(सॉफ्टवेअर). इंटरनेटवरून संप्रेषण करणारे सॉफ्टवेअर. यामध्ये दृक् (video), श्राव्य (audio) आणि मजकूर-संदेश (message) तात्काळ पाठविण्याची क्षमता आहे. सुरुवातीला व्हॉइस ओव्हर-इंटरनेट प्रोटोकॉलचा (VoIP; व्हिओआयपी) वापर करण्यात स्काइप एक अग्रगण्य सॉफ्टवेअर होते. स्वीडनचे निकालस झेनस्ट्रॉम (Niklas Zennström) आणि डेन्मार्कचे जानस फ्रिइस (Janus Friis) यांनी स्थापन केलेल्या लक्सेंबर्ग-बेस्ड स्काइप टेक्नॉलॉजी येथे २००३ मध्ये पहिल्यांदा सॉफ्टवेअर क्लाइंटची (Software client) ओळख करून दिली. पारंपरिक टेलिफोन नेटवर्कला व्हिओआयपी संप्रेषणाद्वारे बदलविण्यात आले. व्हिओआयपी संप्रेषणात मानवी आवाजाच्या सदृश ध्वनीचे (analog sound) अंकीय माहितीत (Digital information) रूपांतरित करून इंटरनेटद्वारे प्रसारित केले गेले आणि परत सदृश ध्वनीत अनुवादित करण्यात आले. बऱ्याच व्हिओआयपी सेवांशिवाय स्काइप विकेंद्रित पीअर-टू-पीअर (peer-to-peer; P2P) नेटवर्कचा वापर करीत असे. या नेटवर्कमध्ये असेलेले सर्व संगणक कामाची प्रक्रिया आणि पट्टरुंदी (bandwidth) यांना सामाईक करतात, जेणेकरून त्यांची क्षमता वापरकर्त्यासोबत मोजता येते. पीअर-टू-पीअर हे तंत्रज्ञान झेनस्ट्रॉम आणि फ्रिइस यांनी स्थापन केलेल्या जोल्टिड या कंपनीने तसेच कायम ठेवले होते आणि इबे (eBay) या संस्थेद्वारे परवानाकृत केले होते. स्काइप हे विद्यमान इंटरनेट जोडणीवर सहज कार्य करू शकत होते आणि अतिरिक्त अशा केबल नेटवर्कची आवश्कता त्याला नव्हती. तसेच स्काइप दूरस्थ कॉल (distance call) यासारखी मूलभूत सेवा निशुल्क देऊ शकते.
स्काइप या विनामूल्य सॉफ्टवेअरला डाउनलोड करून स्थापित केले जाते. वापरकर्ता संगणकाचा स्पीकर आणि मायक्राेफोनचा वापन करून दुसऱ्या स्काइप वापरकर्त्यास निशुल्क व्हाइस (voice) आणि व्हिडिओ कॉल (video call) करण्यासाठी डेस्कटॉप (क्लायंट) किंवा सॉफ्टफोन वापरू शकतो. शुल्क देऊन ग्राहक नियमित टेलिफोन नंबरवर कॉल करण्याची किंवा घेण्याची सेवा उपभोगू शकतात. कॉलरची ओळख पटविणे, व्हॉइस मेल आणि समूह कॉलिंग (conference calling) यांसारखी वैशिष्ट्ये स्काइपमध्ये उपलब्ध आहेत. काही उत्पादकांकडे स्काइप टेलिफोन उपलब्ध आहेत. तर इंटरनेटची सुविधा असलेल्या बहुतांश स्मार्टफोनवर चालविण्यासाठी कंपनीने सॉफ्टवेअर क्लायंट विकसित केले आहे. उदा., ॲपल इनकॉ.चा आयफोन. कॉल प्राप्त करण्यासाठी स्काइप वापरकर्त्याने इंटरनेटशी जोडणे आणि सॉफ्टवेअर कार्यरत असणे आवश्यक आहे.
इतिहास : झेनस्ट्रॉम आणि फ्रिइस यांनी 2.5 अब्ज डॉलर्स आणि प्रोत्साहानावर 500 दसलक्ष डॉलर्स एवढ्या किंमतीत इबे या अमेरिकन कंपनीला स्काइप हे सॉफ्टवेअर विकले. कंपनी व्यवहारातील ऑनलाइन लिलावामधे संप्रेषण सेवा व्यवस्थित ठरत नाहीत, त्यामुळे 2009 मध्ये इबे कंपनीने स्काइपला विकण्याची योजना जाहीर केली. झेनस्ट्रॉम आणि फ्रिइस यांनी पुन्हा कंपनी हस्तगत करण्याची तयारी दर्शविली, परंतु इबेने ती फेटाळून लावली. त्याऐवजी ती योजना कंपनीतील बहुतांश हिस्सा इतर गुंतवणूकदारांच्या गटाला विकायचे ठरविले. परंतु झेनस्ट्रॉम आणि फ्रिइस यांनी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली. स्काइप मागील तंत्रज्ञान एवढेच फक्त जोल्टिडद्वारे इबेला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे त्यांनी घोषित केले आणि इबेने सोर्स कोडमध्ये (source code) बदल करून जोल्टिडच्या कॉपीराइटचे उल्लंघन केले असल्याचे त्यांनी सांगितले. सेवेचा मूळ गाभा ठरणाऱ्या या धोक्यामुळे इबेला तडजोड करण्यास भाग पडले. कंपनीने स्कायइपचे एकूण दोन अब्ज डॉलर्सच्या 56 % विक्रेत्याच्या गटास आणि 14 % झेनस्ट्रॉम आणि फ्रिइस यांना विक्री करण्यास सहमती दिली. दोन्ही संस्थापकांना स्काइपच्या नवीन संचालक मंडळावर जागा देण्यात येईल आणि मूळ तंत्रज्ञानाची मालकी जोल्टिडवरून स्काइपला हस्तांतरित करण्यात येईल, असे ठरले. 2011 मध्ये अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पो.ने स्काइप 8.5 अब्ज डॉलर्सला विकत घेतले आणि त्यांच्या एक्सबॉक्स व्हिडिओ गेम (Xbox video game) कन्सोलला, मायक्रोसॉफ्ट आउटलुक इ-मेलला आणि विंडोज स्मार्टफोनला स्काइप जोडण्याची योजना तयार केली. त्याचवर्षी स्काइपला सोशल नेटवर्क फेसबुकमधील व्हिडिओ चॅट सेवेचा भाग बनविण्यात आले.
कळीचे शब्द : #सॉफ्टवेअर #संदेशवहनप्रणाली # voice #videocall
संदर्भ :
समीक्षक : रत्नदीप देशमुख