(संगणकीय उपकरण). एकापेक्षा जास्त संगणक किंवा इतर उपकरणांना (devices) यांना एकत्र जोडण्यारा सामान्य नेटवर्किंग उपकरण. त्याला इथरनेट हब (Ethernet Hub), सक्रिय हब (Active Hub), नेटवर्क हब (Network Hub), पुनरावर्तक हब ( repeater Hub) बहुजोडणी पुनरावर्तक (multiport repeater) असेही म्हणतात.

हब याचा वापर लोकल एरिया नेटवर्क (लॅन; LAN; Local Area Network) मधील विविध उपकरणांना जोडकद्वारे (Segment) जोडण्याकरिता होतो. हब याला विविध जोडण्या (Port) असतात. हबमधील एका जोडणीला माहिती पाकिटाच्या (Packet) स्वरूपात प्राप्त झाली की त्या माहितीची नक्कल प्रत तयार होऊन लॅन मधील प्रत्येक जोडकांवर ती उपलब्ध होते.

जालकावरील प्रत्येक उपकरणांचा हब हा जोडणी-केंद्रक म्हणून काम करतो आणि माहितीला चौकटीच्या (फ्रेम; Frame) स्वरूपात हाताळतो. या चौकटीतच माहिती समाविष्ट असते. हबच्या प्रत्येक जोडणीला माहिती (चौकट) प्रसारीत करण्यात येते.  विशिष्ट जोडणीडून ठराविक जोडणीला माहिती पाठविण्याचे तंत्र हब मध्ये नाही. जोडणीच्या या ठिकाणी सर्व माहिती एकत्रित येत असल्याने तेथे माहितीची वर्दळ निर्माण होऊन नेटवर्किंगचा प्रतिसाद मंदावतो. माहितीचे आदान-प्रदान एकाच वेळेस होत नाही, त्यामुळे संगणकीय स्विच (Switch) पेक्षा हब मंद गतीने काम करतो.

फायदे : एका पेक्षा जास्त संगणक व इतर नेटवर्किंग उपकरणांना एकत्र जोडू शकते. एकाच वेळेस नेटवर्क मध्ये असणाऱ्या सर्व उपकरणांना माहिती पाठवता येऊ शकते. राउटर (Router) आणि स्विचच्या तुलनेत स्वस्त आणि कमी खर्चिक असतात.

तोटे : एकाच वेळेस नेटवर्क मध्ये असणाऱ्या सर्व उपकरणांना माहिती पाठवत असताना प्रसारित केलेली सर्व माहिती सुरक्षा जोखीम असते व त्याचा गैरवापर होऊ शकतो. हबमध्ये कोठेही माहिती पाठवत असताना आणि प्रत्येक कनेक्शनवर सर्व नेटवर्क वरील माहिती प्रसारित करण्यासाठी कोणतेही मार्गन सारण्या (माहिती पाठवण्याचे पत्ते) किंवा स्वतःची बुद्धिमत्ता (सेल्फ इंटेलिजन्स; Self intelligence) नसल्यामुळे माहिती पाठवताना अडचण निर्माण होते.

कळीचे शब्द : #नेटवर्किंगटोपोलॉजी #राउटर #स्विच #नेटवर्किंगनोड #इथरनेटहब #EthernetHub #सक्रियहब #ActiveHub #नेटवर्कहब #NetworkHub #पुनरावर्तकहब #repeater Hub #बहुजोडणीपुनरावर्तक #multiportrepeater #लोकलएरियानेटवर्क #लॅन #LAN #LocalAreaNetwork

संदर्भ :