(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ. स. सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात.

भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय. त्यांतून सम्राट हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकर नंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी वगैरे ग्रंथांतून मध्ययुगीन राजसत्तांविषयी माहिती मिळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास आहे. हे काही निवडक ग्रंथ सोडले तर या काळाविषयी बखरी, शिलालेख, प्रवासवर्णने, सनदा, नाणी इ. साधनांचा आधार घ्यावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची विभागणी तीन भागांत केली जाते. पूर्व मध्ययुग, मध्ययुग आणि उत्तर मध्ययुग. कनौजचा सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६–सु. ६४७) याचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला. तिथून पूर्व मध्ययुगाची सुरुवात मानली जाते. काही अभ्यासकांच्या मते गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर (इ. स. ५५५) पूर्व मध्ययुगाची सुरुवात होते. मध्ययुगीन कालखंडातील मध्याची सुरुवात १२ व्या शतकात होऊन त्याचा शेवट १६ व्या शतकात होतो. तर मोगल साम्राज्याचा उदय आणि त्यापुढील कालखंड हा उत्तर मध्ययुगीन कालखंड समजला जातो.

एकूणच जागतिक मध्ययुगीन इतिहासाबरोबर भारतातील पूर्व, मध्य आणि उत्तर मध्ययुगीन या कालखंडांतील १. राजवंश, २. राजे, ३. प्रसिद्ध व्यक्ती, ४. परकीय प्रवासी, ५. संत, ६. किल्ले, ७. वास्तू, मंदिरे, मूर्ती, वीरगळ, ८.सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थिती, ९. बखरी / इतिहासाची साधने, १०. उत्खनने आणि ११. मध्ययुगीन लढायांतील आयुधे इत्यादींवर योग्य, स्वतंत्र व संक्षिप्त नोंदी मराठी विश्वकोशाच्या या मध्ययुगीन इतिहास – भारतीय व जागतिक या ज्ञानमंडळात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांतील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन ६०० ते इसवी सन १८०० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी मध्ययुगीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे.

हातगड (Hatgad)

हातगड

महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सातमाळा डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून ३६५३ फूट उंचीवर आहे. नाशिक-सापुतारा मार्गावरील हातगड या ...
हेन्री एव्हरी (Henry Every)

हेन्री एव्हरी

हेन्री एव्हरी : (२० ऑगस्ट १६५९- ?). एक इंग्लिश खलाशी व समुद्री लुटारू. इ. स. १६९५ मधील गंज-इ-सवाई या मोगल ...
ॲबे कॅरे  (Abbe Carre)

ॲबे कॅरे  

फ्रेंच प्रवासी, इतिहासकार आणि कॅथलिक धर्मगुरू. पूर्ण नाव ॲबेडॉमीनुस बार्थेलिमे कॅरे दी चेंबॉन. त्याचा जन्म फ्रान्समधील चेंबॉन येथे झाला. त्याचे ...
ॲबे फारिया (Abbe Faria)

ॲबे फारिया

ॲबे फारिया : (३१ मे १७५६ – २० सप्टेंबर १८१९). प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मोपदेशक व संमोहनशास्त्राचा अभ्यासक. पूर्ण नाव जोसे कस्टोडिओ ...