(प्रस्तावना) पालकसंस्था : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड | समन्वयक : वसंत वाघ | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
सध्या ‘अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी)’ ही तंत्रज्ञानाची एक महत्त्वाची स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा पारंपरिक विषयांच्या तुलनेत अब्जांश तंत्रज्ञानाचा उदय तसेच विकास हा गेल्या काही दशकांतील असला तरी त्याचा विकास मात्र झपाट्याने होत आहे. या विषयाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी, त्याचा पायाबद्ध विकास आणि त्याद्वारे समाजाला उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची निर्मिती यासाठी मानवाला विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत वाट पहावी लागली.

भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रिचर्ड फेनमन (Richard Feynman) यांनी त्यांच्या १९५९ मधील भाषणात “देअर इज अ प्लेंटी ऑफ रूम अॅट द बॉटम ” ही संकल्पना मांडली. त्यांनी शास्त्रज्ञांना असे आवाहन केले की, त्यांनी निसर्गाच्या कार्यपद्धतीचे तंत्रज्ञान समजून घेऊन त्यातून जे ज्ञान मिळेल त्याचा उपयोग करून लहानात लहान आकाराचे पदार्थ बनवावेत व त्यापासून विविध यंत्रे आणि उपकरणांची निर्मिती करावी. १९७४ साली ‘नॅनो-टेक्नॉलॉजी’ ही संज्ञा सर्वप्रथम नोरिओ तानिगुची (Norio Taniguchi) यांनी वापरली. नॅनो-टेक्नॉलॉजी या शब्दातील नॅनो हा शब्द nanos या ग्रीक शब्दावरून आला असून त्याचा अर्थ ‘खुजा किंवा छोटा’ असा होतो. कोणत्याही पदार्थाची मिती (लांबी, रुंदी अथवा उंची) मोजण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर अशा एककांचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे अणू,रेणू किंवा त्याहूनही लहान गोष्टींची मिती मोजण्यासाठी नॅनोमीटर (अब्जांश मीटर) या एककाचा वापर केला जातो. एक नॅनोमीटर (नॅमी.) म्हणजेच १/१ अब्ज मीटर. म्हणजेच १ मीटर लांबीच्या तुकड्याचे १ अब्ज समान तुकडे केल्यास त्यातील एका तुकड्याची लांबी एक नॅनोमीटर इतकी असेल. ज्या पदार्थकणांची मिती अंदाजे ०.१ ते १०० नॅमी. असते अशा कणांपासून विविध प्रकारचे पदार्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केले जातात. अशा पदार्थांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याचा विषय म्हणजे ‘अब्जांश विज्ञान (Nanoscience)’ आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान म्हणजेच ‘अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology)’ होय.

अब्जांश तंत्रज्ञान या ज्ञानशाखेला संगणकशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, जैवइंधन, जैवतंत्रज्ञान, कृषिविज्ञान, ऊर्जानिर्मिती, सौरऊर्जा अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये महत्त्व निर्माण झाले आहे. या ज्ञानशाखेच्या आधारे ही क्षेत्रे अधिकाधिक विस्तार पावत आहेत. अब्जांश तंत्रज्ञान ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखेचे महत्त्व सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रयत्न आहे.

५-मितीय अब्जांश स्मरण तबकडी  (5-D Nano Memory Disc)

५-मितीय अब्जांश स्मरण तबकडी  

मानवी जीवनाशी संबंधित विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती भावी पिढ्यांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जतन करून ठेवणे गरजेचे असते. प्राचीन कालापासून ...
अब्जांश अन्न उद्योग (Nanotechnology in the Food Industry)

अब्जांश अन्न उद्योग

चांगल्या प्रतीचे अन्न पुरेशा प्रमाणात मिळणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. म्हणूच अन्नउत्पादन, अन्नसुरक्षा व अन्नवाहतूक या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात ...
अब्जांश अन्नवेष्टन उद्योग (Nanotechnology in food packaging)

अब्जांश अन्नवेष्टन उद्योग

अन्नाची वाहतूक आणि साठवण या दोन्ही गोष्टी करीत असताना अन्न खाण्यायोग्य राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अब्जांश ...
अब्जांश उत्प्रेरण (Nanocatalysis)

अब्जांश उत्प्रेरण

अब्जांश स्तरावरील रासायनिक अभिक्रियेत सहभाग न घेता अभिक्रियेचा वेग वाढवणारा बाह्य पदार्थ म्हणजे अब्जांश उत्प्रेरक (Nanocatalyst) होय. यांचा वापर करून ...
अब्जांश कुपी (Nanocapsules)

अब्जांश कुपी

आरोग्याचे दृष्टीने उपद्रवकारक असणाऱ्या बाह्य घटकांपासून पदार्थांना सुरक्षित ठेवण्यासाठी अब्जांश कुपींचा वापर केला जातो. रचना : अब्जांश कुपीचे दोन प्रमुख ...
अब्जांश तंत्रज्ञान - गृहोपयोगी वस्तू व उपकरणे (Nanotechnology in home appliances)

अब्जांश तंत्रज्ञान – गृहोपयोगी वस्तू व उपकरणे

अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मूलद्रव्यांची विविध प्रकारची अब्जांशरूपे बनवता येतात. अब्जांश पदार्थांचे गुणधर्म हे त्यांचा आकार, रचना इत्यादी घटकांवर अवलंबून असतात ...
अब्जांश तंत्रज्ञान : उच्च शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार संधी (Nanotechnology : Employment Opportunities)

अब्जांश तंत्रज्ञान : उच्च शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार संधी

सद्यस्थितीत उच्च शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येत आहेत. शिक्षणाची उपलब्धता आणि संधी यापूढे एक पाऊल टाकून उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा संबंध ...
अब्जांश तंत्रज्ञान : जल प्रदूषण - नियंत्रण व प्रतिबंध (Nanotechnology for water pollution)

अब्जांश तंत्रज्ञान : जल प्रदूषण – नियंत्रण व प्रतिबंध

पृथ्वीवरील पाण्याच्या एकूण साठ्यांपैकी समुद्राचे पाणी जवळपास ९७.४% आहे; तर गोडे पाणी फक्त २.६% इतके आहे. मानवी जीवनासाठी उपयुक्त असे ...
अब्जांश तंत्रज्ञान : डास निर्मूलन (Nanotechnology for mosquito control)

अब्जांश तंत्रज्ञान : डास निर्मूलन

डास हा एक परोपजीवी कीटक असून मानवी आरोग्याच्या दृष्टीने हा कीटक खूपच उपद्रवी आहे. त्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे गरजेचे ठरते ...
अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा (Nanotechnology in dentistry)

अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा

शरीराचे आरोग्य हे प्रामुख्याने दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्तींचे दात मजबूत व निरोगी असतात, त्यांचे आरोग्य सामान्यत: उत्तम असते ...
अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण विष-चिकित्सा (Environmental Nanotoxicology)

अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण विष-चिकित्सा

अब्जांश तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अब्जांश पदार्थांचा विविध क्षेत्रातील वापर झपाट्याने वाढत आहे. परिणामी मानवी आरोग्य व पर्यावरण यांना गंभीर धोके निर्माण ...
अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण संरक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण (Nanotechnology : Environmental Protection, Prevention & amp; Control)

अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण संरक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण

अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये होणार असल्यामुळे अनेक संशोधक त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. त्यातील एक क्षेत्र म्हणजे पर्यावरणाचा ...
अब्जांश तंत्रज्ञान : बीजविज्ञान आणि पीक उत्पादन (Nanotechnology in Seed technology and Crop production)

अब्जांश तंत्रज्ञान : बीजविज्ञान आणि पीक उत्पादन

‘अब्जांश कृषिविज्ञान’ ही नव्याने उदयास आलेली अब्जांश तंत्रज्ञान या विषयाची एक शाखा आहे. ही शाखा अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषिक्षेत्रातील वाढते महत्त्व ...
अब्जांश तंत्रज्ञान : भविष्य वेध (Nanotechnology : Future Observation)

अब्जांश तंत्रज्ञान : भविष्य वेध

विसाव्या शतकात उदयास आलेले अब्जांश तंत्रज्ञानामध्ये मानवी जीवन आमूलाग्र बदलण्याची क्षमता दिसून येत आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पदार्थांची रचना, गुणधर्म ...
अब्जांश तंत्रज्ञान : समुद्रातील तेलगळती समस्येवरील उपाययोजना (Nanotechnology-Based Solutions for Oil Spills)

अब्जांश तंत्रज्ञान : समुद्रातील तेलगळती समस्येवरील उपाययोजना

समुद्रामध्ये तेलवाहू जहाजांचे अपघात अधून मधून होत असतात. अपघाताचे वेळी तसेच टँकरमध्ये तेल भरताना किंवा काढून घेत असताना समुद्रातील पाण्यामध्ये ...
अब्जांश तंत्रज्ञान : हवा प्रदूषण - नियंत्रण व प्रतिबंध (Nanotechnology for air pollution control)

अब्जांश तंत्रज्ञान : हवा प्रदूषण – नियंत्रण व प्रतिबंध

पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामध्ये नायट्रोजन (N) ७८.०८%, ऑक्सिजन (O) २०.०९% हे प्रमुख घटक असून ऑरगॉन (Ar) ०.९३% आणि कार्बन डायऑक्साईड ...
अब्जांश तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण (Nanotechnology in Crop protection)

अब्जांश तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण

रोग, कीड व तृण हे पिकांचे मुख्य शत्रू आहेत. यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशके, कीटकनाशके, तृणनाशके ...
अब्जांश तंत्रज्ञान आणि प्रतिजैविके  (Nanotechnology in Antibiotics)

अब्जांश तंत्रज्ञान आणि प्रतिजैविके

सूक्ष्मजीवांपासून मिळणाऱ्या व अत्यल्प प्रमाणात असतानाही इतर सूक्ष्मजीवांची वाढ रोखू शकणाऱ्या किंवा त्यांना मारक ठरणाऱ्या रासायनिक पदार्थांना ‘प्रतिजैव प्रदार्थ’ किंवा ...
अब्जांश तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र  (Nanotechnology in Medical Field)

अब्जांश तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र

निसर्ग हाच अनादि काळापासूनचा (आद्य) अब्जांश तंत्रज्ञ व अब्जांश पदार्थांचा सर्वश्रेष्ठ निर्माता आहे. निसर्गनिर्मित अब्जांश पदार्थ अनंत काळापासून अस्तित्वात आहेत ...
अब्जांश तंत्रज्ञानाचा आधुनिक इतिहास (Modern history of Nanotechnology)

अब्जांश तंत्रज्ञानाचा आधुनिक इतिहास

‘अब्जांश तंत्रज्ञान’ ही गेल्या काही दशकांत उदयास आलेली व वेगाने विकसित होत असलेली तंत्रज्ञान शाखा आहे. १९६५ सालचे नोबेल पारितोषिक ...
Loading...