे अनुभवास येणारे आणि बुद्धीच्या द्वारे अनुभवास येणारे. अशी वास्तवाची दोन दोन रूपे ही द्वये. फ्रेंच तत्त्वज्ञ रने देकार्त ह्यानेही विश्वात दोन भिन्न स्वरूपांची द्रव्ये आहेत, असे मानले आहे. उदा., जाणीव हे ज्यांच्या स्वरूपाचे सार आहे, अशी मने आणि विस्तार हे ज्यांच्या स्वरूपाचे सार आहे, असे जडद्रव्य. भारतीय दर्शनांपैकी सांख्य दर्शनाने प्रकृती आणि चुकब ही दोन स्वतंत्र तत्त्वे स्वीकारली. पैकी प्रकृती हे अचेतन पण क्रियाशील, परिणामशील तत्त्व असून चुकब हे चेतन पण निष्क्रिय व अपरिणामी तत्त्व आहे. प्रकृती आणि चुकब यांच्या संयोगातून हा सृष्टीचा पसारा निर्माण झाला असून या तत्त्वांमधील वेगळेपणाचे ज्ञान झाल्यास कैवल्य म्हणजे मोक्ष मिळतो, असे त्यांनी मानले. मध्वाचार्यांचे वेदान्त मतही द्वैत वेदान्त म्हणून प्रसिद्ध असून त्यात ईश्वर, जीव व जणत् यांच्यातील वेगळेपणावर भर दिला आहे.
ह्या विश्वात परस्पविरूद्ध अशी दोन तत्त्वे असून त्यांच्यातील संघर्ष हाच सृष्टिव्यवहार होय, असा विचार बहुतेक प्रमुख धर्मांत मांडलेला आढळतो. त्याला धर्ममूलक सद्वयवाद असे म्हणता येईल. पारशी धर्मात अहुर मज्द (पूजनीय आणि एकमेवाद्वितीय असा ईश्वर) आणि अंग्रो-मइन्यु किंवा अहरिमन (पाशवी प्रवृत्तीचे मूर्त स्वरूप) अशा दोन शक्ती मानलेल्या दिसतात. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मांत ईश्वर आणि सैतान ह्यांचा संघर्ष मानलेला आहे. ज्याप्रमाणे विश्वात, त्याचप्रमाणे माणसांच्या मनांत ह्या शक्तींचा संघर्ष चालू असतो. पापाकडे नेण्याऱ्या शक्तींना बळी न पडता, कोणतेही कष्ट सोसून सन्मार्गाने जाण्यात मानवी जीवनाची परिपूर्ती आहे, असे ह्या सर्व धर्मांनी मानलेले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जीवशास्त्रीय संशोधनानंतर शरीर आणि मन ह्या द्वयाच्या संदर्भात दोन महत्त्वाचे सिद्धान्त मांडले गेले. एक, समांतरतेचा आणि दुसरा, परस्पराघाताचा. समांतरतेच्या सिद्धान्ताप्रमाणे प्राण्यांचे शरीर आणि त्यांचे मन ह्यांच्या क्रिया वेगवेगळ्या असून त्यांचे कार्य एकमेकांच्या आड न येता समांतरपणे चालते. उदा., कितीही सूक्ष्म साधनांच्या साहाय्याने मज्जातंतूंची तपासणी केली, तरी तिथे विचार आणि भावना गवसणार नाहीत. शरीराचे कार्य स्वतंत्रपणे चालू असते, तसे मनाचेही चालू असते.
ह्या सिद्धान्तावर बरेच आक्षेप घेतले जातात. शरीर आणि मन ह्यांच्या क्रिया समांतरपणे चालत असल्यास त्यांची एकतानता कशी साधली जाते? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रश्नांची नीटशी उत्तरे देता येत नसल्यामुळे काही शास्त्रज्ञ दुसरा सिद्धान्त खरा मानतात. ह्या सिद्धान्ताप्रमाणे शरीर आणि मन ह्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. शरीर हे इंद्रियांच्या द्वारा संवेदनारूपाने बाह्यसृष्टीविषयी माहिती मनाला पुरवते आणि मन मज्जातंतूतल्या पेशींद्वारा ह्या संवेदनांचा अर्थ लावून योग्य त्या प्रतिक्रिया निर्माण करते. ज्ञानमीमांसेच्या दृष्टीने हा परस्परघाताचा सिद्धान्त अधिक मान्य झाला आहे.
शरीरात मनाची चेतना कुठे केंद्रित झाली असेल, ह्याविषयीचे तर्क देकार्तच्या काळापासून सुरू आहेत. देकार्तला स्वत:ला मेंदूच्या मध्यात असलेली पिनीअस ग्रंथी ही मनाच्या शक्तीचे केंद्र वाटले, तर जर्मन तत्त्वज्ञ व जीववैज्ञानिक हान्स ड्रीश ह्या जीवशास्त्रज्ञाने शरीर आणि मन ह्यांच्या दरम्यान ‘एंटेलेशी’ (Entelechy) नावाचे एक तत्त्व मानले.
https://www.youtube.com/watch?v=VmNHLlQzdCw
संदर्भ :
- Baker, Gordon; Morris, Katherine J. Descartes’ Dualism, London 1996.
- Broad, C. D. Mind and Its Place in Nature, London 1962.
- Campbell, Keith, Body and Mind, New Jersey, 1970.
- Chalmers, David J. The Conscious Mind : In Search of a Fundamental Theory, Oxford, 1996.
- Churchland, Paul, Matter and Consciousness, Revised Edition, Cambridge, 1988.
- Descartes, Rene; Cress, Donald A. Trans. Discourse on Method and Meditations on First Philosophy, Indianapolis, 1980.
- Dicker, Georges, Descartes : An Analytical and Historical Introduction, Oxford, 1993.
- Garber, Daniel, Descartes Embodied : Reading Cartesian Philosophy through Cartesian Science, Cambridge, 2001.
- Hirianna, M. Outlines of Indian Philosophy, London, 1948.
- Kant, Immanuel; Smith, Norman Kemp, Trans. Critique of Pure Reason, London, 1963.
- Kim, Jaegwon, Philosophy of Mind, Boulder, 1996.
- Madell, G. The Identity of the Self, Edinburgh, 1983.
- Pratt, J. B. Matter and Spirit, New York, 1922.
- Wisdom, John, Problems of Mind and Matter, Cambridge, 1934.