तानसेन सन्मान, मध्य प्रदेश (Tansen Samman, Madhya Pradesh)

या पुरस्काराचे संपूर्ण नाव ‘राष्ट्रीय तानसेन सम्मान’ असे आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील हा एक मानाचा पुरस्कार असून तो मध्यप्रदेश शासनाकडून दिला जातो. भारतीय संगीतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तानसेन यांच्या नावाने…

भारतीय स्टेट बँक (State Bank of India)

भारताची एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँक. भारतात इ. स. १८५७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आल्यानंतर भारतातदेखील इंग्लंड प्रमाणे मध्यवर्ती बँक असावी असा विचार झाला. त्यामुळे इ. स. १८५७ च्या…

घळई (Gorge)

नदीच्या किंवा प्रवाहाच्या क्षरण (झीज) कार्यामुळे खडकाळ प्रदेशांत निर्माण होणाऱ्या अरुंद व खोल दरीला घळई किंवा निदरी असे संबोधले जाते. सामान्यपणे घळई हे भूमिस्वरूप पर्वतीय किंवा डोंगराळ प्रदेशांतील कठीण खडकांच्या…

विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (Vikram Sarabhai Space Centre-VSSC)

(स्थापना : १९६२). विक्रम साराभाई अंतराळ केंद्र किंवा विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी; VSSC) हे भारत सरकारच्या अंतराळ विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस; DOS) अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इंडियन स्पेस…

घळ (Gully; Ravine)

घळ हे पावसाच्या पाण्याच्या क्षरण (धूप) कार्यामुळे जमिनीवर, विशेषत: डोंगरउतारावर, नद्यांच्या पूरमैदानात किंवा पायऱ्यापायऱ्याच्या उतारावर तयार झालेले अरुंद, खोल, लांब व बहुदा वाकडेतिकडे भूमिस्वरूप आहे. धूप हे घळ निर्मितीचे प्रमुख…

एस्कर (Esker)

हिमक्षेत्राच्या विशिष्ट तऱ्हेच्या निक्षेपण कार्याने निर्माण झालेले नागमोडी लाबंट आकाराचे उंचवटे वा डोंगर. एस्कर हा शब्द आयरिश शब्द ‘एइस्किर’पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘कटक किंवा लांबट उंचवटा, विशेषत: दोन मैदाने…

सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre)

(स्थापना : १९७०). भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारा (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन; इस्रो; ISRO) केल्या जाणाऱ्या अंतराळ संशोधनासाठी जी केंद्रे उभारण्यात आली, त्यांपैकी ‘शार’ (श्रीहरिकोटा हाय अल्टीट्युड रेंज; एसएचएआर; SHAR) केंद्राची…

जोहरा सहगल (Zohra Sehgal)

सहगल, जोहरा : (२७ एप्रिल १९१२—१० जुलै २०१४). नृत्यक्षेत्रात आणि चित्रपटक्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका. नृत्य मंडळाच्या सदस्या म्हणून सहगल यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली. तर…

केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान (Central Drug Research Institute – CDRI)

(स्थापना : १७ फेब्रुवारी १९५१). सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट (संक्षिप्त - सीडीआरआय) ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल…

कंकणद्वीप (Atoll)

बांगडीसारखे, जवळजवळ वर्तुळाकार प्रवाळद्वीप. याच्या आतल्या बाजूस २० ते १०० मी. खोलीचे, सपाट तळाचे खारकच्छ असून त्याभोवती लहान लहान प्रवाळद्वीपांचे वर्तुळ बनलेले असते. त्यातून खारकच्छात शिरण्यास खोल पाण्याचा मार्ग असतो.…

शैलेश पुणतांबेकर (Shailesh Puntambekar)

पुणतांबेकर, शैलेश :  (१८ ऑक्टोबर १९६३). भारतीय कर्करोग विशेषतज्ज्ञ, विशेषत:  दुर्बिणीद्वारे कर्करोग शस्त्रक्रिया करणारे कर्करोग शल्यविशारद म्हणून त्यांची ख्याती आहे. पुणतांबेकर यांचा जन्म नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शिक्षक प्रफुल्ल…

अर्व्हिड कार्लसन (Arvid Carlssan)

कार्लसन, अर्व्हिड : (२५ जानेवारी १९२३ — २९ जून २०१८). स्वीडिश चेतामानस औषधशास्त्रज्ञ (Neuro-pharmacologist). मेंदूतील डोपामीन या महत्त्वाच्या चेतापारेषक म्हणून स्थापित करणाऱ्या संशोधनामुळे त्यांना २००० मधील शरीरक्रियाशास्त्र किंवा वैद्यक या…

हॅरी एम. मार्कोवित्झ (Harry M. Markowitz)

मार्कोवित्झ, हॅरी एम. : (२४ ऑगस्ट १९२७ – २२ जून २०२३).  अमेरिकन वित्त आणि अर्थशास्त्रज्ञ. रोखे-बाजारामधील जोखीम व बक्षिसांचे मूल्यमापन आणि निगम रोखे व बंधपत्र यांच्या मापनाच्या सिद्धांताकरिता १९९० चे…

नेदुमंगत्तू केसवा पणिक्कर (Nedumangattu Kesava Panikkar)

पणिक्कर, नेदुमंगत्तू केसवा : (१७ मे १९१३ — २४ जून १९७७). भारतीय एक जीववैज्ञानिक. केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्थेचे ते माजी संचालक तसेच भारत सरकार मत्स्यपालन विकासाचे माजी सल्लागार आणि…

अर्धमागधी कोश (Ardhamagadhi kosha)

अर्धमागधी कोश (१९२३-३८): अर्धमागधी शब्दाला  संस्कृत, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी इत्यादी भाषेतील अर्थ पर्याय देणारा कोश . जैन मुनि रत्नचंद्रजी यांनी याची रचना केली असून श्वेतांबर स्थानकवासी, इंदौर यांनी पाच…