(CAE; सीएई). अंकीय संगणकाच्या थेट नियंत्रणाखाली असलेली – अभिकल्प आणि उत्पादन यांची – एकत्रित प्रणाली. औद्योगिक अभिकल्पाच्या कामात संगणकाचा वापर आणि त्या अभिकल्पाचा उत्पादन प्रक्रियेत वापर यांवर सीएई ही प्रणाली कार्य करते. त्यालाच अनुक्रमे संगणकसाधित अभिकल्प (Computer-aided Design; CAD; कॅड) आणि संगणकसाधित उत्पादन (Computer-aided Manufacturing; CAM; कॅम) असे म्हणतात. या एकत्रित प्रक्रियेला कॅड/कॅम (CAD/CAM) असेही म्हणतात.

प्लास्टिक विरुपणाचे त्रि-मितीय (3D) संरचनेचे अरेखीय स्थिर विश्लेषण.

कॅड प्रणालीमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त टर्मिनल्स असलेला संगणक असतो, ज्यामध्ये व्हिडिओ मॉनिटर आणि परस्परसंवादी ग्राफिक्स हे आदान प्रदान करणारे उपकरण असतात. त्याचा वापर यंत्राच्या भागाचे अभिकल्प, विविध कपड्यांचे नमुने किंवा समाकालित सर्किट तयार करण्याकरिता होतो. [कॅड].

कॅम प्रणालीत अंकीय नियंत्रित यंत्र साधनाचा वापर आणि उच्च-क्षमतेचा आज्ञावल्या असतात. त्याचा वापर औद्योगिक क्षेत्रातील रोबॉट तयार करण्याकरिता होतो. [कॅम].

सीएई प्रणालीमध्ये अभिकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आराखडे विकसित आणि सुधारित रेखांकने थेट उत्पादन यंत्राच्या निर्देशांमध्ये रूपांतरित केली जाऊन अपेक्षित उत्पादकाची निर्मिती करतात. सीएई प्रणाली नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक वेळ कमी करते आणि उत्पादन प्रवाह, वेळापत्रकाचे अनुकूलन करून यंत्र प्रक्रियामध्ये अधिक लवचिकता आणते.

कळीचे शब्द :#कॅड #कॅम #अभिकल्प #उत्पादन #CAE #सीएई #CAD #CAM

संदर्भ :

 

समीक्षक : रत्नदीप देशमुख