(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
सध्या ‘अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी)’ ही तंत्रज्ञानाची एक महत्त्वाची स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा पारंपरिक विषयांच्या तुलनेत अब्जांश तंत्रज्ञानाचा उदय तसेच विकास हा गेल्या काही दशकांतील असला तरी त्याचा विकास मात्र झपाट्याने होत आहे. या विषयाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी, त्याचा पायाबद्ध विकास आणि त्याद्वारे समाजाला उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची निर्मिती यासाठी मानवाला विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत वाट पहावी लागली.

भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रिचर्ड फेनमन (Richard Feynman) यांनी त्यांच्या १९५९ मधील भाषणात “देअर इज अ प्लेंटी ऑफ रूम अॅट द बॉटम ” ही संकल्पना मांडली. त्यांनी शास्त्रज्ञांना असे आवाहन केले की, त्यांनी निसर्गाच्या कार्यपद्धतीचे तंत्रज्ञान समजून घेऊन त्यातून जे ज्ञान मिळेल त्याचा उपयोग करून लहानात लहान आकाराचे पदार्थ बनवावेत व त्यापासून विविध यंत्रे आणि उपकरणांची निर्मिती करावी. १९७४ साली ‘नॅनो-टेक्नॉलॉजी’ ही संज्ञा सर्वप्रथम नोरिओ तानिगुची (Norio Taniguchi) यांनी वापरली. नॅनो-टेक्नॉलॉजी या शब्दातील नॅनो हा शब्द nanos या ग्रीक शब्दावरून आला असून त्याचा अर्थ ‘खुजा किंवा छोटा’ असा होतो. कोणत्याही पदार्थाची मिती (लांबी, रुंदी अथवा उंची) मोजण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर अशा एककांचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे अणू,रेणू किंवा त्याहूनही लहान गोष्टींची मिती मोजण्यासाठी नॅनोमीटर (अब्जांश मीटर) या एककाचा वापर केला जातो. एक नॅनोमीटर (नॅमी.) म्हणजेच १/१ अब्ज मीटर. म्हणजेच १ मीटर लांबीच्या तुकड्याचे १ अब्ज समान तुकडे केल्यास त्यातील एका तुकड्याची लांबी एक नॅनोमीटर इतकी असेल. ज्या पदार्थकणांची मिती अंदाजे ०.१ ते १०० नॅमी. असते अशा कणांपासून विविध प्रकारचे पदार्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केले जातात. अशा पदार्थांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याचा विषय म्हणजे ‘अब्जांश विज्ञान (Nanoscience)’ आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान म्हणजेच ‘अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology)’ होय.

अब्जांश तंत्रज्ञान या ज्ञानशाखेला संगणकशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, जैवइंधन, जैवतंत्रज्ञान, कृषिविज्ञान, ऊर्जानिर्मिती, सौरऊर्जा अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये महत्त्व निर्माण झाले आहे. या ज्ञानशाखेच्या आधारे ही क्षेत्रे अधिकाधिक विस्तार पावत आहेत. अब्जांश तंत्रज्ञान ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखेचे महत्त्व सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रयत्न आहे.

मेटामटेरिअल्स (Metamaterials)

मेटामटेरिअल्स

नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या अब्जांश पदार्थामध्ये जे गुणधर्म मुळीच आढळत नाही असे ‘कल्पनाशक्तीच्या पलीकडचे’ गुणधर्म असलेल्या अब्जांश पदार्थांची निर्मिती करण्यात वैज्ञानिकांनी ...
मॉलिब्डेनम डायसल्फाइड अब्जांश कण (Molybdenum Disulphide Nanoparticles)

मॉलिब्डेनम डायसल्फाइड अब्जांश कण 

अब्जांश पदार्थ स्वरूपातील मॉलिब्डेनम डायसल्फाइड या पदार्थाचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व सातत्त्याने वाढत आहे. हा गर्दकाळसर-राखट रंगाचा चमकदार असेंद्रिय पदार्थ आहे ...
वनस्पती आधारित अब्जांश कण निर्मिती (Plant based synthesis of nanoparticles)

वनस्पती आधारित अब्जांश कण निर्मिती

विविध धातूंच्या अब्जांश कणांचा वापर वैद्यकीय, औषध निर्माण, अभियांत्रिकी, कृषीउद्योग, पर्यावरण इत्यादी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर केला जातो. ह्यासाठी विविध प्रकारच्या ...
विकरांचे अचलीकरण (Immobilization of Enzymes)

विकरांचे अचलीकरण 

सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी यांमधील सर्व जीवनावश्यक प्रक्रियांमध्ये विकर (Enzymes) संप्रेरकाचे (Catalyst) काम करतात. या जैवसंप्रेरकांची (Biocatalyst) सहज उपलब्धता, सोप्या ...
सोन्याचे अब्जांश कण (Gold Nanoparticles)

सोन्याचे अब्जांश कण

विविध धातूंपासून अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण केलेल्या अब्जांश कणांचे अनेक उपयोग आहेत. विशेषत: सोन्याच्या अब्जांश कणांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स, फोटॉनिक्स, जैव-वैद्यकशास्त्र आणि इतर ...
Loading...