या पुरस्काराचे संपूर्ण नाव ‘राष्ट्रीय तानसेन सम्मान’ असे आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील हा एक मानाचा पुरस्कार असून तो मध्यप्रदेश शासनाकडून दिला जातो. भारतीय संगीतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तानसेन यांच्या नावाने या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. मध्यप्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा उद्देश लोकांमध्ये पारंपरिक भारतीय शास्त्रीय संगीताप्रती आवड निर्माण करणे व या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कलेचा सन्मान करणे हा आहे. या पुरस्काराची सुरुवात १९८० मध्ये झाली असून प्रामुख्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे सुरुवातीचे स्वरूप दोन लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढवून ती पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशामध्ये ग्वाल्हेर येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या तानसेन संगीत महोत्सवात देशविदेशातील गायक, वादक आपल्या कलेचे सादरीकरण करतात. हा महोत्सव चार ते पाच दिवस चालतो. या महोत्सवामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो.

हा पुरस्कार भारतीय संगीत क्षेत्रामध्ये मानाचा समजला जातो. या पुरस्काराने आतापर्यंत पुढील कलाकारांना गौरविण्यात आले आहे.

अ. क्र. सन्मानित कलाकारांचे नाव वर्ष अ. क्र. सन्मानित कलाकारांचे नाव वर्ष
कृष्णराव शंकर पंडित १९८० हिराबाई बडोदेकर १९८०
बिस्मिल्ला खाँ १९८० रामचतुर मलिक १९८१
नारायणराव व्यास १९८२ दिलीपचंद्र बेदी १९८२
निसार हुसेन खाँ १९८२ ठाकूर जयदेव सिंह १९८३
बी. आर. देवधर १९८३ १० गंगूबाई हनगळ १९८४
११ खादिम हुसेन खाँ १९८४ १२ गजाननराव जोशी १९८५
१३ असगरीबाई १९८५ १४ निवृत्तीबुवा सरनाईक १९८६
१५ मुश्ताक अली १९८७ १६ फिरोज दस्तूर १९८८
१७ मोगूबाई कुर्डीकर १९८९ १८ नसीर अमीउद्दीन डागर १९९०
१९ भीमसेन जोशी १९९१ २० रामराव नायर १९९२
२१ शरदचंद्र अरोलकर १९९२ २२ जिया फरीदुद्दीन डागर १९९३
२३ एस. सी. आर. भट १९९३ २४ असद अली खाँ १९९४
२५ राजा छत्रपती सिंह १९९५ २६ ज्ञानप्रकाश घोष १९९५
२७ गिरिजादेवी १९९६ २८ हनुमान प्रसाद मिश्र १९९७
२९ बाळासाहेब पूँछवाले १९९७ ३० सियाराम तिवारी १९९८
३१ सी. आर. व्यास १९९९ ३२ अब्दुल हलीम जाफर खाँ २०००
३३ अमजद अली खाँ २००१ ३४ नियाज अहमद खाँ २००२
३५ दिनकर कायकिणी २००३ ३६ शिवकुमार शर्मा २००४
३७ मालिनी राजूरकर २००५ ३८ सुलोचना बृहस्पती २००६
३९ गोस्वामी गोकुलोत्सवजी महाराज २००७ ४० गुलाम मुस्तफा खाँ २००८
४१ अजय पोहनकर २००९ ४२ सविता देवी २०१०
४३ राजन व साजन मिश्र २०११ ४४ प्रभाकर कारेकर २०१२
४५ विश्वमोहन भट्ट २०१३ ४६ अजय चक्रवर्ती २०१४
४७ कृष्णराव शंकर पंडित २०१५ ४८ डालचंद शर्मा २०१६
४९ उल्हास कशाळकर २०१७ ५० मंजू मेहता २०१८
५१ विद्याधर व्यास २०१९ ५२ सतीश व्यास २०२०
५३ नित्यानंद हळदीपूर २०२१ ५४ गणपती भट्ट-हसणगि २०२२