(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मानवशास्त्र हे मानवप्राणी व त्याच्या कार्याचा सांगोपांग व सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र आहे. तसेच ते मानवाच्या जीवनशैलीचा व त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचा यथायोग्य परामर्श घेते. अँथ्रोपॉलॉजी या इंग्रजी शब्दाचा मानवशास्त्र हा पर्यायी शब्द असून ‘अँथ्रोपॉस’ म्हणजे ‘मानव’ या ग्रीक शब्दापासून तो बनला आहे. अँथ्रोपॉलॉजीला सुरुवातीच्या काळात ‘मानववंशशास्त्र’ असे म्हटले जात; परंतु या विषयात फक्त मानवी वंशाचाच अभ्यास होत नसून मानवाच्या अस्तित्वापासून ते वर्तमानस्थितीतल्या मानवाचा वैकासिक आलेख उलगडून दाखविण्यापर्यंतचा अभ्यास केला जातो. शिवाय वंश कल्पनाही आता त्याज्य झाली असल्यामुळे ‘मानववंशशास्त्र’ या शब्दाऐवजी व्यापक अर्थाने ‘मानवशास्त्र’ हा शब्द सयुक्तिक व सर्वमान्य झाला आहे.
मानव हा एक प्राणी आहे. मानवप्राणी व प्राणिजगतातील इतर प्राण्यांत काय साम्य अथवा फरक आहेत? मानवप्राण्याचे वैशिष्ट्य काय? इत्यादींचे तुलनात्मक अध्ययन मानवशास्त्र करते. याशिवाय मुख्यत्वेकरून यात मानवाच्या शारीरिक व सांस्कृतिक विकासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रचंड विश्वात माणूस कोण आहे? पृथ्वीवर तो अचानकपणे अवतरला की, उत्क्रांतीच्या मालिकेतील तो अखेरचा टप्पा आहे? मानवप्राण्याचे मूळ उगमस्थान जर एकच आहे, तर मानवात इतकी विविधता का? संस्कृतीचे स्वरूप काय व ती कशी बदलते? संस्कृती व व्यक्तिमत्व यांचे परस्पर संबंध काय आहेत? इत्यादी प्रश्नांचा उहापोह मानवशास्त्र करते.
मानवशास्त्राचे भौतिक किंवा शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्र आणि सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र हे दोन मुख्य विभाग असून या दोहोंचे अनेक उपविभाग आहेत. शारीरिक आणि जीवशास्त्रीय मानवशास्त्र हे मानवाची उत्पत्ती, उत्क्रांती, विविधता, शारीरिक वाढ, अनुवंशिकता इत्यादी जीवशास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास करते. त्यांपैकी आदिमानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करणारे पुरामानवशास्त्र होय. मानवाची संस्कृती, सांस्कृतिक उत्क्रांती, विविधता इत्यादींचा तौलनिक अभ्यास सामाजिक – सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो. मानवप्राणी व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधातून जैवविज्ञान व सामाजिक विज्ञान यांच्यातील दुवा जुळवता येतो. मानवी संस्कृतीचा अविष्कार वेगवेगळ्या मानवसमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळा पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येक संस्कृती एकात्म, स्वतंत्र आणि परिपूर्ण असते. क्षेत्रीय अभ्यास पद्धतीमुळे मानवशास्त्रज्ञांस संस्कृतीच्या सर्व उपांगांचे ज्ञान मिळते.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहेच; परंतु त्याआधी तो एक सजीव घटक आहे. मानवी समाज हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रचनांच्या बदलांतून वर्षानुवर्षे पुढे जात आहे. मानवी संस्कृती स्थलागणिक, समाजानुरूप बदलत जाते. वेगवेगळ्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, आहारविहाराचा मानवी शरीरावर, स्वरूपावर, मानवी संस्कृतीवर परिणाम होतो आणि त्यामुळेच शारीरिक विविधतेबरोबरच सांस्कृतिक विविधताही पाहावयास मिळते. मानवशास्त्र हे मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी परिवर्तनाचे तसेच त्यांच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यामुळेच मानवशास्त्र या विषयात मानवाच्या सर्वांगीण आणि सर्वव्यापक, तसेच प्राचीन मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतच्या सर्व मानवविषयक माहितीचे संकलन करून योग्य स्वरूपाची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे मराठी विश्वकोशाच्या ‘मानवशास्त्र ज्ञानमंडळा’चे उद्दिष्ट आहे.
सांस्कृतिक रोगपरिस्थितीविज्ञान (Cultural Epidemiology)

सांस्कृतिक रोगपरिस्थितीविज्ञान

सांस्कृतिक पार्श्वभूमीचा संदर्भ घेऊन केलेला रोगपरिस्थितीविज्ञानाचा अभ्यास. समाजातील सर्व लोकांच्या वागण्या-बोलण्याची, विचारांची, भावनांची, मुल्यांची गोळाबेरीज म्हणजे संस्कृती असे म्हणता येईल ...
सिद्दी जमात (Siddi Tribe)

सिद्दी जमात

एक भारतीय आदिवासी जमात. सिद्दी हे मुळचे आफ्रिका खंडातील आहेत. सुमारे ७५० वर्षांपूर्वी त्यांना पोर्तुगीजांनी गुलाम म्हणून भारतात आणले असावे ...
सुरजीतचंद्र सिन्हा (Surajit Chandra Sinha)

सुरजीतचंद्र सिन्हा

सिन्हा, सुरजीतचंद्र (Sinha, Surajit Chandra) : (१ ऑगस्ट १९२६ – २७ फेब्रुवारी २००२). प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बंगालमधील नेत्रोकोना ...
होपी जमात (Hopi Tribe)

होपी जमात

उत्तर अमेरिकेच्या अतिपश्चिमेकडील इंडियन समूहातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य ॲरिझोना राज्यात आढळते. मोकी किंवा मोक्वी या नावानेही ...
हौसा (Hausa)

हौसा

पश्चिम आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय मोठा वांशिक समूह. त्यांची वस्ती प्रामुख्याने उत्तर नायजेरिया आणि दक्षिण नायजर या प्रदेशांत आढळते. यांशिवाय सूदान ...
ॲलनचा नियम (Allen’s Rule)

ॲलनचा नियम

जैविक किंवा भौगोलिक परिस्थितिविज्ञानाबाबतचा एक नियम. हा नियम इ. स. १८७७ मध्ये जोएल आसफ ॲलन यांनी सर्वप्रथम मांडला. त्यांच्या मते, ...