अमीबा (Amoeba)

आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्‍हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे. अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्‍या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती…

गवार (Cluster bean)

गवार ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा असे आहे. भारतात सर्वत्र या शिंबावंत वनस्पतीची लागवड फळभाजीसाठी (शेंगांसाठी) करतात. एकूण उत्पादनाच्या सु. ८० % गवारीचे उत्पादन भारतात होते. तिचे…

अजगर (Python)

अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण…

गवा (Indian bison)

स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील एक प्राणी. हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे. भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस असे आहे. गवा उष्णकटिबंधातील प्राणी आहे. थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएटनाम, नेपाळ,…

गवत्या साप (Green snake)

‘गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ…

हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी (Howard Walter Florey)

फ्लोरी, हॉवर्ड वॉल्टर : (२४ सप्टेंबर १८९८ – २१ फेब्रुवारी १९६८). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश विकृतिवैज्ञानिक आणि औषधशास्त्रज्ञ. सर ॲलेक्झांडर प्लेमिंग यांनी शोधलेल्या पेनिसिलीन या प्रतिजैवाला शुद्ध स्वरूपात अलग करण्याचे तंत्र विकसित केल्याबद्दल…

अननस (Pineapple)

अननस ही ब्रोमेलिएसी कुलातील वनस्पती असून या तिचे शास्त्रीय नाव अननस कोमोसस  (अननस सटिव्हस ) आहे. ही वनस्पती मूळची ब्राझीलची आहे. मलेशिया, फिलीपीइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात अननस पिकवितात. भारतात…

गवताळ भूमी परिसंस्था (Grass land ecosystems)

पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत.…

गवती चहा (Lemon grass)

एक सुवासिक वनस्पती. सुगंध येण्यासाठी या वनस्पतींची पाने चहामध्ये मिसळतात. गहू, ही वनस्पती पोएसी (गॅमिनी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन सिट्रेटस आहे. ही मूळची भारतातील असून समशीतोष्ण तसेच उष्ण प्रदेशांत वाढते.…

गलगंड (Goitre)

अवटू ग्रंथी सुजल्यामुळे निर्माण झालेली एक अवस्था. या रोगाला ‘आवाळू’ असेही म्हणतात. गळ्याच्या पुढच्या भागात अवटू ग्रंथी असते. बहुतेक वेळा गलगंड होताना मानेच्या समोरील भागात श्वासनालाच्या दोन्ही बाजूंवर सूज येते…

गर्भजलचिकित्सा (Amniocentesis)

गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान केले जाते. गर्भाभोवती असलेल्या गर्भावरणामुळे गर्भाचे संरक्षण होते. गर्भावरणाभोवती एक…

अंबर, उदी (Ambergris, Ambergrease, Grey Amber)

उदी अंबर हा एक नैसर्गिक राखाडी रंगाचा, मेणचट व सुगंधी स्थायू पदार्थ आहे. याचा उपयोग अत्तरे व सुगंधी द्रव्यनिर्मितीमध्ये करतात. वसातिमी (sperm whale) या समुद्री प्राण्याच्या शरीरात उदी अंबर हे…

गपी (Guppy)

गपी मासा ऑस्ट्रेइक्थीज वर्गातील सायप्रिनोडॉटिफॉर्मिस गणातील पीसिलायइडी कुलात समाविष्ट आहे. याचे शास्त्रीय नाव पोईझिला रेटिक्युलाटा आहे. १८६६ साली त्रिनिदाद बेटावर आर्. जे. एल्. गपी यांनी या माशाचा शोध लावला म्हणून…

गरुड (Eagle)

पक्षीवर्गाच्या फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील अ‍ॅक्सिपिट्रिडी कुलातील शिकारी पक्षी. घार, ससाणा, गिधाड इ. पक्ष्यांचा या कुलात समावेश होतो. सोनेरी, पिंगट, शिखाधारी, मत्स्याहारी, पहाडी, कृपण, ठिपक्यांचा, शाहाबाज, सर्प, टकल्या, बादशाही असे गरुडांचे प्रकार…

गजकर्ण (Ringworm)

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा…