व्ही. के. सिंग (V. K. Singh)

सिंग, विजयकुमार : (१० मे १९५१). भारतीय भूसेनेचे चोविसावे सेनाप्रमुख आणि पहिले प्रशिक्षित कमांडो. त्यांचा जन्म लष्कराची परंपरा असलेल्या कुटुंबात पुणे येथे झाला. त्यांचे वडील भूसेनेत कर्नल हुद्द्यावर होते. त्यांचे…

माधवेंद्र सिंग (Madhvendra Singh)

सिंग, माधवेंद्र : (? १९४५). भारताचे माजी नौसेनाप्रमुख आणि एक निष्णात गोलंदाज. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात राजस्थानातील चोमू गावी (जि. जयपूर) झाला. त्यांचे वडील मेजर जनरल के. भगवती सिंग हे इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या…

बाना सिंग (Bana Singh)

सिंग, नायब सुभेदार बाना : (६ जानेवारी १९४९). भारतीय भूसेनेतील एक धाडसी, शूर सैनिक आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पदाचे मानकरी. त्यांचा जन्म सामान्य शेतकरी शीख कुटुंबात कड्याल (पंजाब) या खेड्यात झाला. पाच भाऊ आणि तीन बहिणी यांमध्ये…

जोगिंदर जसवंत सिंग (Joginder Jaswant Singh)

सिंग, जोगिंदर जसवंत : (१७ एप्रिल १९४५). भारतीय भूदलाचे प्रमुख. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात भावलपूर (पाकिस्तान ) येथे झाला. त्यांचे वडील ले. क. जसवंत सिंग मारवाह हे लष्करात विद्युत…

विजयसिंह शेखावत (Vijay Singh Shekhawat)

शेखावत, विजयसिंह : (१ ऑक्टोबर १९३६). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. त्यांचा जन्म भिवानी (हरयाणा राज्य) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धरमपाल सिंह आणि पत्नीचे नाव बिनू. त्यांना दोन मुले आहेत. जुलै…

करम सिंग (Karam Singh)

सिंग, लान्सनाईक करम : (१५ सप्टेंबर १९१५—२० जानेवारी १९९३). भारतीय लष्करातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म सेद्रना (जि. संग्रूर, पंजाब) या खेड्यात एका सधन शेतकरी सुशिक्षित कुटुंबात झाला.…

दिलबाघ सिंग (Dilbagh Singh)

सिंग, दिलबाघ : (१० मार्च १९२६‒९ फेब्रुवारी २००१). भारतीय हवाई दलाचे प्रमुख. त्यांचा जन्म गुरदासपूर (पंजाब) येथे लष्करी वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले. त्यानंतर ते तत्कालीन हवाई दलात…

प्रताप चंद्र लाल (Pratap Chandra Lal)

लाल, प्रताप चंद्र : (६ डिसेंबर १९१६–१३ ऑगस्ट १९८२). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख (१९६९–७३). लुधियाना (पंजाब राज्य) येथे बसंत व प्रमोदिनी या सुशिक्षित दांपत्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आयकर…

शैतान सिंग (Shaitan Singh)

सिंग, मेजर शैतान : (१ डिसेंबर १९२४‒१८ नोव्हेंबर १९६२). भारत-चीन संघर्षातील एक पराक्रमी सेनाधिकारी आणि परमवीरचक्राचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात जोधपूर (राजस्थान) येथे झाला. त्यांचे वडील हेमसिंगजी हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल…

जदुनाथ सिंग (Jadunath Singh)

सिंग, नाईक जदुनाथ : (२१ नोव्हेंबर १९१६‒६ फेब्रुवारी १९४८). भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात बिरबल सिंग राठोड आणि जमुना कंवर या दांपत्यापोटी कजुरी (जि. शाहजहानपूर, उत्तर प्रदेश) या…

सुभेदार जोगिंदर सिंग (Subhedar Joginder Singh)

सिंग, सुभेदार जोगिंदर : (२८ सप्टेंबर १९२१‒२३ ऑक्टोबर १९६२). भारतीय लष्करातील एक शूर व पराक्रमी सुभेदार आणि परमवीरचक्र या सर्वोच्च शौर्य पदकाचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात महाकालन (मोगा, पंजाब) या खेड्यात झाला. सामान्य परिस्थितीमुळे…

होशियार सिंग (Hoshiar Singh)

सिंग, मेजर होशियार : (५ मे १९३६–६ डिसेंबर १९९८). भारतीय लष्करातील एक पराक्रमी सेनाधिकारी आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म लढाऊ परंपरा असलेल्या जाट ज्ञातितील शेतकरी कुटुंबात चौधरी हिरासिंग व माधुरीदेवी या दांपत्यापोटी सिसाना (जि. सोनपत, हरयाणा) येथे…

मेजर पिरु सिंग (Major Piru Singh)

सिंग, मेजर पिरु : (२० मे १९१८–१८ जुलै १९४८). एक पराक्रमी भारतीय सैनिक व परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा लाभलेल्या राजपूत शेतकरी कुटुंबात रामपुरा बेरी (राजस्थान) या खेड्यात झाला. बेरीच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले; परंतु शिक्षण अर्धवट…