ब्रुस, डेव्हिड   (२९ मे १८५५ – २७ नोव्हेंबर १९३१ )

डेव्हिड ब्रुस यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील बेन्डीगो (Bendigo) येथे एका स्कॉटलंड वंशीय दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे आईवडील १७५० सालीच ऑस्ट्रेलियामध्ये आले होते. परंतु वयाच्या ५ व्या वर्षीच डेव्हिड ब्रुस आईवडलांसोबत स्कॉटलंडला परत आले आणि स्टर्लिंग येथील व्हिक्टोरिया स्क्वेअरमध्ये त्यांचे वास्तव्य होते.

स्टर्लिंग येथीलच एका शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर १८६९साली त्यांनी  मॅन्चेस्टर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. फुफ्फुसाच्या रोगाचा ( न्यूमोनिया ) अभ्यास करण्याच्या त्यांच्या तीव्र इच्छेने त्यांना वैद्यकीय व्यवसाय सोडून द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी एडीनबर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.

१८८४ साली माल्टामध्ये वास्तव्यास असताना त्यांनी माल्टा फिवरचे निदान केले.

बोर (Boer) युद्धाच्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीसोबत रुग्णालय चालवले. १९०३साली त्यांनी आफ्रिकन ट्रीपानोसोमासीस (African trypanosomasis )  तथा स्लिपींग सिकनेस या रोगाचे जंतू शोधून काढले. तसेच या जंतूंचे संक्रमण ‘त्सेत्से  फ्लाय’ ( tsetse fly ) जातीच्या माशांतून होते हे सिद्ध केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ते लंडनच्या मिल्बंक ( millbank)  येथील रॉयल आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये जनरल सर्जन होते.

१८९९साली त्यांची रॉयल सोसायटीचे  फेलो म्हणून निवड करण्यात आली. पुढे त्यांना लिवेनहॉक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. १९२४ ते १९२५ या कालावधीत ते ब्रिटीश सायन्स  अॅसोसिएशनचेअध्यक्ष होते. त्यांनी ब्रुसे लॉसीसच्या जंतूंवर केलेल्या संशोधनाची नोंद घेऊनच, या जीवाणूंच्या कुळाला ब्रुसेलेसी (Brucellaceae) व त्यातील जीवाणूंना ‘ ब्रूसेला’(Brucella)  असे संबोधण्यात येऊ लागले. यातील ब्रुसेला मेलीटेन्सीस (Brucella melitensis) या जंतूमुळे माणसात  ‘अनडयूलंट फिवर’ (Undulant Fever) (कमी जास्त होणारा ताप) तर मेंढ्यामध्ये गर्भपात होतो. सामान्यपणे या जंतूचा प्रसार मेंढ्याच्या दुधातून होतो. याशिवाय स्लिपींग सिकनेस या आजाराच्या जंतूचे नाव ट्रीपानोसोमा ब्रुसी (Trypanosoma brucei) हे देखील त्यांनी केलेल्या संशोधनानंतरच दिले गेले आहे.

१९३१ साली लंडन येथे त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसातच त्यांचे निधन झाले. दोघांच्याही मृतदेहाचे दहन लंडन येथे करण्यात आले.

संदर्भ :

  •  https://en.wikipedia.org/wiki/David_Bruce_(microbiologist)
  • http://www.royalsoced.org.uk/
  •  S.R.Christophers:Bruce,Sir David (1855-1931),Oxford Dictionery of National Biography,Oxford University Press,2004,Online edn,Oct 2008.
  • www.Oxforddnb.com
  • Ellis H C (March 2006) Sir David Bruce, a pioneer of tropical medicine,British Journal of Hospital Medicine 67(3):158
  • J.R.(1932) Sir David Bruce.1855-1931. Obituary Notes of Fellows of the Royal Society.1:79

प्रतिक्रिया व्यक्त करा