लाखो वर्षांपूर्वी भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या सजीवांच्या अवशेषांवर दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन वायू मुक्त होतो. हा वायू जमिनीतील भुसभुशीत खडकांमध्ये अडकून राहतो. हा नैसर्गिक वायू विहिरी खणून बाहेर काढला जातो.
निर्मिती : नैसर्गिक वायूला -१६१० से.पर्यंत थंड करून त्याचे द्रवामध्ये रूपांतर केले जाते. परिणामी त्याचे आकारमान ६०० पट कमी होते. विशिष्ट प्रकारे रचना केलेल्या जहाजातून त्याची वाहतूक होते. हा वायू हवेपेक्षा हलका असतो व त्वरित हवेत मिसळतो.
गुणधर्म : सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे :
गुणधर्म | सीएनजी | एलएनजी | एलपीजी |
स्रोत | भूगर्भ | भूगर्भ | तेलशुध्दीकरण किंवा नैसर्गिक वायू प्रक्रिया |
भौतिक स्थिती | दाबाखालील वायू | द्रवरूप | द्रवरूप |
रासायनिक घटक | मिथेन (CH4) | मिथेन | प्रोपेन/ब्युटेन (C3H8/C4H10) |
ऊर्जा (प्रति गॅलन, Btu) | ३३—३८,००० | ७३,५०० | ९५,००० |
वापर | विविध वर्गातील वाहने | मध्यम/जड वाहने | कार व रिक्शा |
पर्यावरणीय परिणाम | ओझोन प्रदूषकांवर (CO & NO2) आवर | ओझोन प्रदूषकांवर (CO & NO2) आवर | ओझोन प्रदूषणावर ६० % नियंत्रण |
सुरक्षितता | दाबाखालील साठवणूक टाक्यांचा वापर | विशेष रचनेची उपकरणे व हाताळणी | दाबाखालील साठवण |
साठवण आणि वाहतूक : खनिज तेलासोबत बाहेर येणाऱ्या नैसर्गिक वायूला ‘संलग्न वायू’ (Associate gas) असे म्हणतात. या नैसर्गिक वायूला २००-२५० किग्रॅ/चौसेंमी. दाबाखाली ठेवून त्याची साठवणूक व वाहतूक होते. तेव्हा त्याला सीएनजी (compressed natural gas) असे म्हणतात. वाहनांमध्ये इंधन म्हणून याचा वापर होतो. जेव्हा प्रक्रिया केलेला नैसर्गिक वायू २० मिलिबार इतक्या कमी दाबाखाली नलिकेद्वारे घरोघरी पुरविला जातो, तेव्हा त्यास नलिकृत नैसर्गिक वायू, पीएनजी (Piped natural gas) म्हणतात.
उपयोग : एलएनजीचा वापर वीजनिर्मितीसाठी होतो. पेट्रोलियम डीझेलला पर्याय म्हणून एलएनजी वापरला जातो.
पहा : नैसर्गिक वायू.
संदर्भ : http://cochobweb1/indusweb/lng/lng%20info/lng%20info.htm