अन्वस्तीय सौरचूल (Parabolic Solar Cooker)

सूर्याकडून प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या (Electromagnetic waves) रूपातील ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. हे तरंग जेव्हा एखाद्या वस्तूवर (matter), घन किंवा द्रव पदार्थावर आदळतात, तेव्हा त्या तरंगांमध्ये असलेल्या ऊर्जेमुळे पदार्थातील…

ओपेक (Opec)

पार्श्वभूमी : खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी ही एक बहुराष्ट्रीय संघटना आहे . तेरा सभासद देश असलेल्या  ‘ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज’ (Opec) या संस्थेची  स्थापना सप्टेंबर १९६०…

चित्तभूमी (Chitta Bhumi)   

चित्तामधील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये परिवर्तन झाल्याने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था होतात. आपले चित्त जरी एकच असले, तरी कधी आनंद तर कधी दुःख अनुभवाला येते. कधी काम करण्यास…

महामुद्रा (Mahamudra)

हठयोगातील प्रमुख मुद्रांपैकी थोर वा श्रेष्ठ असा एक मुद्राप्रकार. योगाभ्यासाच्या दृष्टीने मुद्रा म्हणजे शरीराच्या विविध अवयवांची विशिष्ट स्थिती अथवा शरीराचा विशिष्ट आविर्भाव. महामुद्रा हा बैठा आसनप्रकार आहे. हठप्रदीपिकेत (३.६-७) जरा…

निद्रा

योगदर्शनानुसार निद्रा ही चित्ताच्या पाच वृत्तींपैकी एक वृत्ती आहे. झोपल्यानंतर ज्यावेळी स्वप्ने पडतात तिला स्वप्नावस्था व ज्यावेळी स्वप्नविरहित शांत झोप लागते, तिला सुषुप्ती अवस्था (गाढ निद्रा) असे म्हणतात. ‘निद्रा’ या…

चार धावी पेट्रोल एंजिनाचे कार्य (Working of four stroke petrol engine)

अंतर्ज्वलन ( Internal combustion) एंजिनाच्या  ज्वलन कक्षातील( combustion chamber) दट्ट्या ( piston) सतत वर खाली  होत  असतो . जेव्हा दट्ट्या ज्वलन कक्षातील उच्चतम  स्थानापासून (Top Dead Centre, T.D.C.), ज्वलन कक्षातील…

बंध

अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुष (आत्मा) चित्ताशी तादात्म्याचा अनुभव करतो व स्वत:ला चित्ताद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा कर्ता समजतो. या कर्तृत्वाच्या अभिमानामुळे केल्या जाणाऱ्या क्रियांचे फळ आत्म्याला अनुभवावे लागते व तो जन्म-मृत्यूच्या…

अथ

महर्षी पतंजलींनी लिहिलेल्या योगसूत्रांची सुरुवात ‘अथ’ या शब्दाने होते. ‘अथयोगानुशासनम्’ अर्थात् ‘गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रचलित योगशास्त्राचा आरंभ होत आहे’ हे पहिले योगसूत्र आहे. योगसूत्राप्रमाणेच वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दर्शनांच्या सूत्रग्रंथांची…

खेचरी मुद्रा (Khechari Mudra)

योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा. ही मुद्रा जिभेशी संबंधित असून ती शारीरिक, मानसिक तसेच शरीरांतर्गत ग्रंथींचे कार्य प्रभावित करणारी आहे. यामुळे सूक्ष्म असा परिणाम साधणाऱ्या ह्या मुद्रेला राजयोग, हठयोग व वेदांत…

के. सी. भट्टाचार्य (K. C. Bhattacharya)

भट्टाचार्य, के. सी. : (१२ मे १८७५ ‒ ११ डिसेंबर १९४९). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथील सेरामपूर या गावी झाला. त्यांचे आजोबा उमाकांत तर्कालंकार…

एमू (Emu)

हा पक्षिवर्गाच्या कॅझुअॅरिफॉर्मिस (Casuariiformes) गणातील ड्रोमॅइडी (Dromaiidae) कुलातील पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रोमेयस नोव्हीहॉलँडिई (Dromaius novaehollandiae) असे आहे. हा पक्षी मूळचा ऑस्ट्रेलियातील असून उघड्या मैदानी प्रदेशात तो राहतो. एमू…

धारणा (Dharana)

अष्टांगयोगापैकी धारणा हे योगाचे सहावे अंग होय. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगाची बहिरंग साधने आहेत तर धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधने होत. पतंजलींनी “देशबन्धश्चित्तस्य धारणा|”…

घेरण्डसंहिता (Gheranda Samhita)

हठयोगावरील संस्कृत भाषेतील महत्त्वाचा पद्यग्रंथ. संहिता म्हणजे संग्रह अथवा विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी. हठयोगावर गोरक्षसंहिता, हठयोगप्रदीपिका, घेरण्डसंहिता  आणि शिवसंहिता  हे ग्रंथ प्रमाण मानले जातात. मुनिवर्य घेरण्ड यांनी चंडकपाली नावाच्या जिज्ञासू राजाला…

प्राण (योगविज्ञान)

प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पाच प्रमुख प्राण तसेच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण मानवी देहातील नाड्यांमध्ये संचार करतात. प्राणवायू हृदयात, अपानवायू गुदास्थानामध्ये, समानवायू नाभिप्रदेशामध्ये,…

अकल्पिता वृत्ति (Akalpitā Vritti)

अकल्पिता वृत्तीचे दुसरे नाव महाविदेहा असे आहे. महाविदेहा ही योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धींपैकी एक असून योगसूत्रातील विभूतिपादामध्ये हिचे वर्णन आलेले आहे. महाविदेहा वृत्ती समजण्याकरिता प्रथम विदेह वृत्ती समजणे आवश्यक आहे. ‘वि-देहा’…