लॅपटॉप हा एक प्रकारचा सूक्ष्म संगणक (मायक्रो कॉम्प्यूटर) आहे. या प्रकारच्या संगणकामध्ये डेस्कटॉप संगणकाची सर्व वैशिष्ट्ये आहेत. लॅपटॉपचा फायदा म्हणजे तो डेस्कटॉपच्या मानाने आकाराने लहान असतो आणि तो कुठेही सहज नेता येतो आणि लॅपटॅाप मांडीवर ठेवून काम करता येते.
लॅपटॉपचे फायदे :
- लॅपटॉपचा मुख्य फायदा म्हणजे ते पोर्टेबल आहेत. आपण कुठेही लॅपटॉपला सहजपणे हवे तिथे घेऊन जाऊ शकता.
- सर्व हार्डवेअर घटक म्हणजेच माउस, कीबोर्ड, मॉनिटर – सर्व एकत्र केलेले असतात, त्यामुळे आपल्याला डेस्कटॉपसारखे वेगळे ठेवण्याची आवश्यकता लागत नाही.
- लॅपटॉप आकाराने लहान असल्यामुळे कुठेही ठेवण्यासाठी फार कमी जागा लागते.
- लॅपटॉप वजनाने हलके आणि आकाराने लहान असल्यामुळे आपण ते कुठेही नेऊ शकतो उदा. ट्रेन, कार, विमान इत्यादि.
- लॅपटॉप संचालित करण्यासाठी वीजप्रवाह सुरु ठेवणे आवश्यक नाही.
लॅपटॉपचे तोटे :
- लॅपटॉप चोरी किंवा गहाळ होणे सोपे आहे.
- हे दुरुस्त करने कठिण असते. कारण जवळजवळ सर्व हार्डवेअर घटक एकच युनिट म्हणुन कार्यरत असतात. जर एखादा घटक निकामी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण लॅपटॉपवर होतो. अशा परिस्थितीत संपूर्ण हार्डवेअर घटक पुनर्स्थित करावा लागतो अन्यथा नवीन लॅपटॉप खरेदी करावा लागतो.
- उच्च कार्यक्षमता लॅपटॉप तुलनेने खूप महाग असतात.
- ग्राफिक्स कार्ड, ऑडिओ कार्ड हे सर्व मुख्य घटक मुख्य सर्किट बोर्डमध्ये बांधले जातात आणि त्यामुळे ते दुरुस्त केले जाऊ शकत नाहीत.
संदर्भ :
- कॅाम्प्यूटर फंडामेंटल्स – अनिता गोयल
- ओळख माहिती – तंत्रज्ञानाची – एम एस – सी आय टी
- https://www.researchgate.net/publication/258339295
समीक्षक – रत्नदीप देशमुख
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.