कास्थिमत्स्य (Chondrichthyes)
कास्थिमत्स्य हा मत्स्य अधिवर्गाचा एक वर्ग आहे. ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल कूर्चेपासून (कास्थिंपासून) बनलेला असतो, त्यांना कास्थिमत्स्य म्हणतात. ग्रीक भाषेतील chondra (cartilage; कूर्चा/कास्थी) व ichthys (fish; मत्स्य/मासा) अशा दोन शब्दांच्या…
