लिंकन इन द बोर्डो : मॅनबुकर पुरस्कार प्राप्त जॉर्ज सॉंन्डर्स यांची कादंबरी. जॉर्ज सॉंन्डर्स हा सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथाकार आहे. तो दुसरा अमेरिकन मॅनबुकर पुरस्कारप्राप्त ४९ वर्षीय साहित्यिक ठरला. ही कादंबरी ब्लूम्सबरी प्रकाशन संस्थेने फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रकाशित केली. अब्राहम लिंकनचा मुलगा विली वॉलेस लिंकन याच्या मृत्यूनंतर ही कादंबरी लिहिली गेली. त्या एकाच सायंकाळच्या प्रसंगाला उद्देशून बारदो थोडोलच्या या भागातील आत्मक्रोधजनक आसुरी लोकांच्या विकृतीची कल्पना देतो. तेव्हा या ठिकाणी सॉन्डर्स मधील लोकप्रिय कथा, व्हिक्टोरीयन गॉंथिकचे मिश्रण, लिंकनची मिथके अशा बऱ्याच गोष्टीने कादंबरी वाचनीयता अधिक वाढते. जॉर्ज सॉंन्डर्स याला मात्र आपण धार्मिक म्हणू शकणार नाही. कारण या कादंबरीमध्ये मानवी अनुभवाच्या अपूर्वपणाबद्दलची चिंता, ऐतिहासिक घटना, सत्य लपविणारा एक क्रम याविषयाचे लेखकाचे असलेले चिंतन अवर्णनीय आहे.

लिंकन इन द बोर्डो  या कादंबरीचे स्वरूप भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित आहे. बोर्डो या शब्दाचा शब्दशः अर्थ मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्यामधील अवस्था चित्रित करणे. या कादंबरीमध्ये १६६ भूत हे अब्राहम लिंकनच्या शरीरात प्रवेश करून बोलत असतात. जन्म आणि मृत्यू च्या दरम्यानची गोष्ट सांगून ही सर्व भुते अब्राहम लिंकनच्या माध्यमातून जगाला पुनर्जन्माची विविध रूपे सांगत असतात. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे जगप्रसिद्ध सोळावे राष्ट्रपती आहेत. त्यांची मिथके या कादंबरीमध्ये चित्रित झाली आहे. कादंबरीचे मुळ कथानक हे अब्राहम लिंकनच्या लहान मूलगा विली याचा २० फेब्रुवारी १८६२ ला टायफाईडच्या आजारपणाने निधन पावतो. त्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून एका दिवसाच्या घटनेचे अतिशय विलोभनीय कथानकाचे चित्रण या कादंबरीमध्ये पाहायला मिळते. आपल्या मुलाच्या मृत्यूच्या दुखःने अब्राहम लिंकन त्याच्या कब्रस्तान जवळ जाऊन त्याला  पुढील जन्मांमध्ये भेटण्याचे वचन देतो. तेव्हा सभोवतालचे सर्व प्रेत विलीला पुनर्जन्माचा उपदेश करतात. या कब्रस्तानमध्ये समाजातील सर्व प्रकारच्या गटातील, सर्व स्तरातील वर्गातील लोकांची भूत या स्थळी जागृत असतात. ते देखील पुनर्जन्म या विषयाला सहमती देतात.

जॉर्ज सॉंन्डर्स या अमेरिकन साहित्यिक कादंबरीकाराने अब्राहम लिंकन याच्या जगप्रसिद्ध मिथकांचा वापर करून आपल्या बुद्धीमत्तेच्या प्रायोगिक हल्ल्यातून ही कादंबरी जन्म घेते. अब्राहम लिंकनच्या अकरा वर्षीय मुलगा विली याचा अकाली मृत्यू होतो. त्याचे प्रेत वॉशिंग्टन येथील कब्रिस्तानमध्ये एक रात्र ठेवले जाते. या घटनेनी अब्राहम लिंकन खूप अस्वथ होऊन जातो.या कादंबरीची रचना अतिशय बुद्धिमत्तेने आणि गांभीर्यपूर्वक आणि कल्पकतेने केले असले तरी हे कथानक चित्रित करताना, तो वेगवेगळ्या प्रकारातील लोकांची भूत अब्राहम लिंकनच्या शरीरामध्ये जाऊन प्रवेश करून त्याच्या मुलाला पुनर्जन्माचा उपदेश देत असतात. या कादंबरीचे कथानक वाचत असताना बऱ्याच वेळा विनोदी पद्धतीचे रूप धारण करते. या स्वरूपामुळे या कादंबरीचे स्वरूप अतिशय कलात्मक, वैश्विक उंची प्राप्त करते.

अब्राहम लिंकन आपल्या कौटुंबिक शोकात्मिकतेचा उलगडा करीत असताना मुलाच्या मृत्यूचे असलेले दाहक दुःख त्याच्या मनामध्ये खोलवर रुतल्या जाते. ही सर्व भावना स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्याच्या बोलण्यातून व्यक्त होतात. त्यावेळी दफनभूमी ही अशाच आत्म्याने भरलेल्या लोकांच्या जमावाने एक घटना त्याठिकाणी घडते. आणि मृत लोकांचे आत्मे अब्राहम लिंकनच्या शरीरामध्ये जाऊन प्रवेश करून त्याच्या मुखातून बोलू लागतात. हा त्याच्या जीवनाचा पर्यंतचा प्रवास अगदी आश्चर्यचकित करणारा असतो. यासंदर्भात अब्राहम लिंकनला कोणत्याही प्रसंगाची अथवा घटनेची आठवण स्मरणामध्ये राहत नाही. कॅथोलिक लोकांच्या मनामध्ये पुनर्जन्माच्या संबंधी अनेक अशा घटना मनावर बिंबवल्या जातात. ज्या ठिकाणी विलीचे दफन ठेवल्या जाते. त्याच्या सभोवतालमध्ये बेव्हिन्स , व्हॉंलमन आणि रेव्हरंड अर्ली या तिघे  संभाषणान करून लिंकन त्यांच्या आत्म्यात प्रवेश करतात. त्यांच्या मानसिक प्रेरणेतून त्याला स्वतःला बोलण्यास प्रवृत्त करतात. या विवंचनेत व्याकूळ झालेल्या वृत्त आत्म्यांचा विलीच्या आत्म्याशी संवाद होतो. आणि ते त्याला पुनर्जन्म घेण्याचा मार्ग सुचवितात. हीच घटना कादंबरीच्या कलानिर्मितीच्या, प्रायोगिकता यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची ठरली आहे.

संदर्भ :