(प्रस्तावना) पालकसंस्था : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. | समन्वयक : सचिन जोशी | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ. स. सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात.

भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय. त्यांतून सम्राट हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकर नंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी वगैरे ग्रंथांतून मध्ययुगीन राजसत्तांविषयी माहिती मिळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास आहे. हे काही निवडक ग्रंथ सोडले तर या काळाविषयी बखरी, शिलालेख, प्रवासवर्णने, सनदा, नाणी इ. साधनांचा आधार घ्यावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची विभागणी तीन भागांत केली जाते. पूर्व मध्ययुग, मध्ययुग आणि उत्तर मध्ययुग. कनौजचा सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६–सु. ६४७) याचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला. तिथून पूर्व मध्ययुगाची सुरुवात मानली जाते. काही अभ्यासकांच्या मते गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर (इ. स. ५५५) पूर्व मध्ययुगाची सुरुवात होते. मध्ययुगीन कालखंडातील मध्याची सुरुवात १२ व्या शतकात होऊन त्याचा शेवट १६ व्या शतकात होतो. तर मोगल साम्राज्याचा उदय आणि त्यापुढील कालखंड हा उत्तर मध्ययुगीन कालखंड समजला जातो.

एकूणच जागतिक मध्ययुगीन इतिहासाबरोबर भारतातील पूर्व, मध्य आणि उत्तर मध्ययुगीन या कालखंडांतील १. राजवंश, २. राजे, ३. प्रसिद्ध व्यक्ती, ४. परकीय प्रवासी, ५. संत, ६. किल्ले, ७. वास्तू, मंदिरे, मूर्ती, वीरगळ, ८.सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थिती, ९. बखरी / इतिहासाची साधने, १०. उत्खनने आणि ११. मध्ययुगीन लढायांतील आयुधे इत्यादींवर योग्य, स्वतंत्र व संक्षिप्त नोंदी मराठी विश्वकोशाच्या या मध्ययुगीन इतिहास – भारतीय व जागतिक या ज्ञानमंडळात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांतील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन ६०० ते इसवी सन १८०० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी मध्ययुगीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे.

 फतेहखानची स्वारी (Invasion of Fateh Khan)

 फतेहखानची स्वारी (Invasion of Fateh Khan)

स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्या ...
अकबर (Akbar the Great)

अकबर (Akbar the Great)

अकबर :  (१५ ऑक्टोबर १५४२–२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे ...
अंकाई टंकाई किल्ले (Ankai Tankai Forts)

अंकाई टंकाई किल्ले (Ankai Tankai Forts)

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी ...
अक्कलकोट संस्थान (Akkalkot State)

अक्कलकोट संस्थान (Akkalkot State)

ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम ...
अण्णाजी दत्तो : जमीन महसूल कामगिरी

अण्णाजी दत्तो : जमीन महसूल कामगिरी

छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव (सुरनीस) आणि स्वराज्यातील जमीन महसूल व्यवस्थेतील एक प्रमुख कारभारी. छ. शिवाजी महाराजांनी निजामशाहीचा सरदार ...
अफजलखान (Afzal Khan)

अफजलखान (Afzal Khan)

अफजलखान मुहम्मदशाही : (? – १० नोव्हेंबर १६५९). विजापूरच्या आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार व सेनानी. त्याच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती ज्ञात ...
अफानासी निकितीन (Afanasy Nikitin)

अफानासी निकितीन (Afanasy Nikitin)

निकितीन, अफानासी : (१४३३ – १४७२). (अफानस न्यिकीत्यिन). भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी. रशियातील त्वेर येथे त्याचा जन्म झाला ...
अब्दुल रझाक (Abd al – Razzak Samarqandi)

अब्दुल रझाक (Abd al – Razzak Samarqandi)

रझाक, अब्द-अल् : (६ नोव्हेंबर १४१३–?ऑगस्ट १४८२). मध्ययुगीन फार्सी इतिहासकार. त्याचा जन्मसमरकंद (उझबेकिस्तान) येथे एका मुस्लिम धर्मोपदेशकाच्या कुटुंबात झाला. त्याचे ...
अमोघवर्ष पहिला (Amoghvarsha I)

अमोघवर्ष पहिला (Amoghvarsha I)

अमोघवर्ष, पहिला : (सु. ८०८ ? – ८८० ?). राष्ट्रकूट वंशातील एक राजा. तिसरा गोविंद ह्याचा एकुलता एक मुलगा. पित्याच्या मृत्यूनंतर हा बालवयातच ...
अरब-मराठे संबंध (Arab-Maratha relations)

अरब-मराठे संबंध (Arab-Maratha relations)

ओमानचे अरब राजे आणि छ. शिवाजी महाराज यांच्यातील संबंध. व्यापार आणि पोर्तुगीजांसारखा समान शत्रू या दोन कारणांमुळे हे संबंध निर्माण ...
अर्काटचे नबाब (Nawab of Arcot)

अर्काटचे नबाब (Nawab of Arcot)

अर्काटचे नबाब : मोगल काळात कर्नाटकच्या नबाबांनाच अर्काटचे नबाब म्हणत. प्राचीन काळी राष्ट्रकूट, चालुक्य, चोल, पल्लव, यादव, नायक व अखेर, मराठे ...
अर्नाळा किल्ला (Arnala fort)

अर्नाळा किल्ला (Arnala fort)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जलदुर्ग व पर्यटनस्थळ. वैतरणा नदीच्या मुखावर समुद्रकिनाऱ्यापासून पाव किमी.वर तो समुद्रात बांधला आहे. उत्तर कोकणातील ...
अलाउद्दीन हसन गंगू बहमनी (Alu-ud-Din Bahman Shah)

अलाउद्दीन हसन गंगू बहमनी (Alu-ud-Din Bahman Shah)

अलाउद्दीन हसन गंगू बहमनी : (कार. ऑगस्ट १३४७–फेब्रुवारी १३५८). मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेल्या बहमनी सत्तेचा संस्थापक व एक कर्तबगार ...
अल् मसूदी (Al-Masudi)

अल् मसूदी (Al-Masudi)

मसूदी, अल् : (८९६ — ९५७). अरब प्रवासी, इतिहासकार व भूगोलज्ञ. त्याचे पूर्ण नाव अबू-अल्-हसन-अली-इब्न हुसेन अल्-मसूदी. तो मुहंमद पैगंबर ...
अल्- बीरूनी (Al-Biruni)

अल्- बीरूनी (Al-Biruni)

बीरूनी, अल्- : (४ सप्टेंबर ९७३ – ? डिसेंबर १०४८ ?) मध्य आशियातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार, तत्त्वचिंतक व ...
असीरगड आणि फारुकी राजवट (Asirgarh Fort & Farooqui dynasty )

असीरगड आणि फारुकी राजवट (Asirgarh Fort & Farooqui dynasty )

मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला. बुरहानपूरपासून उत्तरेला २० किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून सु. ८५० फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आहे ...
अहमदशाह बहमनी (Ahmad Shah Bahmani)

अहमदशाह बहमनी (Ahmad Shah Bahmani)

बहमनी साम्राज्याचा नववा सुलतान (कार.१४२२–१४३६). मूळ नाव शियाबुद्दीन अहमद. पहिला अहमदशाह म्हणून ओळख. हा चौथा बहमनी सुलतान दाऊदशाहचा मुलगा, तर ...
आंग्रे घराण्याची नाणी

आंग्रे घराण्याची नाणी

मराठेशाहीचे सरखेल ठरलेले कान्होजी आंग्रे व त्यांच्या वंशजांनी पाडलेली नाणी. आंग्रे हे तत्त्वत: छत्रपतींचे आधिपत्य मानत असले, तरी व्यवहारात बहुतांशी ...
आंतोन्यो मॉन्सेरात (Antonio Monserrate)

आंतोन्यो मॉन्सेरात (Antonio Monserrate)

मॉन्सेरात, आंतोन्यो : ( १५३६–१५ मार्च १६०० ). परकीय प्रवासी व स्पॅनिश जेझुइट धर्मगुरू. त्याचा जन्म स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतातील विक ...
आवजी कवडे (Avaji Kavde)

आवजी कवडे (Avaji Kavde)

कवडे, आवजी : (मृत्यू १७४९). अठराव्या शतकातील एक शूर आणि पेशव्यांचे निष्ठावान मराठा सरदार. त्यांचा जन्म नेमका कुठे व केव्हा ...