डोकेदुखी (Headache)
डोक्याच्या किंवा मानेच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या वेदनांना सामान्यपणे डोकेदुखी म्हणतात. जगभरातील सर्व मानवजातींमध्ये आढळणारे हे एक शारीरिक दु:ख आहे. मेंदूतील ऊती ह्या वेदनांना संवेदनाशील नसतात, कारण त्यांच्यात वेदनाग्राही चेतापेशी नसतात.…