
ग्रीक पुराणकथांमधील एक मर्त्य राजकन्या, देवांचा राजा झ्यूस याची पत्नी व हर्क्यूलीझ (हेराक्लीझ) याची माता. ती मायसीनीचा राजा इलेक्ट्रीअन याची मुलगी आणि आर्गोसची राणी होती. ती सौंदर्य, सद्गुण आणि पतिव्रतेसाठी ओळखली जाते. तिचा विवाह थीब्झ प्रदेशातील एक शूर योद्धा अँफिट्रिऑन याच्याशी झाला. तिला वीरमाता, पूजनीय स्त्री किंवा दैवी मातृत्वाचे प्रतीक मानले गेले. काही प्राचीन ग्रीक प्रदेशांत तिच्या स्मृतीपूजाही होत असत. अल्कमेनी ही हर्क्यूलीझ याची आई असल्यामुळे तिला ‘वीरमाता’ असा विशेष सन्मान प्राप्त झाला. त्यामुळे काही लोक तिला देवता समजतात; परंतु ती मानवी-स्त्री असून, नंतर तिला मूळ ग्रीक परंपरेत दैवी सन्मान मिळाल्याचे वर्णन येते. ती केवळ वीरमातेच्या भूमिकेत मर्यादित नसून, देव-मानव संबंध, स्त्रीची प्रतिष्ठा, नियती आणि दैवी हस्तक्षेप यांचे प्रतीक म्हणूनही तिच्याकडे पाहिली जाते.
संदर्भ :
- Graves, Robert, The Greek Myths, London, 1955.
- Pinsent, John, Greek Mythology, Oxford, 1982.
समीक्षक : आनंद गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
