माईश्चर, जोहान्स  फ्रेडरिक : ( १३ ऑगस्ट १८४४ –  २६ ऑगस्ट १८९५ )

जोहान्स फ्रेडरिक माईश्चर यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील बासेल येथे झाला. माईश्चर यांनी १८६९ मध्ये जर्मनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ टूबिंगेनमधील (Tübingen) फेलिक्स हाप्पे – सेंलरस लॅबोरेटरी (Felix Hoppe-Seyler’s Laboratory) मध्ये पांढऱ्या रक्तकोशिकांच्या केंद्रकापासून पासून विविध फॉस्फेटयुक्त रसायने शोधून काढली. त्यालाच त्यांनी न्यूक्लेईन (आता न्यूक्लेइक आम्ल, Nucleic Acids) असे नाव दिले. डीएनए हे अनुवांशिकतेचे वाहक म्हणून ओळखण्यात आले. त्यांनी केलेल्या संशोधनाचा पहिला भाग १८७१ मध्ये प्रकाशित करण्यात आला, मात्र तो पूर्ण स्पष्टपणे सांगण्यात आला नाही आणि त्यानंतर अल्ब्रेख्त कोसील (Albrecht Kossel) यांनी सुरुवातीच्या रासायनिक रचनांमध्ये संशोधन केले. त्यानंतर माईश्चर यांना नवीन संकल्पना समजली की न्यूक्लेइक आम्ल हे अनुवंशिकतेमध्ये सहभागी होऊ. माईश्चर हे वैज्ञानिक परिवारातून आले होते. त्यांचे वडील आणि काका हे युनिव्हर्सिटी ऑफ बासेल (Basel) मध्ये पदाधिकारी होते. माईश्चर यांनी औषधशास्त्राचे  शिक्षण बासेलमध्येच घेतले. फ्राईड्रीक यांनी गोटींजेन (Göttingen) येथे सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ ॲडोल्फ स्टेकेर (Adolf Stecker) यांच्याबरोबर काम केले. माईश्चर यांनी जरी एम.डी. (M.D.) हे वैद्यकीचे शिक्षण पूर्ण केले तरी त्यांना असे वाटले की त्यांना असलेले थोडे बहिरेपण हे डॉक्टर या पदासाठी गैरसोयीचे आहे म्हणून ते भौतिकी-रसायनशास्त्राकडे वळले. त्यांना लिम्फोसाईटस (Lymphocytes) या पेशींचा अभ्यास करायचा होता. मात्र फेलिक्स होप्पे सेंलरस यांच्या प्रोत्साहनामुळे ते न्यूट्रोफिल्स (Neutrophils) या पेशींच्या अभ्यासाकडे वळले. आता न्यूट्रोफिल्स या पेशी पू (पस) मधील महत्त्वाचा घटक मानला जातात.

माईश्चर यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या क्षार द्रवाने (Salt Solution) बनविली त्यापैकी एक सोडियम सल्फेट हे होते त्यावेळेस पेशीला फिल्टर करण्यासाठी वापरले जात असे. कारण सेंट्रिफ्यूज हे उपकरण त्या वेळी उपलब्ध नव्हते. पेशीला स्थिर होण्यासाठी एका काच पात्रात ठेवले जात होते. त्यानंतर माईश्चर यांनी पेशीद्रावामधून (सायटोप्लाझम) मधून केंद्रक वेगळा केला. त्यानंतर त्या केंद्रकाला शुद्ध केले. त्याचा अल्कलाईन (Alkaline Extraction) अर्क काढला. त्यापासून त्यांना पावडर तयार झाल्याचे दिसून आले. त्यालाच न्यूक्लीन (nuclein) असे म्हणतात. आज त्यालाच डीएनए म्हणून संबोधले जाते. डीएनए हे  फॉस्फरस आणि नायट्रोजनचे बनलेले असते असे त्याला आढळून आले.

माईश्चर यांनी त्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या पेशी लसिकार्बुदांमधून (Lymph Nodes) वेगळ्या केल्या. परंतु लसिकार्बुदांचे शुद्धीकरण करणे कठीण होते. हाप्पे सेंलरसच्या मार्गदर्शनानुसार माईश्चर यांनी पांढऱ्या पेशींचे परिक्षण करणे सोडले आणि त्यांनी त्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्यापेशी पू (pus) मधून मिळविण्याचे ठरवले.

माईश्चर यांनी सर्व प्रथम पांढऱ्या पेशी बनविण्यात मदत करणाऱ्या विविध प्रथिनांचा अभ्यास केला. त्यानुसार पेशींचे कार्य कसे होते आणि प्रथिने हे पेशीचा महत्त्वाचा घटक असतात हे सिद्ध केले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे