कार्य ही एक अदिश राशी (Scalar quantity) असून त्याची एकके अर्ग (Erg), फूट-पौंड (Foot-Pound) व जूल (Joule) ही आहेत. शक्तीचे कोणतेही एकक गुणिले काल हेही कार्याचे एकक होते. उदा., अश्वशक्ति-तास; किलोवॅट-तास.

एखाद्या पदार्थांवर बल लावले असता होणारे स्थानांतर (Displacement) व स्थानांतराच्या दिशेतील बलाचा घटक (किंवा लावलेले बल व बलाच्या दिशेतील स्थानांतराचा घटक) यांचा गुणाकार म्हणजे त्या पदार्थांवर होणारे कार्य (Work) होय. स्थानांतर व बल किंवा तिचा स्थानांतराच्या दिशेतील घटक, एकाच दिशेत असल्यास कार्य धन व दोन्ही एकमेकांच्या विरूद्ध दिशेत असल्यास कार्य ऋण मानतात.

कार्याच्या काल-त्वरेस शक्ती (Power) म्हणतात. एखाद्या कारकाची दिलेल्या कालावधीतील सरासरी शक्ती P_{avg} म्हणजे कारकाने दिलेल्या कालावधीत केलेले कार्य भागिले तो काला‌वधी होय. कार्याचा वेग अखंड बदलता असल्यास तत्क्षणिक शक्ती (P) खालीलप्रमाणे काढता येते.

P_{avg}=\frac{\Delta w}{\Delta t}

P=\lim\limits_{\Delta t\to 0}\frac{\Delta w}{\Delta t}=\frac{dw}{dt}

सेंमी.– ग्रॅम-सेकंद, मी.-किग्रॅ.-सेकंद व ब्रिटिश या पद्धतींतील शक्तीची एकके अनुक्रमे अर्ग/से., जूल/से. (किंवा वॉट) व फूट-पौंड/से. ही आहेत. अभियांत्रिकी मध्ये अश्वशक्ती हे एकक वापरतात. एक अश्वशक्ती (Horsepower) म्हणजे ५५० फू. पौंड/से. किंवा ३३,००० फू. पौंड/मि.कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. हीच व्याख्या पुढीलप्रमाणे दिल्यास समजण्यास अधिक सुकर होते : ऊर्जा म्हणजे (ऊर्जेच्या उगमाकडून) कार्य झाले असता जेवढे कार्य झाले तेवढ्याने घटते अशी एक राशी होय. ऊर्जेची व कार्याची एकके सारखीच आहेत.

कळीचे शब्द : #ऊर्जा #एककेवपरिमाणे

समीक्षक : माधव. राजवाडे