द सेल आऊट : बुकर पुरस्कार प्राप्त पॉल बेट्टी या लेखकाची कादंबरी. पॉल बेट्टी हे सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक, कादंबरीकार होत. ही कादंबरी वन वर्ल्ड प्रकाशनाने, युके कडून २०१५ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीत अमेरिकेतील शेतकरी, कामगार यांच्यातील गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुनर्वसनाची कथा मांडली आहे. हे चित्र जगासमोर मांडणारी ही पहिलीच अमेरिकन कादंबरी ठरली. जातिवाद वंशवादाची समस्या, काळ्या कामगारवर्गाचे पांढर्या अधिकारी वर्गाकडून होणारा छळ ही या कादंबरीची पार्श्वभूमी आहे. कॅलिफोर्नियातील जीवनशैली जगत असलेला कादंबरीचा नायक डिकेन्स हा सर्वोच्च न्यायालयाचा समोर बसून उघडपणे धूम्रपान करीत असताना कथानकाला प्रारंभ होतो. या घटनेला तो आणि त्याचे साथीदार तीव्र निषेध करतात. समाजव्यवस्थेतील जातिवाद, वंशवाद, हुकुमशाही, आफ्रो -अमेरिकन न्यायशास्त्राची हरवलेली तत्वे ही जगाच्या इतिहासातील जिवंत समस्या पॉल बेट्टीने सिद्धांतनानुसार मांडली आहेत. द सेलआऊट च्या अगोदर पॉल बेट्टीचे द व्हाईट बॉय शफल (१९९६), टफ (२०००), रलम्बरलॅंड (२००८) अशा चार कादंबऱ्या, दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेली जातीय समानतेची स्फोटक घटना पॉल बेट्टी यांच्या मनावर खोलवर रुजते. या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल धागे उलगडताना लेखक म्हणतो, अस्तित्वात असलेल्या हुकूमशाही वर स्वतः बहिष्कार या कादंबरीत टाकलेला दिसतो. समाजातील खालच्या पातळीवर पोहोचलेली निष्ठुरतेच्या संदर्भात समाजामध्ये रुजलेली हुकूमशाही हे कादंबरीत चितारली आहे. या विचारसरणीतून जगाला कोणीही वाचवू शकत नाही. ही खंत त्यांच्या मनाला सतत भेडसावते. हाच कादंबरीचा मुख्य विषय आफ्रो-अमेरिकन वंशाच्या बद्दल असलेली कल्पना करून पॉल बेट्टीने या कादंबरीतील नायक रेखाटला आहे. जो सहानुभूतीपूर्वक अधिकाऱ्याच्या संयुक्त शोधाच्या शर्यतीतून भावी वंशजाबद्दल कल्पना रंगवितो. पॉल बेट्टीचा आणि द सेलआऊट मधील कथानकाच्या रचनेतून त्याची बुद्धिमत्ता गतीस्तोत्र आणि आधुनिकतेचा आधारभूत घटक मानावा लागतो. या कादंबरीवर टॉलस्टॉय,युंग अशा विचारवंताच्या विचारांचा मौलिक वारसा लेखक मनावर असल्यामुळे द सेलआऊट या कादंबरीची उंची अधिक व्यापक होते.
संदर्भ : मूळ ग्रंथ