चाल्हण: (पंधरावे शतक). एक महानुभाव ग्रंथकार, चाल्हण पंडित, ‘चाल्हेराज’ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. तो कवीश्वर आम्नायात होता. चक्रधर ~ नागदेव~ कवीश्वर~ नागांबा~ कमळाकर ~ सीतांबा ~ चाल्हण अशी त्याची गुरूपरंपरा असावी. सत्त्वानुवाद, ज्ञानप्रकाश आणि शास्त्रसंबोधिनीटीका असे त्याचे तीन ग्रंथ आहेत. चाल्हणाचा शिष्यपरिवार मोठा होता. तो स्वत:च्या ग्रंथापेक्षा त्याचा एक शिष्यनृसिंह पंडित ह्याने त्याच्या नावावर लिहिलेल्या संकेतगीता  ह्या गीता-टीकेमुळे विशेष प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांबरोबर त्या पंथाबाहेरील ग्रंथकारांनी गीतेवर लिहिलेल्या विविध टीकांचा उल्लेख नृसिंह पंडिताने संकेतगीतेस केलेला आहे, हे विशेष होय.

संदर्भ :

  • नागराजबाबा महानुभाव (संंपा), विदेह प्रबोध, राऊळ प्रकाशन, औरंगाबाद.