अतीतराग : एक पाश्चात्य साहित्य संज्ञा. मानवी जीवनातील अतीत संज्ञेच्या मुळाशी आहे. ग्रीक शब्द ‘nostos’ म्हणजे गृह आणि दुसरा शब्द ‘algos’ म्हणजे वेदना. या दोहोंवरून हा ‘nostalgia’ (अतीतराग) शब्द तयार झाला आहे. ही साहित्यिक संज्ञा मानवी अंतर्मनाचा निर्देश करते. फ्रेंच तत्त्ववेत्ता बर्गसाँ यांनी मानवी मानसिक प्रक्रियांच्या अतीताकडे होणाऱ्या गतीचे विश्लेषण केले आहे. मार्शल प्रूस्त यांनी बर्गसाँ यांच्या अतीतरागाबद्दलच्या विचारधारेचा सर्जनशील लेखनात एक भूमिका म्हणून स्वीकार केला आहे. मानवी जीवनातील अत्यंत गुंतागुंतीच्या अतीतस्मृतीचा आलेख त्यांच्या लेखनात साठवला जातो. कोणत्याही सर्जनशील व्यक्तीच्या अंतर्चेतनेचा स्रोत त्याच्या बालपणात असतो. बालपणीच्या जादुई सृष्टीचे पुनर्निर्माण करण्याची मानसिक ओढ प्रत्येक लेखक बाळगतो. जे घर, जे गाव, जो प्रदेश आणि ज्या काळाशी संबंधित संपूर्ण वातावरण नाहीसे झाले, त्याची खोल वेदना लेखकाच्या चित्तात असते. जेव्हा अनेक आठवणींनी भरलेली ही अतीताची सृष्टी दृष्टिसमोर येते, तेव्हा एक अद्वितीय आनंद अनुभवास येतो.
मार्शल प्रूस्त यांनी प्रसिद्ध कादंबरी Remembrance of Things Past (A la Recherche du temps perdu) च्या माध्यमातून बालपणाशी संबंधित घर, गाव, समाज, आणि असंख्य स्थळकाळांच्या आठवणींनी भरलेली अद्भुत सृष्टी निर्माण केली आहे. वैयक्तिक अनुभवांच्या संदर्भात येथे तत्कालीन फ्रेंच समाजाची प्रतिमा देखील उमलून येते. जेम्स जॉयस, हेन्री जेम्स, व्हर्जिनिया वूल्फ यांसारख्या कादंबरीकारांच्या साहित्यात तीव्र अतीतराग दिसून येतो. कल्पना-प्रतिकांसह असलेले, मानसिक प्रक्रियांना प्रत्यक्ष रूप दिलेले सर्जन त्यांच्या साहित्यात अभिव्यक्त होते.
बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या श्रीकांत कादंबरीत कथानायकाची तीव्र अभिव्यक्ती त्याच्या दृष्टिसमोर त्याच्या विस्तृत यौवनकाळाशी जोडलेल्या स्थळांचे संपूर्ण चित्र उभे करते. ओडिया कवी जीवनानंद दास यांच्या रचनांमध्ये धानसीडी नदीच्या आसपासचा ग्रामीण प्रदेश-वनप्रदेश उच्छल हृदयातून वारंवार अतीतस्पर्शाने ध्वनित होतो. गुजराती कवी राजेंद्र शाह यांच्या आयुष्याच्या अवशेषे या सॉनेटमध्ये काव्यार्थाच्या एका पातळीवर अतीतझंकाराचे ध्वन्यात्मक रूप चित्रित केलेले आहे. जयंत पाठक यांनी वनांचल मध्ये आणि चंद्रकांत शेट्टी यांनी धूळमधील पाऊलखुणा मध्ये अतीतरागाचे अत्यंत काव्यात्मक गद्य कथन केले आहे.
संदर्भ : https://poemanalysis.com/literary-device/nostalgia/
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.