पोळा (Pola)

महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण. सर्वसामान्यतः श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी…

प्रार्थना (Pray)

मानवाने ईश्वराला वा अन्य एखाद्या शक्तीला वा शक्तींना उद्देशून धार्मिक श्रद्धेने केलेले निःशब्द वा शब्दबद्ध असे स्तवन, उपकारस्मरण, आत्मनिवेदन, पश्चात्तापाची अभिव्यक्ती वा याचना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना हा पूजेचाच एक प्रकार…

बारसे (Barse)

अपत्याचा जन्म झाल्यावर सामान्यतः बाराव्या दिवशी साजरा केला जाणारा, त्याचे नाव ठेवण्याचा समारंभ. बाराव्या दिवशी घडणारा, म्हणून त्याला ‘बारसे’ (संस्कृत ‘द्वादश’ वा ‘द्वादशाह’) असे म्हणतात.बाराव्या दिवसाखेरीज अन्य दिवशी म्हणजे दहाव्या…

मंगळागौर (Manglagour)

सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत…

महाशिवरात्र (Mahashivratri)

शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या…

नागपंचमी (Nagpanchami)

श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात,म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात.भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन नागासह…

नागपूजा (Nagpuja)

जगातील सर्वच प्राथमिक धर्मांमध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे.वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात असावी. मोहें-जो-दडो येथील उत्खननातही नागमूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे…

रथसप्तमी (Rathasaptami)

माघ शु. सप्तमीला केले जाणारे हिंदूंचे एक सौर व्रत. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. शिवाय, मन्वंतराच्या प्रारंभी याच तिथीला सूर्याला रथ प्राप्त झाल्यामुळे…

वग (Wag)

तमाशातील कथानाट्याचा भाग. ‘वग’ हा शब्द ‘ओघ’ या शब्दापासून आला असे सांगितले जाते; पण सातवाहन राजा हाल याच्या गाहा सत्तसईमध्ये १७२ क्रमांकाच्या गाथेत ‘वग्ग’ हा शब्द ‘समूह’, ‘कळप’ या अर्थांनी…

वाघ्या-मुरळी (Waghya-Murali)

खंडोबाचा उपासक. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करतात आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास…

पालखी (Palkhi)

देवदेवता, धर्मगुरू, श्रीमंत, सरदार इत्यादिकांस खांद्यावर वाहून नेण्याचे एक वाहन.पालखीला मराठीत ‘मेणा’ व संस्कृतमध्ये ‘शिबिका’ वा ‘आंदोलिका’ म्हणतात. ‘मेणा’ हा शब्द मात्र प्रामुख्याने सन्मान्य व्यक्तींना वाहून न्यावयाच्या साधनालाच लावलेला दिसतो.…

घनतामापक (Pyknometer)

[latexpage] घनता मोजन्याचे उपकरण. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घ. सेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती घ. फूट किंवा पौंड प्रती गॅलन या एककात मोजतात. अभियांत्रिकीमध्ये बऱ्याच वेळा पदार्थाच्या एकक आयतनातील द्रव्याचे…

Read more about the article विनायक रामचंद्र आठवले (Vinayak Ramchandra Athavale)
विनायक रामचंद्र आठवले

विनायक रामचंद्र आठवले (Vinayak Ramchandra Athavale)

आठवले, विनायक रामचंद्र : ( २० डिसेंबर १९१८ – ११ ऑगस्ट २०११ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बंदिशकार, संगीतज्ज्ञ, गायक व गानगुरू. त्यांचे पूर्ण नाव विनायक रामचंद्र आठवले. त्यांचा जन्म भोर…

मकरासन (Makarasana)

एक आसनप्रकार. ‘मकर’ या शब्दाचा अर्थ मगर. ज्याप्रमाणे मगर पाण्यातून बाहेर येऊन किनाऱ्यावरील वाळूत पोटावर शांत पडून राहते, त्याप्रमाणे या आसनामध्ये संपूर्ण शरीराचा आकार मकराकृती भासतो व विश्रांतीला उपयुक्त ठरतो…

नवरात्र (Navratra)

नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव असतात परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा…