ख्रिस्ती धर्मपंथ (Christian Cult)
येशू ख्रिस्त यांच्या व्यक्तिमत्त्वात व शिकवणीत ख्रिस्ती धर्म केंद्रित झाला आहे. ख्रिस्ती धर्मातील पंथोपपंथांचे पुढीलप्रमाणे तीन मुख्य विभाग आहेत : (१) रोमन कॅथलिक चर्च, (२) ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च (बिझंटाईन/बायझंटिन संस्कृतीशी…