हेली गुब्बी ज्वालामुखी (Hayli Gubbi Volcano)

पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया या देशातील एक ढाल ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीतून भूपृष्ठावर आलेला बेसाल्टासारखा सुवाही लाव्हा जागच्या जागी साचून न राहता बऱ्याच विस्तृत प्रमाणात पसरतो; लाव्ह्याचे असे थर…

कॅच–२२ (Catch-22)

कॅच–२२ (१९६१) आधुनिक इंग्रजी साहित्यातील महत्त्वपूर्ण कादंबरी. अमेरिकन लेखक जोसेफ हेलर (१९२३-१९९९) यांची ही उपरोधिक स्वरूपाची युद्धकादंबरी आहे. ही कादंबरी युद्धाची शौर्यगाथा सांगत नाही; उलट युद्धात अडकलेल्या माणसांच्या मनात चाललेल्या…

ग्रिमचा नियम (Grimm’s law)

जर्मानिक भाषांच्या ध्वनिपरिवर्तनाचा नियम. ‘ग्रिमचा नियम’ हा जर्मानिक भाषांमधील विशिष्ट ध्वनिबदलांविषयीचा ऐतिहासिक भाषाविज्ञानातील एक नियम आहे. याकोप ग्रिम या भाषातज्ज्ञाने इ.स. १८१९ मध्ये आपल्या ‘दॉयचं ग्रामाटिक’ (Deutsche Grammatik) पुस्तकात या…

निरंतर गती (Perpetual Motion)

यंत्राची काल्पनिक संकल्पना. निरंतर गतीत यंत्र एकदा सुरू केल्यानंतर बाह्य ऊर्जा पुरवठ्याशिवाय सतत कार्य करत राहील आणि यंत्रामध्ये ऊर्जा क्षय न होता, ते अनंत काळ चालू राहील अशी कल्पना मांडली…

शिवाजीराव भाऊराव निलंगेकर – पाटील (Shivajirao Bhaurao Nilangekar–Patil )

निलंगेकर-पाटील, शिवाजीराव भाऊराव (Nilangekar–Patil, ShivajiraoBhaurao) : (९ फेब्रुवारी १९३१– ५ ऑगस्ट २०२०). महाराष्ट्र राज्याचे तेरावे मुख्यमंत्री. त्यांचा जन्म नणंद (ता. निलंगा, जि. लातूर) येथे झाला. शिवाजीराव यांचे मूळ आडनाव गायकवाड;…

कन्‍फेशनल काव्‍य (Confessional Poetry)

आधुन‍िक काळातील एक अमेर‍िकन काव्यपरंपरा. Confession (कन्‍फेशन) या इंग्रजी शब्‍दाचा मराठीमध्‍ये ‘कबुलीजबाब’, असा अर्थ होतो. अमेरिकेमधील  विसाव्या शतकाच्या मध्यातील (१९५०-१९६० च्या दशकातील) एक म‍हत्त्वपूर्ण काव्‍यपरंपरा/चळवळ म्‍हणून ‘कन्‍फेशनल काव्‍या’कडे पाहिले जाते.…

अन्नामलई विद्यापीठ (Annamalai University)

भारतातील एक सर्वांत मोठे, अग्रगण्य विद्यापीठ. हे विद्यापीठ तमिळनाडू राज्यातील चिदंबरम, जिल्हा कडलूर (पूर्वीचा अर्काट) येथे स्थित असून विद्यापीठाची स्थापना इ. स. १९२९ मध्ये झाली. दक्षिण भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात…

ग्रासमानचा नियम (Grassmann’s Law)

ग्रासमानचा नियम हा ऐतिहासिक भाषाविज्ञानातील, विशेषतः इंडो-यूरोपीयन भाषांमधील ध्वनिबदलाविषयीचा एक नियम आहे. हा नियम ग्रीक आणि संस्कृत भाषांमध्ये आढळणाऱ्या ध्वनी विसदृशीकरणाच्या (dissimilation) प्रक्रियेतील सुसूत्रता प्रामुख्याने अधोरेखित करतो. हा नियम भाषाशास्त्रज्ञ…

Read more about the article सुलावेसी बेटावरील अश्मयुगीन स्थळे
तालेपू (इंडोनेशिया) येथील उत्खननात मिळालेली दगडी हत्यारे. चित्रसंदर्भ : (after van den Bergh et al. 2016).

सुलावेसी बेटावरील अश्मयुगीन स्थळे

इंडोनेशिया येथील सुलावेसी बेटावरील अश्मयुगीन स्थळे. या बेटावरील तालेपू-कॅलिओ आणि लिआंग बुलू बेट्टू या अश्मयुगीन स्थळांवर पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाचे पुरावे मिळतात. यातील कॅलिओ आणि तालेपू ही दोन्ही स्थळे दक्षिण सुलावेसीमध्ये वालनाए…

मारोतराव कन्नमवार (Marotrao Kannamwar)

कन्नमवार, मारोतराव (Kannamwar, Marotrao) : (१० जानेवारी १९०० – २४ नोव्हेंबर १९६३). महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री व एक स्वातंत्र्य सेनानी. त्यांचा जन्म विदर्भातील चांदा (चंद्रपूर) येथे सांबशिवपंत व गंगाबाई या…

संत अँब्रोझ (Saint Ambrose of Milan)

अँब्रोझ, संत : (? ३३९—? ३९७). एक ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ते. त्यांना मिलानचे संत अँब्रोझ या नावानेही ओळखले जाते. त्यांचा जन्म जर्मनीतील ऑगस्टा ट्रेव्हेरोरम (सध्याचे ट्रायर) या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सिनेटर…

तोंडावाटे औषधोपचार कार्यपद्धती (Oral Medicine Administration)

प्रस्तावना : आरोग्य सेवेमध्ये औषधोपचार (Medication Therapy) हा रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनाचा कणा मानला जातो. रुग्णास विविध आजारांमध्ये तोंडावाटे दिली जाणारी औषधे (Oral Medications) ही सर्वाधिक वापरली जाणारी, सुलभ व तुलनेने…

समूहन, माशांचे (Shoaling and schooling in Fishes)

जीवविज्ञानात जेव्हा मासे सामाजिक कारणाने समूहात राहतात त्याला शोलिंग (Shoaling) असे म्हणतात; तर मासे एकाच दिशेने सुसूत्रपणे पोहत असतात त्याला स्कूलिंग (Schooling) म्हणतात. या नोंदीमध्ये समूहन हा शब्द दोन्हीसाठी वापरला…

चैती (Chaiti)

अभिजात हिंदुस्थानी संगीतातील एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. सुरुवातीला भारताच्या उत्तर भागात प्रामुख्याने वाराणसी आणि आसपासच्या परिसरात याचे गायन केले जात असे. तेथे ग्रामीण…

आनंदराव धुळप (Anandrao Dhulap)

धुळप, आनंदराव : (कार. १७६४-१७९५). मराठेशाहीतील एक प्रसिद्ध आरमार सुभेदार आणि दर्यावर्दी. मराठ्यांच्या इतिहासात आरमार या राज्यांगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे धोरणात्मक सूत्र…