मानवारोपवाद (Anthropomorphism)

धर्म, मानवशास्त्र, मानसशास्त्र आणि वाङ्‌मयाचा अभ्यास यांत वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण संज्ञा. मूळ ‘अँथ्रोपॉमॉर्फिझम’ ह्या ग्रीक संज्ञेसाठी ‘मानवारोपवाद’ ही मराठी संज्ञा. मूळ ग्रीक शब्द ‘अँथ्रोपॉस’ म्हणजे मानव आणि ‘मॉर्फी’ म्हणजे…

चराचरेश्वरवाद (Pantheism)

धर्म-तत्त्वज्ञानातील एक उपपत्ती. चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. देवाहून चराचर भिन्न नाही, असे मानणारा चराचरेश्वरवाद वा विश्वात्मक देववाद. या उपपत्तीला इंग्रजीत ‘पॅनथिइझम’ अशी…

ड्रुइड (Druid)

गॉल (सध्याचा फ्रान्स), ब्रिटन आणि आयर्लंड यांमधील प्राचीन केल्ट लोकांच्या धर्मगुरूंना वा पुरोहित वर्गाला अनुलक्षून ‘ड्रुइड’ ही संज्ञा लावली जाते. ‘ड्रुइ’ या प्राचीन आयरिश एकवचनाचे ‘ड्रुइड’ हे अनेकवचन आहे. ड्रुइडांबाबत…

मुहमंद इकबाल (Muhammad Iqbal)

इक्‌बाल : (२२ फेब्रुवारी १८७३–२१ एप्रिल १९३८). सर मुहंमद इक्‌बाल हे उर्दूचे व फार्सीचे एक थोर कवी व विचारवंत होते. ‘इक्‌बाल’ हे त्यांचे कविनाम. त्यांचे पूर्वज काश्मीरी ब्राह्मण होते. इक्‌बाल…

चाल्हण (Chalhan)

चाल्हण: (पंधरावे शतक). एक महानुभाव ग्रंथकार, चाल्हण पंडित, 'चाल्हेराज' ह्या नावांनीही तो ओळखला जातो. तो कवीश्वर आम्नायात होता. चक्रधर ~ नागदेव~ कवीश्वर~ नागांबा~ कमळाकर ~ सीतांबा ~ चाल्हण अशी त्याची…

डेसिडेरिअस इरॅस्मस (Desiderius Erasmus)

इरॅस्मस, डेसिडेरिअस : ( २८ ऑक्टोबर १४६६—१२ जुलै १५३६ ). प्रबोधनकाळातील एक डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक. त्यांचा जन्म रॉटरडॅम (नेदर्लंड्स) येथे आणि शिक्षण गौडा, डेव्हेंटर व सेटॉखेन्बॉस येथे झाले.…

आगाखान (Aga Khan)

इस्लाम धर्माच्या शिया पंथातील निझारी इस्माइली हा एक उपपंथ असून त्याच्या प्रमुखास ‘आगाखान’ (‘अगा खान’, ‘अधा खान’, ‘आकाखान’ असेही पर्याय आहेत) ही पदवी लावण्यात येते. खोजा नावाने ओळखली जाणारी जातही…

सर आयझेया बर्लिन (Sir Isaiah Berlin)

बर्लिन, सर आयझेया : ( ६ जून १९०९ - ५ नोव्हेंबर १९९७ ). ब्रिटिश विचारवंत व तत्त्वज्ञ. जन्म रशियातील रीगा, लॅटव्हिया येथे. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या पालकांसमवेत इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक…

इब्न सीना (Ibn Sina)

इब्‍न सीना : (९८०–१०३७). एक अरबी तत्त्वज्ञ व वैद्यकवेत्ते. पूर्ण नाव अबुल अली अल्-हुसेन इब्‍न अब्दल्ला इब्‍न सीना. त्यांचे लॅटिन नाव ‘ॲव्हिसेना’ (Avicenna). मुसलमानांमध्ये त्यांना ‘अल्‌-शेख अल्-रईस’ (विद्वानांचा राजा) मानतात.…

जत्रा (Fair)

एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे…

आजीवक (Ajivika)

भारतातील एक प्राचीन धर्मपंथ. ‘आजीविक’ असेही त्याचे नाव आढळते. हा पंथ आज अस्तित्वात नाही. तो नामशेष होण्यापूर्वी त्याला सु. २,००० वर्षांचा इतिहास आहे. मंखलीपुत्र गोशालापूर्वी ११७ वर्षे आधी या पंथाची…

अभाव (Non-Being / Nothingness)

तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. 'अभाव' याचा अर्थ 'नसणे', 'अस्तित्वात नसणे' (न+भाव=अभाव) असा होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात अभावाची कल्पना ‘निगेशन’, ‘नॉन्-बीइंग’, किंवा ‘नॉन्-एक्झिस्टन्स’ ह्या संज्ञांनी व्यक्त केली जाते. ‘भाव’ आणि ‘अभाव’ ह्या संज्ञांना…

शिवकल्याण (Shivkalyan)

शिवकल्याण : (सु. १५६८–१६३८). मराठी संतकवी. मराठवाड्यातील आंबेजोगाई हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. हे घराणे नाथसंप्रदायी आणि विठ्ठलभक्त होते. शिवकल्याणांनी नित्यानंदैक्यदीपिका ह्या ग्रंथात आदिनाथापासून सुरू असलेली आपली गुरुपरंपरा सांगितली असून,…