इंजिनियर, ॲस्पी मेरवान : (१५ डिसेंबर १९१२—१ मे २००२). भारताचे माजी हवाई दलप्रमुख. उच्च शिक्षण कराची येथील दयाराम जेठमल सिंध महाविद्यालयात. इंग्‍लंडमधील क्रॅनवेल व ब्रॅकनेल येथील शाही विमान दलाच्या महाविद्यालयांत विमानोड्डाणाचे प्रशिक्षण. लंडनच्या शाही संरक्षण महाविद्यालयाचे पदवीधर. इंग्‍लंडपासून हिंदुस्थानपर्यंत एका महिन्यात विमानोड्डाण करणारे पहिले भारतीय म्हणून त्यांना आगाखान पारितोषिक देण्यात आले (१९३०). क्रॅनवेल येथे वैमानिक कौशल्याबद्दल ग्रोव्ह्‌‌‌ज पारितोषिक (१९३३). १९५८ पर्यंत भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख. पुढे एअर मार्शल म्हणून बढती (१९५९). हिंदुस्थान एअरक्रॅफ्ट लिमिटेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक (मे १९५८–नोव्हेंबर १९६०). भारतीय हवाई दलाचे प्रमुख (डिसेंबर १९६०–एप्रिल १९६४). १९६४–६८ या काळात ते भारताचे इराणातील राजदूत होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील कामगिरीबद्दल इंजिनियर यांना विशिष्ट सेवापदक (Distinguished Flying Cross) देण्यात आले. या महायुद्धात ते हिंदी विमान दलाच्या ब्रह्मदेश व त्याच्या परिसरातील हवाई कारवाईत सहभागी होते.

Close Menu
Skip to content