मेसोपोटेमियन शिल्पकला : अकेडियन काळ (Mesopotamia Sculpture : Acadian Period)
मेसोपोटेमियातील अकेडियन साम्राज्याच्या काळातील शिल्पकला. अभिजात सुमेरियन काळाचा अस्त इ.स.पू.सु. २३०० मध्ये अकेडियन साम्राज्याच्या उदयाबरोबर झाला. सेमिटिक भाषा असलेल्या अकेडियन साम्राज्याने इ. स. पू. २२७१ ते २१५४ दरम्यान फक्त मेसोपोटेमियाच…