मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service). वैयक्तिक संगणक किंवा भ्रमणध्वनीद्वारे संदेश वितरीत करणारी ऑनलाइन लघु स्तंभ लेखन सेवा. ट्विटरमध्ये मायस्पेस (Myspace) आणि फेसबुक (Facebook) यांसारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांसारखे त्वरीत संदेशवहन (इन्स्टंट मॅसेजिंग; instant messaging) या तंत्रज्ञानाचा समावेश करून संक्षिप्त संदेशाद्वारे किंवा “ट्विट” करून दिवसभर संवाद साधू शकणाऱ्या वापरकर्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
वापरकर्ता भ्रमणध्वनीचा कळफलक (कीपॅड) किंवा संगणकावरून एक ट्विट अथवा संदेश तयार करतो आणि ते ट्विटरच्या सर्व्हरवर पाठवितो, पाठविणाऱ्याच्या यादीमध्ये असणाऱ्या इतर वापरकर्त्यांना पुढे तो संदेश अग्रेषित करण्यात येतो. (संदेश मिळणाऱ्या वापरकर्त्यास अनुयायी असे म्हणटले जाते; Followers). यासोबतच वापरकर्ता विशिष्ट विषयांवर मागोवा ठेवू शकतो, संवादावर प्रतिक्रिया नोंदवू आणि दिलेल्या ट्विटर फीडवरील लाखो अनुयायांना प्रेषित करू शकतो. ट्विट अनेक विषयांवर असू शकतात. विनोदांपासून ते बातम्यांपर्यंतच्या, जेवणाच्या योजनांपर्यंत ट्विट कोणत्याही विषयावर असू शकतात परंतु ते २८० अक्षरांपेक्षा जास्त असू शकत नाहीत.
ट्विटर अकाउंट तयार करण्याचे टप्पे :
१) ट्विटरच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी (https://twitter.com).
२) ट्विटरवर खाते उघडण्यासाठी साईन-अप यावर दाबावे.
३) आपले नाव व भ्रमणध्वनी तेथे नोंदवावा.
४) आपल्या भ्रमणध्वनीची पडताळणी करावी.
५) आपला गुप्तशब्द किवा संकेतशब्द (Password) तयार करावा व नोंदवावा.
६) आपल्या आवडी निवडाव्या.
७) अनुसरण करण्यासाठी आपल्या आवडीचे लोक निवडावे.
८) आपल्या ई-मेलचा तपासून (verify) घ्यावा.
ट्विटर अकाउंट वापरण्याचे फायदे : संबधिताला आपली माहिती गरजेनुसार सहजतेने प्रोत्साहित करण्यासाठी, उदा., आपले स्तंभ लेखन, कथा, संशोधन लेख आणि बातम्या इ. सामायिक करण्यासाठी यांचा उपयोग होतो. ट्विट आणि रिट्विटद्वारे पटकन मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचता येते. आपल्या क्षेत्रातील इतर तज्ञांच्या कार्यांचे अनुसरण करता येते. तज्ञ आणि इतर अनुयायांशी संबंध निर्माण करता येताे. नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते.
समाजमाध्यमावर होणारा परिणाम : ट्विटरमुळे राजकीय आणि सामाजिक विषयांबद्दल जागरूकता वाढते, राजकीय संदेश देता येतो आणि सामूहिक कृतीत समन्वय साधता येतो. ट्विटरमुळे समाजाचे मत जाणून घेता येते.
कळीचे शब्द : #लघुस्तंभलेखन #Microblogging #फेसबुक #Facebook #अनुयायी #Followers
संदर्भ :
- https://theconversation.com/six-ways-twitter-has-changed-the-world-56234
- https://whatis.techtarget.com/definition/Twitter
समीक्षक : अक्षय क्षीरसागर