म्यूलर, हेर्टा : (१७ ऑगस्ट १९५३). जर्मन- रुमानियन कादंबरीकार, कवी, निबंधकार आणि साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेती लेखिका. एकाग्रतेने कविता लिहिणारी व विस्थापितांच्या आयुष्याचे गद्यलेखनातून मोकळेपणाने चित्रण करणारी लेखिका असा तिचा गौरव केला गेला जातो. रोमानियातील टिमिस काउंटीच्या निचिदोर्फ येथे बेनेत स्वाबियन कॅथलिक (जर्मन अल्पसंख्यांक) शेतकरी कुटुंबात जन्म. मूळ भाषा जर्मन. १९९० च्या दशकाच्या सुरवातीपासून तिची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. २० पेक्षा जास्त भाषांमध्ये तिच्या लेखनाचे भाषांतर झाले आहे. तिचे लेखन साम्यवादी रुमानियन निकोलाइ चाउसेस्कुच्या हुकुमशाही शासनादरम्यान जीवनातील कठीण परिस्थितीच्या सजीव चित्रणासाठी ओळखली जाते. तिच्या लेखनात रोमानीयातील जर्मन अल्पसंख्यांक लोकांच्या दृष्टिकोनातून तसेच बनात आणि ट्रान्सिल्व्हानियामधील जर्मन लोकांच्या आधुनिक इतिहासाचे देखील चित्रण आहे.

निकोलस लेनयू विद्यालयातून पदवी शिक्षण प्राप्त केले. जर्मन आणि रोमानियन साहित्याचा वेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ टिमिसोरा येथून तिने अभ्यास केला. १९७६ मध्ये एका उद्योग आस्थापनेत भाषांतरकार म्हणून काम करत असताना डिपार्टमेंट ऑफ स्टेट सिक्युरिटीच्या विरोधात गेल्याने १९७९ मध्ये तिला पदावरून काढण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून तिने काम केले. म्यूलर व तिचे पती रिचर्ड वॅग्नर या दोघांना स्थलांतराची परवानगी मिळाली आणि ते दोघे पश्चिम बर्सिनमध्ये स्थायिक झाले. युनिव्हर्सिटी ऑफ जर्मनी येथे त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जर्मन भाषा आणि साहित्य संस्थेच्या (Deutsche Akademie fur Sprache and Dichtung) सदस्य म्हणून त्या निवडून आल्या (१९९५).

तिचे नायडीरंजेन  हे पहिले १९८७ प्रकाशित झाले. नादिर्स  (१९९९) हे तिचे दुसरे चरित्रात्मक पुस्तक. लहान मुलाच्या दृष्टितून जर्मन बेनेट संस्कृतीचे चित्रण केलेल्या या चरित्रात्मक पुस्तकावर बेनेट स्वरबियन कम्युनिटीच्या काही सदस्यांनी टीका केली. म्यूलर अक्टी ऑनस ग्रुपी बेनेट या साहित्यिक समूहाची सदस्य होती. जर्मन भाषिक लोकांचा हा समूह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. निकोले स्युसेकस शासनाच्या लादलेल्या बंधनाविरुद्ध म्यूलर ने द लॅन्ड ऑफ ग्रीन पाल्मस  (१९९४ ) या पुस्तकात लिहिले आहे. द हंगर एन्जेल (२००९) या तिच्या प्रसिद्ध कादंबरीत रोमानियातील जर्मन अल्पसंख्यांकांचे गुलाम म्हणून झालेल्या हद्दपारीचे चित्रण आहे. फिलिप बोहेम यांनी २०१२ मध्ये याचे इंग्रजी भाषांतर केले. रोमानियन शासन व्यवस्थेचे दमणकारी स्वरूपाविरुद्ध म्युलरने लेखन प्रेरणा घेतली आहे. वास्तव आणि कल्पित यांचा सुरेख समन्वय तिच्या लेखनात आढळतो.

म्युलर यांची साहित्य संपदा : कादंबरी  – Der Mensch ist ein grosser Fasan auf der Welt (The Passport 1986),  Reisende auf einem Bein (Traveling on One leg 1989), Der Fuchs war damals schon der Jäger (The Fox Was Ever the Hunter 1992), Herztier (The Land of Green Plums 1999), Heute wär ich mir lieber nicht begegnet (1 The Appointment 1997), Atemschaukel (The Hunger Angel 2009), संपादन -Theodor Kramer : Die Wahrhelt ist, man hat mir nichts getan (The truth Is No One Did Anything to Me,1999),Die Handtasche (2001),Wenn die Katzen ein Pferd ware, konnte man durch die Baume reiten (If the Cat Were a Horse, You Could Ride Through the trees, 2001)

साहित्यिक योगदानासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. केलिएस्ट प्राइझ (Kleist Prize,११९४), अरिस्टिऑन प्राइस (Aristeion प्रीझ, ११९५), इंटरनॅशनल डब्लीन लिटररी अवॉर्ड (International Dublin Literary अवॉर्ड, ११९८), फ्रान्स वेरफेल ह्युमन राइटस् अवॉर्ड (२००९) आणि साहित्यातील सर्वोच्च नोबेल इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे

संदर्भ :