औषधे (Drugs)

मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा…

कोलेस्टेरॉल (Cholesterol)

कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो. जैविक दृष्ट्या महत्त्वाच्या मेदी अल्कोहॉलांच्या (स्टेरॉल) गटातील हा पदार्थ असून याचे वर्गीकरण…

कोरफड (Indian aloe)

लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण भारतात ती…

कोतवाल (Drongo)

कोतवाल हा पक्षी डायक्रूरिडी या पक्षी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायक्रूरस मॅक्रोसेर्कस आहे. आपल्या तकतकीत काळ्या रंगामुळे कोतवाल पक्ष्याला ‘कोळसा’ असेही नाव पडले आहे. आफ्रिकेपासून आशिया, ऑस्ट्रेलियापर्यंत हा पक्षी आढळतो. कोतवाल…

काकाकुवा (Cockatoo)

काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे. या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे.…

कृत्तक (Clone)

एखाद्या सजीवाच्या जनुकीय रचनेसारखीच जनुकीय रचना असणारा दुसरा सजीव म्हणजे कृत्तक. असा कृत्तक निर्माण करण्याच्या प्रक्रियेला कृत्तकी किंवा कृत्तककरण म्हणता येईल. उत्परिवर्तन किंवा पर्यावरणामुळे आलेला विकासातील फरक झाला नाही तर…

अ‍ॅमिनो आम्ले (Amino acids)

[latexpage] अ‍ॅमिनो आम्ले ही कार्बनी संयुगे असून प्रथिनांच्या जडणघडणीतील प्राथमिक घटक आहेत. बहुतांशी प्राण्यांच्या चयापचय क्रियेत काही अ‍ॅमिनो आम्ले महत्त्वाची असतात. शरीरातील प्रथिनांमधील अ‍ॅमिनो आम्लांची जोडणी जनुकांद्वारे होते आणि ही…

आघाडा (Prickly chafflower)

ही वर्षायू ओषधी अ‍ॅमॅरॅंटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅचिरँथस अ‍ॅस्पेरा आहे. ही वनस्पती सर्वत्र (समुद्रसपाटीपासून सु. १,००० मी.उंचीपर्यंत) मोकळ्या पडिक जागी किंवा कचर्‍याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे वाढते. ती आशिया, आफ्रिका,…

कॅक्टेसी (Cactaceae)

कॅक्टेसी हे काटेरी वनस्पतींचे कुल असून त्यात मोठ्या, पर्णहीन, लांब, विविध आकार आणि आकारमानाच्या वनस्पतींचा समावेश होतो. बहुतांशी या वनस्पतींची खोडे रसाळ व मांसल ऊतींची असतात. ऊतींमध्ये पाणी सामावलेले असल्याने…

आपटा (Bauhinia racemosa)

आपटा फॅबेसी कुलामधील बौहीनिया  प्रजातीतील शेंगा देणारे, भरपूर व लोंबत्या फांद्यांचे, वेडेवाकडे वाढणारे लहान झाड आहे. याचे शास्त्रीय नाव बौहीनिया रॅसिमोजा आहे. हे भारत, श्रीलंका, चीन इ. देशांतील पानझडी वनांत आढळते. शोभेसाठी बागेतही हे…

आरोही वनस्पती (Climbers)

काही लांब, पातळ आणि लवचिक खोडे असलेल्या वनस्पती वाढीसाठी इतर वनस्पतींच्या, खडकाच्या किंवा इतर आधाराच्या मदतीने वर चढतात. अशा वनस्पतींना सामान्यपणे ‘आरोही वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये आधाराला घट्ट पकडण्यासाठी खास…

उडीद (Black gram)

एक कडधान्य. उडीद ही वर्षायू व शिंबावंत (शेंगा येणारी) वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना मुंगो आहे. ही वनस्पती मूळची भारतातील आहे. ती प्राचीन काळापासून उडदाच्या डाळीसाठी लागवडीखाली आहे. तिचा…

आले (Ginger)

आले हे त्याच नावाच्या लहान बहुवर्षायू ओषधीचे मूलक्षोड (जमिनीलगत आडवे वाढणारे मांसल खोड) आहे. हे मूलक्षोड (आल्याचे गड्डे) शाखित असून हाताच्या पंजासारखे असतात. त्यांची बोटे जवळजवळ व एकमेकांना चिकटलेली असतात.…

अळशी (Linseed)

फुलझाडांपैकी अळशी हे झुडूप लायनेसी कुलातील एक वनस्पती आहे. वर्षभर जगणार्‍या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लायनम असिटॅटीसिमम असे आहे. भूमध्यसामुद्रिक भागात आढळणार्‍या तिच्या प्रजातीतील एका जातीचा (लायनम बाएने) व तिचा जवळचा संबंध…

अनिषेकजनन (Parthenogenesis)

अफलित अंडाचा प्रौढ जीवात विकास होण्याच्या क्रियेला अनिषेकजनन म्हणतात. लैंगिक प्रजननात सामान्यपणे मादीच्या पक्व अंडाचे (अंडाणूचे) नराच्या शुक्राणूद्वारे फलन झाल्यास अंड उद्दीपित होते व त्याच्या विकासाने नवीन जीव उत्पन्न होतो.…

Close Menu
Skip to content