एखाद्या अणूचे वस्तुमान आणवीय वस्तुमान एकका (Atomic Mass Unit) च्या परिमाणात व्यक्त केले असता जी संख्या येईल तिच्या अगदी लगतच्या पूर्णांकास त्या अणूचा वस्तुमानांक असे म्हणतात ( चिन्ह A).

A = अणुकेंद्रातील मूलकणांची एकूण संख्या.

यावरून ,

वस्तुमानांक = अणुक्रमांक ( अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) + अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या.

वस्तुमानांक (द्रव्यमानांक) सामान्यत: अणूच्या चिन्हाच्या डोक्यावर पुढे किंवा मागे लिहितात. उदा., O16 किंवा 40K.

समीक्षक : माधव राजवाडे