मिनी संगणक हे मध्यम आकाराचे संगणक. मिनी संगणक हे मेन फ्रेम संगणक (Main Frame Computer) आणि सुपर संगणकाच्या तुलनेत लहान, स्वस्त आणि कमी शक्तीचे असतात. मिनी संगणकाचा आकार साधारणतः एका रेफ्रिजरेटर एवढा असतो. सर्वात पहिला मिनी संगणक पीडीपी-८ (PDP – 8) हा एका रेफ्रिजिरेटर एवढ्या आकाराचा होता. त्याची किंमत साधारणतः १८०० डॉलर एवढी होती. त्याचे निर्माण DEC (डिइसी; Digital Equipment Corporation) ने १९६५ मध्ये तयार केला होता. मिनी संगणकावर एका पेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी काम करू शकतात. मिनी संगणकामध्ये एका पेक्षा जास्त प्रोसेसर (Processor; CPU) असतात. मिनी संगणकाचा वेग हा मायक्रो संगणकापेक्षा (Micro computer) जास्त पण मेन फ्रेम संगणकाच्या तुलनेत कमी असतो. मिनी सांगणक हे मोठं मोठ्या संस्थांमध्ये केन्द्रीय संगणक व मुख्य संगणक म्हणून काम करू शकतात. मिनी संगणकाचा मुख्य उपयोग मोठ्या प्रमाणावरील माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी होतो.

उपयोग : वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी, रेल्वे आरक्षण, बस आरक्षण, विमान आरक्षण, बँकिंग क्षेत्रामध्ये, व्यापार- व्यवहार प्रक्रिया, माहिती चे व्यवस्थापन इ. मिनी संगणकाचा उपयोग करण्यात येतो.

कळीचे शब्द : #संगणक #मेनफ्रेमसंगणक #सुपरसंगणक #वैज्ञानिक #अभियांत्रिकी #रेल्वेआरक्षण #बसआरक्षण #विमानआरक्षण #बँकिंग #व्यापारव्यवहार #माहितीव्यवस्थापन #पीडीपी #DEC

संदर्भ :

समीक्षक :  रत्नदिप देशमुख