गोलकृमी (Roundworm)

प्राणिसृष्टींतील जास्तीत जास्त जैवविविधता असलेल्या संघांपैकी अपृष्ठवंशी प्राण्यांचा नेमॅथेल्मिंथिस हा एक संघ आहे. त्यातील २८,००० हून अधिक जाती ओळखल्या गेल्या आहेत. यांपैकी सु. १६,००० जाती परजीवी आहेत. प्राणिशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या…

गोरिला (Gorilla)

स्तनी वर्गाच्या नरवानर (प्रायमेट्स) गणाच्या पाँजिडी कुलातील एक कपी. या कुलात ओरँगउटान आणि चिंपँझी यांचाही समावेश होतो. गोरिला आणि मानव या दोघांमध्ये साम्य असल्यामुळे त्याला ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. सर्व…

गोम (Centipede)

गोम हा प्राणी संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अयुतपाद (मिरिअ‍ॅपोडा) वर्गातील आहे. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो. बहुतेक गोमा भूचर असून दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्यांच्या किंवा पालापाचोळ्यांच्या खाली, खडकाच्या भेगांत…

गोचीड (Tick)

प्राण्यांच्या संधिपाद संघातील अष्टपाद अ‍ॅरॅक्निडा वर्गात गोचिडांचा समावेश होतो. मुखांगांच्या दोन जोड्या आणि पायांच्या चार जोड्या ही या वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत. टणक गोचिडे (आयक्झोडिडी) आणि मऊ गोचिडे (अरगॉसिडी) अशी…

Read more about the article गोगलगाय (Snail)
कवचधारी गोगलगाय

गोगलगाय (Snail)

मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर असणारी कवचे. मात्र कवच नसलेल्या किंवा अगदी छोटे कवच असलेले प्राणीही एक विशिष्ट प्रकारच्या गोगलगायी आहेत.…

रेमंड सॅम्युएल टॉमलिनसन (Raymond Samuel Tomlinson)

टॉमलिनसन, रेमंड सॅम्युएल (२३ एप्रिल १९४१—५ मार्च २०१६). अमेरिकन संगणक आज्ञावलीकार (Computer Programmer). ते रे टॉमलिनसन (Ray Tomlinson) या नावानेही ओळखले जातात. त्यांना संदेशवहनात क्रांती घडवणाऱ्या ई-मेल प्रणालीचे जनक मानले…

आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा (Disaster Management and National Security)

प्रस्तावना : मानव संसाधन, राष्ट्रीय संपत्ती, आणि अर्थव्यवस्था हे तीन घटक राष्ट्रीय सुरक्षेचे अतिशय महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे  या तिन्ही संसाधनांचे कोणत्याही आपत्तीपासून जतन करणे ही फक्त देशातील प्रत्येक…

Read more about the article विटबांधकामाच्या घरांची भूकंपादरम्यान वर्तणूक (Brick Masonry behavior during Earthquake)
आ. १. (अ) दगडी इमारतीचे मूळ घटक, (आ) भिंतीवरील बलाची दिशा क्रांतिकपणे तिची भूकंपादरम्यान कृती ठरते.

विटबांधकामाच्या घरांची भूकंपादरम्यान वर्तणूक (Brick Masonry behavior during Earthquake)

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. १२ विट बांधकामाच्या भिंतींची वर्तणूक : दगडी / विट बांधकाम असलेल्या इमारती ठिसूळ असून भूकंपाच्या तीव्र हादऱ्यांदरम्यान अशा संपूर्ण इमारती अतिशय धोकादायक (Vulnerable) ठरतात. भारतात यापूर्वी झालेल्या…

ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही (Australopithecus garhi)

इथिओपियात मिळालेली एक ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजात. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ बेरहान अस्फाव आणि त्यांचे अमेरिकन सहकारी टीम व्हाइट यांना मध्य आवाश भागात बौरी (Bouri) या ठिकाणी १९९० ते १९९७ दरम्यान नवीन ऑस्ट्रॅलोपिथेकस जीवाश्म…

होपी जमात (Hopi Tribe)

उत्तर अमेरिकेच्या अतिपश्चिमेकडील इंडियन समूहातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य ॲरिझोना राज्यात आढळते. मोकी किंवा मोक्वी या नावानेही त्यांचा उल्लेख होतो. सन २०११ मध्ये त्यांची लोकसंख्या १८,३२७ होती.…

गोखरू (Calthrope)

सराटा किंवा काटे गोखरू ही जमिनीवर सरपटत वाढणारी वर्षायू आहे. या वनस्पतीचा समावेश झायगोफायलेसी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस आहे. प्रामुख्याने उष्ण प्रदेशात ती आढळते. भारतात समुद्रसपाटीपासून सु. ५,४०० मी.…

विद्युत पारेषण व वितरण हानी( Electrical transmission and Distribution loss)

विद्युत प्रणालीमध्ये पारेषण-वितरण वाहिन्या, रोहित्रे, उपकरणे, मापक (मीटर), संरक्षण प्रणाली इत्यादी विविध घटकांचा  समावेश होतो. अशा प्रणालीमध्ये पारेषण व वितरण हानी या परिमाणाला अनन्यसाधारण महत्‍त्व आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारची हानी आपणास अपेक्षित नसते.…

गोकर्ण (Butterfly pea)

उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारी शिंबावंत वेल. ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लियटोरिया टर्नेटिया आहे. ही  वनस्पती मूळची आशियाच्या उष्ण प्रदेशातील असून नंतर तिचा प्रसार आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत…

गेंडा (Rhinoceros)

जमिनीवरील आकारमानाने मोठ्या असलेल्या प्राण्यांपैकी एक मोठा प्राणी. गेंडा हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर असतात. आफ्रिका, आग्नेय आशिया व आशियाच्या पूर्व किनार्‍यालगतच्या मोठ्या बेटांवर हा…

गुलाब (Rose)

फुलांचा राजा म्हणून सर्वांना माहीत असलेले सदापर्णी झुडूप. रोझेसी कुलातील रोझा प्रजातीमधील ही वनस्पती आहे. जगभर गुलाबाच्या १५० हून अधिक जाती असून फुले विविध रंगांत आढळतात. गुलाबाच्या काही जाती वेलींच्या…