(१) पाश्चात्त्य संगीतातील मानवी आवाज-पल्ल्यांच्या केलेल्या चार प्रकारांपैकी एक. मूळ इटालियन शब्द ‘आल्तो’ (उंच). स्त्रियांच्या आवाजाचा मंद्र पंचमापासून ते तार षड्जापर्यंतचा पल्ला, म्हणजेच साधारणतः मंद्र एफ ते मध्य बी हा पल्ला म्हणजे अॅल्टो. लहान मुलांच्या याच पल्ल्याच्या आवाजासाठीही हा शब्द क्वचित वापरतात. हा सोप्रानो या आवाज-पल्ल्याच्या खालचा पल्ला मानतात. ढाल्या स्त्री आवाजास प्राय: ‘काँट्राल्तो’ हा शब्द वापरतात.
(२) चोरून लावलेल्या पुरुष-आवाजाचा अत्युच्च पल्ला. यास ‘मेल अॅल्टो’ असेही म्हणतात. इंग्लंडमधील चर्चसंगीतात पुरुष गायक बहुधा या आवाज-पल्ल्यात गातात.
(३) या स्वरपल्ल्यात वाजणाऱ्या वाद्यांचे विशेषण. उदा., अॅल्टो-क्लॅरिनेट, अॅल्टो-सॅक्सफोन, अॅल्टो-फ्ल्यूट वगैरे.
(४) फ्रेंच भाषेत अॅल्टो ही संज्ञा टेनॉर व्हायलिनला वापरतात.
https://www.youtube.com/watch?v=b6ql9-NPTpQ&feature=youtu.be
समीक्षक : सु. र. देशपांडे
मराठी भाषांतर : चैतन्य कुंटे