लघुग्रहांचे वर्णपटीय वर्गीकरण : लघुग्रहांचे वर्णपटीय विश्लेषणातून वर्गीकरण करून गट करण्यात येतात. त्यात सी(C), एस(S), (M)एम, एक्स(X) हे चार प्रमुख गट मानले जातात. पण त्यांचे इतरही उपगट आता वापरात आणले जातात. लघुग्रह कोणत्या रासायनिक घटकांनी बनला आहे, पृष्ठभागाचा एकूण रंग कोणता, तसेच त्याची सूर्यप्रकाश परावर्तित करण्याची क्षमता किती आहे, अशा निरीक्षणांवरून हे ठरवण्यात येते.

मुख्यत: लघुग्रहाच्या वर्णपटीय प्रकाशाच्या (कमनीय) आलेखावरून (Spectrographic light curve) आणि लघुग्रहावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशमानतेवरून (Albido) हे वर्गीकरण करण्यात येते. वर्गीकरणाच्या विविध पद्धती आहेत, परंतु, मुख्य दोन पद्धती प्रचलित आहेत. एक ‘थोलन’ (Tholan) पद्धत आणि दुसरी ‘एसमास प्रकल्पात’ (SMASS Project I and II) वापरलेली ‘बस’ (Bus) पद्धत.  गट करण्याची पद्धत कोणती, त्यावरून गटाचे नाव काय निश्चित केले जाते आणि ते कोणत्या निकषांवर आधारित असते, ते पुढील कोष्टकात दर्शविले आहे :

थोलन पद्धत वर्गीकरण एसमास-२

(बस पद्धत) वर्गीकरण

परावर्तित प्रकाशमानता

(Albido)

वर्णपटीय प्रकाशालेखाचा (कमानीचा) तपशील

(Detail of Spectroscopic Light Curve)

A A माध्यम 0.75 μm च्या अगदी खाली लाल तरंगलांबीत उतार; माफक प्रमाणात खोल शोषण वैशिष्ट्य (0.75 μm तरंगलांबीमध्ये)
B, F B क्षीण रेखीय, सामान्यत: वैशिष्ट्य नसलेला वर्णपट. अतिनील शोषण वैशिष्ट्यांमधील फरक आणि 0.7 μm तरंगलांबींच्या जवळ अरुंद शोषण वैशिष्ट्यांची उपस्थिती / अनुपस्थिती.
C, G C, Cb, Ch, Cg, Chg क्षीण रेखीय, सामान्यत: वैशिष्ट्य नसलेला वर्णपट. अतिनील शोषण वैशिष्ट्यांमधील फरक आणि 0.7 μm च्या जवळ अरुंद शोषण वैशिष्ट्याची उपस्थिती / अनुपस्थिती.
D D क्षीण तुलनेने वैशिष्ट्यहीन वर्णपट, अत्यंत उतार असलेल्या लाल तरंगलांबीच्या उतारासह.
E, M, P X, Xc, Xe, Xk क्षीण (P) पासून उच्चतम (E) पर्यंत लालसर उतारासह सामान्यत: वैशिष्ट्यहीन वर्णपट; सूक्ष्म शोषण वैशिष्ट्यांमधील फरक आणि / किंवा वर्णक्रमीय वक्रता आणि / किंवा शिरोबिंदू संबंधित प्रतिबिंब प्रकारचा आलेख.
Q Q मध्यम लालसर उतार 0.7 μm च्या खालच्या दिशेने; 0.75 μm च्या दिशेने खोल, गोलाकार शोषण वैशिष्ट्य.
R R मध्यम 0.7 μm च्या खाली तांबुस उतार; 0.75 μm लांबीचे खोल शोषण.
S S, Sa, Sk, Sl, Sq, Sr मध्यम माफक प्रमाणात लालसर उतार 0.7 μm च्या खालच्या दिशेने; 0.75 μm च्या दिशेने मध्यम ते जास्त वेगाने शोषून घेणे; 0.73 μm येथे प्रतिबिंब शिखर. एस आणि एसए, एसके, एसएल, एसक्यू, एसआर गटांच्या दरम्यान बस उपसमूह.
T T क्षीण 0.75 μm च्या पुढे थोड्या प्रमाणात वाढता लालसर; नंतर त्याच उंचीवर सपाट आलेख.
V V मध्यम 0.7 μm च्या पुढे काही अंतरापर्यंत लालसर; 0.75 μm चे लांबवर अत्यंत खोल शोषण.
K मध्यम 0.75 μm च्या माध्यमात थोडीशी लाल उतार; गुळगुळीत कोनात कमाल आणि सपाट ते निळ्या रंगाच्या दिशेने लांबवर 0.75 μm मध्ये कमी किंवा कोणत्याही वक्रतेशिवाय.
L, Ld मध्यम 0.75 μm च्या अगदी थोडे अंतर खोलवर लाल उतार;  नंतर 0.75 μm  लांबलचक सपाट; शिखरबिंदूंच्या स्तरामधील फरक.
O विचित्र आलेख कमान, आतापर्यंत फारच कमी लघुग्रहांकरिता ज्ञात आहे अशा प्रकारचा आलेख.

सूचना : येथे μm हे मायक्रोमीटर एकक दर्शविते. ते तरंगलांबीचे परिमाण आहे.

संदर्भ :

समीक्षक : आनंद घैसास