अवर्षण (Drought)

नैसर्गिक हवामान चक्रात वृष्टी (पर्जन्य अथवा हिमवृष्टी) अभावी दीर्घकाळ कोरडा काळ राहणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा काहीशी सापेक्ष आहे. एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी…

सामाजिक भूगोल (Social Geography)

मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. या शाखेत मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही. त्याच प्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक भूगोलशास्त्रांचे स्वरूप आणि व्याप्ती…

सरहद्द (Frontier) 

एका देशाचा दुसऱ्या देशाच्या नजीकचा क्षेत्रविभाग किंवा दोन देशांचा एकमेकांशी भिडणारा प्रदेश म्हणजे सरहद्द होय. सरहद्दीला लांबी व रुंदी असते. सीमेइतकी सरहद्द निश्चित नसते. दोन देश किंवा प्रदेश यांच्या मर्यादा…

साऊँ पाउलू शहर (Sao Paulo City)

ब्राझीलमधील साऊँ पाउलू राज्याच्या राजधानीचे ठिकाण आणि देशातील अग्रेसर औद्योगिक केंद्र. ब्राझीलमधील तसेच दक्षिण अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी हे एक आहे. ब्राझीलच्या आग्नेय…

मध्य-अटलांटिक रिज (Mid-Atlantic Ridge)

अटलांटिक महासागराच्या जवळजवळ मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली जगातील सर्वाधिक लांबीची सागरी रिज (पर्वतरांग). अटलांटिक महासागरच्या सागरतळावर पसरलेली ही रिजप्रणाली पृथ्वीवरील सर्वांत मोठी भूशास्त्रीय रचना आहे. उत्तरेस ८७° उ. अक्षांशापासून (उत्तर…

क्षिप्रा नदी (Kshipra River)

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी चंबळ नदीची एक उपनदी. ती शिप्रा या नावानेही ओळखली जाते. तिची लांबी सुमारे २४० किमी. आहे. तिच्या द्रुतगती प्रवाहामुळे तिला क्षिप्रा (जलद वाहणारी) असे म्हटले…

आरोह पर्जन्य (Convectional Rainfall)

वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे पडणाऱ्या पावसाला ‘आरोह पर्जन्य’ किंवा ‘अभिसरण पर्जन्य’ असे म्हणतात. सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरातील आर्द्र हवा गरम होऊन हलकी होते. त्यामुळे स्वाभाविकच वातावरणात अभिसरण…

आवर्त पर्जन्य (Cyclonic Rainfall)

आवर्ताच्या निर्मितीमुळे जो पाऊस पडतो त्यास ‘आवर्त पर्जन्य’ असे म्हणतात. एखाद्या प्रदेशात जेव्हा केंद्रस्थानी निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याभोवती सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून अतिशय वेगाने वायुराशी चक्राकार वाहत येतात,…

अश्व अक्षांश (Horse Latitudes)

पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धातील उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याला उद्देशून ‘अश्व अक्षांश’ असे संबोधले जाते. दोन्ही गोलार्धांत ३०° ते ३५° या अक्षवृत्तांदरम्यान जास्त वायुभाराचे पट्टे निर्माण होत असतात. सूर्याचे भासमान भ्रमण…

प्रत्यावर्त (Anticyclone)

वातावरणात जेव्हा एखाद्या ठिकाणी निर्माण झालेल्या जास्त भाराच्या केंद्राकडून सभोवतालच्या कमी भाराच्या प्रदेशाकडे चक्राकार वारे वाहतात, तेव्हा त्या वातावरणीय आविष्काराला ‘प्रत्यावर्त’ किंवा ‘अपसारी चक्रवात’ या संज्ञा वापरल्या जातात. आवर्ताप्रमाणेच प्रत्यावर्त…

आवर्त (Cyclone)

वातावरणातील तीव्र कमी भाराच्या केंद्राभोवती सभोवतालच्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून मोठ्या प्रमाणावर चक्राकार वारे वाहतात, त्या आविष्काराला वातावरणविज्ञानात ‘आवर्त’ किंवा चक्रवात, अभिसारी चक्रवात, चक्री वादळ या संज्ञांनी संबोधले जाते. चक्रवाताचे दोन…

बॅक नदी (Back River)

कॅनडाच्या अगदी उत्तर भागातून वाहणारी नदी. तीला ग्रेट फिश नदी या नावानेही ओळखले जाते. या नदीची लांबी ९७५ किमी. असून पाणलोट क्षेत्र १,०६,००० चौ. किमी. आहे. या नदीचा उगम ग्रेट…

रॉबर्ट कॅम्बल (Robert Campbell)

कॅम्बल, रॉबर्ट (Campbell, Robert) : (२१ फेब्रुवारी १८०८ – ९ मे १८९४). कॅनडियन समन्वेषक, फरचा व्यापारी आणि शेतकरी. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लेन लायन/पर्थशर येथे झाला. त्यांना उत्तर अमेरिकेतील सरहद्द प्रदेशात…

युंगफ्राऊ शिखर (Jungfrau Peak)

स्वित्झर्लंडमधील बर्नीज आल्प्स या निसर्गसुंदर पर्वतश्रेणीतील एक प्रसिद्ध शिखर. या शिखराची उंची ४,१५८ मी. आहे. या शिखराच्या उत्तरेस बर्न कँटन, तर दक्षिणेस व्हॅले (व्हालस) कँटन आहे. वायव्येकडील इंटरलाकन आणि आग्नेयीकडील…

ज्वालामुखी कुंड (Volcanic Crater)

केंद्रीय स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे, ज्वालामुखीच्या माथ्यावरील निर्गमद्वाराशी (मुखाशी) खोलगट बशीसारखा खळगा तयार झालेला दिसतो. असा खळगा लहान म्हणजे साधारणपणे एक किमी. पेक्षा कमी व्यासाचा असल्यास त्याला ‘ज्वालामुखी कुंड’ म्हणतात आणि…