ख्रिस्ती धर्मदूत व येशू ख्रिस्तांचे मुख्य बारा संदेष्टे. ‘अपॉस्टॉलस’ या ग्रीक शब्दावरून ‘अपॉसल’ ही संज्ञा आली असून तिचा अर्थ ‘पाठविलेली व्यक्ती’ असा होतो. ‘अपॉसल’ म्हणजे प्रेषित नव्हे (ख्रिस्ती लोक सर्व भारतीय भाषांतून ‘अपॉसल’साठी ‘प्रेषित’ ही संज्ञा वापरतात). ‘शिष्य’ हा शब्द शिकणार्‍याचा अथवा अनुयायाचा उल्लेख करतो. ‘प्रेषित’ म्हणजे “ज्याला पाठविण्यात आले आहे” असे. येशू ख्रिस्तांनी निवडलेले बारा शिष्य त्यांचे अनुसरण करीत; ते त्यांच्यापासून शिकले व प्रशिक्षण घेतले. या बारा शिष्यांकडे सुवार्ता पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली. ‘नव्या करारा’च्या पाचव्या पुस्तकात मूळ बारांखेरीज पॉलप्रभृती इतर शिष्यांनाही अपॉसल्स संबोधण्यात आले. शेवटी पाचव्या शतकात चर्चचे मुख्याधिकारी बिशप यांनाही अपॉसल म्हणण्यापर्यंत या शब्दाचा अर्थ ताणला गेला. मूळ बारा अपॉसल्सपुरताच तो मर्यादित ठेवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.

‘बायबल’ मत्तय १०:२-४ ह्या वचनांत मूळ शिष्यांची/प्रेषितांची यादी मांडली आहे. तसेच ‘बायबल’ मार्क ३:१३–१६ आणि लूक ६:१३–१६ या वचनांत देखील शिष्यांची/प्रेषितांची यादी मांडली आहे. त्या बारा शिष्यांची/प्रेषितांची नावे अशी : सेंट पीटर, सेंट अँड्र्यू, सेंट जेम्स, सेंट जॉन, सेंट फिलिप, सेंट बार्थोलोम्यू, सेंट थॉमस, सेंट मॅथ्यू, सेंट जेम्स, सेंट सायमन, सेंट थडीअस, सेंट यहुदा इस्कर्योत.

  • सेंट पीटर : (शिमोन, पेत्र, केफा, खडक ही दिलेली नावे). केफास (अरामी), आणि ‘गालीलमधील’ बेथसैदा येथील एक कोळी.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.