संगणकामध्ये असलेल्या मदरबोर्ड (Motherboard) या घटकावर बसेस असतात. बस हा एक सामान्य मार्ग आहे ज्याद्वारे माहिती संगणकाच्या एका घटकापासून दुसऱ्या भागात येते. हा मार्ग संचार (कम्युनिकेशन; communication) उद्देशासाठी वापरला जातो आणि तो दोन किंवा अधिक संगणक घटकामध्ये स्थापित केला जातो.

  • संगणकामध्ये मुख्यतः बसेस चे पाच प्रकार पडतात :

१. पत्ता बस (ऍड्रेस बस; Address Bus):  पत्ता बस हे तारांचे किंवा ओळीचे एक समूह आहे जे मेमरी (Memory; स्मृती) किंवा इनपुट-आउटपुट उपकरणांचे (आदान-प्रदान उपकरणांचे) पत्ते हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाते. संगणकाच्या मांडणीनुसार पत्ता बस ही वेगवेगळ्या बिटस (बायनरी डिजीट; Binary Digit द्विमान अंक) ची असू शकते. जसे की, इंटेल ८०८५ सुक्ष्मप्रक्रियकाचा (मायक्रोप्रोसेसर; Microprocessor) पत्ता बस ही १६ बिटस एवढा होता.

२. माहिती बस (डेटा बस; Data Bus) : मायक्रोप्रोसेसर आणि मेमरी इनपुट-आउटपुट उपकरणातील माहिती (डेटा) स्थानांतरित करण्यासाठी या बसचा उपयोग होतो. मायक्रोप्रोसेसरला माहिती पाठविणे किंवा प्राप्त करणे आवश्यक आहे, म्हणून डेटा बस  ही द्बिदिशात्मक (बायडायरेक्शन; Bidirectional; दोन्ही बाजूने माहिती पाठवता येते व प्राप्त करता येते) आहे. प्रोसेसरचा वेग किंवा प्रोसेसरची शब्द लांबी डेटा बसवर अवलंबून असते. ८०८५ हा मायक्रोप्रोसेसर ८ बिट मायक्रोप्रोसेसर आहे कारण याच्या शब्दाची लांबी ८ बिट आहे.

३. नियंत्रण बस (कंट्रोल बस; Control Bus) : मायक्रोप्रोसेसर हा माहिती वर प्रक्रिया करण्यासाठी नियंत्रण बसचा वापर करतो. काही नियंत्रण बस माहिती वाचण्याचे, माहिती लिहिण्याचे, पत्ता वाचण्याचे इ. काम करते. मायक्रोप्रोसेसर विविध प्रकारची प्रक्रिया नियंत्रण बस चा वापर करून करते. नियंत्रण बस ही एक समर्पित बस आहे कारण सर्व सिग्नल हे कंट्रोल (नियंत्रण) सिग्नलनुसार तयार होते.

४. प्रणाली बस (सिस्टिम बस; System Bus) : प्रणाली बस ही प्रोसेसरला मदरबोर्ड वर मुख्य मेमरी शी जोडते. प्रणाली (सिस्टिम) बसला समोरील बाजूला असलेली बस (फ्रंट साईड बस), मेमरी बस, स्थानिक बस किंवा होस्ट बस असे देखील म्हणतात.

५. आदान-प्रदान बस (इनपुट/आउटपुट बस; Input-Output Bus) : आदान-प्रदान बस ही वेगवेगळ्या परिधीय (प्रकारच्या) उपकरणांना प्रोसेसरशी जोडून ठेवते.आदान-प्रदान बसेस प्रोसेसरने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून प्रणाली (सिस्टिम) बस सोबत जोडणी (कनेक्ट) करते.

कळीचे शब्द : #टोपाॅलाॅजी #नेटवर्किंग #मदरबोर्ड

संदर्भ :

समीक्षक : रत्नदिप देशमुख