केशर (Saffron)

खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण…

कोहळा (Ash gourd)

कोहळा ही वर्षायू वेल कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बेनिन्कासा हिस्पिडा असे आहे. ही वनस्पती मूळची जपान व इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार इतर प्रदेशांत झाले आहे. भारतात पंजाब, पश्चिम बंगाल…

कृष्णकमळ (Passion flower)

पॅसिफ्लोरेसी कुलातील सदाहरित किंवा निमसदाहरित वनस्पती. या कुलात सु. ४०० जाती असून प्रामुख्याने शोभेसाठी त्याची लागवड करतात. पॅसिफ्लोरा प्रजातीत एकूण सु. २४ जाती असून त्या सर्व मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत. या…

कोकम (Kokam butter tree)

कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्सीनिया इंडिका आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत केली जाते.…

द्राक्ष (Grape)

व्हायटेसी कुलातील व्हायटिस प्रजातीतील वनस्पतीच्या फळांना सामान्यपणे द्राक्ष म्हणतात. जगभर या वनस्पतीच्या सु. ६० जाती आहेत. मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या द्राक्षवेलीचे शास्त्रीय नाव व्हायटिस व्हिनिफेरा आहे. इतर दोन महत्त्वाच्या मानल्या…

खजूर (Date palm)

अ‍ॅरॅकॅसी म्हणजेच ताड, नारळ अशा पाम वृक्षांच्या कुलातील हा एक वृक्ष आहे. याच्या ओल्या फळांनाही खजूर म्हणतात. तसेच वाळविलेला खजूर म्हणजेच खारीक. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फिनिक्स डॅक्टिलिफेरा असे आहे. हा वृक्ष…

गुलमोहर (Peacock flower)

रस्त्याच्या कडेने शोभेसाठी व सावलीसाठी वाढविण्यात येणारा शोभिवंत वृक्ष. हा फॅबेसी कुलातील पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्स रेजिया आहे. गुलमोहर मूळचा मादागास्करमधील असून आता तो जगभर आढळतो. भारतातही तो सर्वत्र…

गवती चहा (Lemon grass)

एक सुवासिक वनस्पती. सुगंध येण्यासाठी या वनस्पतींची पाने चहामध्ये मिसळतात. गहू, ही वनस्पती पोएसी (गॅमिनी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन सिट्रेटस आहे. ही मूळची भारतातील असून समशीतोष्ण तसेच उष्ण प्रदेशांत वाढते.…

माड (Coconut palm)

नारळ हे फळ ज्या वनस्पतीपासून मिळते त्या वृक्षाला माड किंवा नारळाचे झाड म्हणतात. या वृक्षाचा समावेश अ‍ॅरॅकेसी कुलात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव कोकॉस न्यूसिफेरा आहे. माडाचे मूलस्थान आग्नेय…

मिरची (Chilli)

जगात सर्वत्र मसाल्यांमध्ये वापरला जाणारा एक पदार्थ. मिरची ही वनस्पती सोलॅनेसी कुलाच्या कॅप्सिकम प्रजातीतील आहे. बटाटा व टोमॅटो या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. मिरची ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून…

Read more about the article बटाटा (Potato)
Die Europäische Kommission hat Amflora, die gentechnisch optimierte Stärkekartoffel der BASF, für die kommerzielle Nutzung in Europa genehmigt. Damit kann die Kartoffel für die Erzeugung industrieller Stärke eingesetzt werden. Amflora, BASF's genetically optimized starch potato, has been approved by the European Commission for commercial application in Europe. The potato can now be used for the production of industrial starch.

बटाटा (Potato)

बटाटा ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोजम आहे. मिरची, वांगी व टोमॅटो या वनस्पतीही याच कुलात मोडतात. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी बटाटा ही एक…