(प्रस्तावना)

पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | विषयपालक : नागोराव कुंभार | समन्वयक : शकुंतला गावडे | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम

मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

अथेना (Athena)

अथेना (Athena)

ग्रीक साम्राज्यात अथेनाला अथेन्स शहराची पालकदेवता मानले गेले. तिच्या नावाचे उगमस्थान कदाचित हेच असू शकेल. अथेना ही ग्रीक युद्धदेवता. कालांतराने ...
अपोलो (Apollo)

अपोलो (Apollo)

अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो झ्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र ...
आमेनतेत (Amentet)

आमेनतेत (Amentet)

प्राचीन ईजिप्शियन मृतात्म्यांशी संबंधित देवता. आकेन ह्या देवाची ती पत्नी असून आमेन्त, आमेन्तित, इमेन्तित किंवा इमेन्तेत अशा अन्य नावांनीही ती ...

ईआबेत (Iabet)

एक प्राचीन ईजिप्शियन गौण देवता. पूर्वेकडील वाळवंटातील रहिवासी असून ती सुफलन व पुनर्जन्माची देवता होय. पूर्व दिशेच्या भूमीचे हे मानवीकरण ...

ऑर्गनन (Organon)

विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलने तर्कशास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथांचा संग्रह. ॲरिस्टॉटलने अनुभववादाचा (Empiricism) पाया घातला. तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करताना त्याने तर्कशास्त्राचा पाया ...
ओरायन (Orion)

ओरायन (Orion)

ग्रीक मिथकांनुसार ओरायन हा एक अत्यंत भव्य शिकारी देवता होता. ओरायनविषयी अनेक मिथककथा आहेत. त्यांपैकी त्याच्या जन्माविषयीच्या दोन आणि मृत्यूविषयीच्या ...
ओसायरिस (Osiris)

ओसायरिस (Osiris)

प्राचीन ईजिप्तमधील सर्वश्रेष्ठ देव. तो असर, असीर, ओसीर किंवा उसीर (अर्थबलशाली) ह्या नावांनी ओळखला जात असे. ईजीप्शियन देवता : ओसायरिस ...
केत्सालकोआत्ल (Quetzalcoatl)

केत्सालकोआत्ल (Quetzalcoatl)

केत्सालकोआत्ल (Quetzalcoatl – क्वेत्झलकोएत्ल) : मेक्सिको खोर्‍यातील ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता व पौरोहित्य राजा. त्याच्यासंबंधी पुरातनकालीन मिथ्यकथा, आख्यायिका, दंतकथा ...
झरथुष्ट्र (Zarathushtra)

झरथुष्ट्र (Zarathushtra)

झोरोॲस्टर (ग्रीक उच्चार) : पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्राच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. तथापि अवेस्ता या धर्मग्रंथाच्या आधुनिक संशोधनावरून ...
डायना (Diana)

डायना (Diana)

रोमन देवतासमूहातील एक ख्यातकीर्त स्त्रीदेवता. मूळात ती एक वनदेवता मानली जाई. ती चंद्र आणि मृगया यांची देवता असून ग्रीक देवता ...

डी ॲनिमा (De Anima)

विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ. मूळ ग्रीक ग्रंथाचे हे लॅटिन नाव असून यामध्ये त्याने सजीव-सृष्टीच्या गुणांबद्दलचे ...
तेझ्कात्लिपोका (Tezcatlipoca)

तेझ्कात्लिपोका (Tezcatlipoca)

ही ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता आहे. तेझ्कात्लिपोका ह्या नावाचा अर्थ धूर सोडणारा किंवा चमकणारा आरसा असा होतो. त्यास सूर्याची ...
पर्सेफोनी (Persephone)

पर्सेफोनी (Persephone)

एक ग्रीक देवता. ही झ्यूस आणि डीमीटर यांची अतिशय सुंदर आणि एकुलती एक मुलगी असून हेडीसनामक पाताळातील देवाची ती पत्नी ...
मंजुश्री (Manjushri)

मंजुश्री (Manjushri)

महायान बौद्ध पंथातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध बोधिसत्त्व. पूर्वोत्तर आशियातील देशांमध्ये त्याच्या उपासनेमुळे ज्ञान, चातुर्य, स्मरणशक्ती, बद्धी आणि वक्तृत्व प्राप्त ...

लाओ-त्झू (Lao-tzu)

लाओ-त्झू : (इ. स. पू. सु. ६०४ — इ. स. पू. सु. ५३१). चिनी तत्त्वज्ञानातील महान आचार्य. लाव् ज या ...

वीरकोचा (Viracocha)

वीरकोचा हा पेरू देशातील अ‍ॅंडीज पर्वतप्रदेशातील संस्कृतीतील श्रेष्ठ देव आहे. तसेच इंका संस्कृतीच्या देवतासमूहातीलही हा अत्यंत  महत्त्वाचा श्रेष्ठ देव. त्याच्या नावाचा अर्थ ...

सर्वोदय श्रमदान चळवळ (Sarvodaya Shramadan Movement)

सर्वोदय श्रमदान चळवळ, श्रीलंकेतील  : सामूहिक श्रमदानातून ग्रामस्वराज्य साकारू शकते यावर विश्वास ठेवणारी चळवळ. महात्मा गांधींचे विचार व बौध्द तत्त्वज्ञान यांची ...
सुलक सिवरक्स (Sulak Sivaraksa)

सुलक सिवरक्स (Sulak Sivaraksa)

अझान सुलक सिवरक्स : (२७ मार्च १९३३). थायलंडमधील सुप्रसिद्ध बौद्ध धर्मीय लेखक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक व आर्थिक स्तरावर चिरस्थायी बदल घडण्याकरिता ...
हर्मिस (Hermes)

हर्मिस (Hermes)

ग्रीक मिथकशास्त्रातील १२ ऑलिम्पिअन्सपैकी हर्मिस ही दुसरी कनिष्ठ देवता होय. झ्यूस आणि मायाचा हा मुलगा ‘देवतांचा दूत’ म्हणून प्रख्यात आहे ...
हेडीस (Hades)

हेडीस (Hades)

ग्रीक मिथकशास्त्रानुसार हेडीस हा पाताळभूमीचा देव असून तो ख्रोनोस आणि रिया यांचा मुलगा तसेच झ्यूस याचा भाऊ आहे. डीमीटरची अतिशय ...
Close Menu