अधिकार दृष्टीकोन (Entitlement Approach)

गरीबी, वंचितता, दुष्काळ, दारिद्र्य व भूकबळी यांचे विश्लेषण करणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. यालाच अधिकारिता तत्त्व असेही म्हणतात. या संकल्पनेचे विश्लेषण प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्रात केले जाते. प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन…

कोअर बँकिंग (Core Banking)

भारतीय बँकिंग प्रणालीत वापरण्यात आलेले सर्वांत पहिले तंत्रज्ञान म्हणजे कोअर बँकिंग यंत्रणा होय. कोअर बँकिंगमुळे ग्राहकाला कोणत्याही बँकेच्या शाखेमधून व्यवहार करता येतो आणि त्या व्यवहाराची माहिती केंद्रीय बँकेत जमा होते.…

भांडवलाचे संचारण (Capital Flight)

अधिक स्थिरता किंवा भांडवलावरील वाढीव उच्च परतावा या मुख्य उद्देशाने भांडवलाच्या एका गुंतवणुकीतून दुसऱ्या गुंतवणुकीची चळवळ म्हणजे भांडवलाचे संचारण होय. काही वेळा विशेषत: उच्च चलनवाढ किंवा राजकीय अस्थिरता या जोखीम…

मानवसदृश कपी (Anthropoid Ape)

गोरिला, चिंपँझी, ओरँगउटान व गिबन या प्राण्यांत आणि मानवांत असलेल्या साम्यामुळे त्यांना ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. या प्राण्यात व मानवांत अनेक बाबतींत साम्य आढळून येते; पण विशेषतः कवटी, दात, मेंदू…

मुक्त व दूरशिक्षण (Open and Distance Education)

मुक्त व दूरशिक्षण ही एक अध्ययन अध्यापनाची पद्धती आहे. या पद्धतींनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत महाक्रांती घडविली असून ‘सर्वांसाठी उच्च शिक्षण’ हे या शिक्षण पद्धतीचे ध्येय आहे. यामध्ये अध्ययनार्थीस (विद्यार्थी)…

इव्हान इलिच (Ivan Illich)

इलिच, इव्हान (Illich, Ivan) : (४ सप्टेंबर १९२६ – २ डिसेंबर २००२). प्रसिद्ध ऑस्ट्रियन शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, सामाजिक समीक्षक आणि रोमन कॅथलिक धर्मगुरू. इलिच यांचा जन्म व्हिएन्ना येथे एका संपन्न…

आचार रसायन

आचार म्हणजे आचरण व रसायन म्हणजे उत्तम दर्जाचे, गुणवत्तेचे शरीर घटक आणि धातू उत्पत्तीसाठीची विशेष चिकित्सा होय. वास्तविक पाहता रसायन चिकित्सा ही शरीरातील दूषित दोष व धातूंची चिकित्सेपश्चात दोषांचा समतोल…

वर्णहीनता (Albinism)

वर्णहीनता म्हणजे कोड होय. यास विवर्णता किंवा धवलता असेही म्हणतात. प्रामुख्याने अप्रभावी जनुकांमुळे (रिसेसिव्ह जिन्स) वर्णहीनता उद्भवते. मानवी त्वचेमध्ये कृष्णरंजक अथवा कालिकण (मेलॅनिन) हे द्रव्य असते, जे त्वचेला रंग प्राप्त…

मानसशास्त्रीय मानवशास्त्र (Psychological Anthropology)

मानसशास्त्रीय मानवशास्त्रात म्हणजे मानवशास्त्रीय संकल्पना व पद्धती यांचा वापर करून केला जाणारा मानसशास्त्रीय विषयाचा अभ्यास होय. यात मानवशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा सुरेख संगम दिसून येतो. या शाखेंतर्गत मानवप्राण्यांच्या वर्तनाचा तौलनिक…

जी ७ (G 7 – Group of Seven)

जगातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण असलेल्या सात अर्थव्यवस्थेचा एक गट. जी ७ ची स्थापना १९७६ मध्ये जी ६ या गटामधून झाली. जी ६ या गटात फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड स्टेट्स…

जी २० (G 20)

जी २० गट हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा एक अग्रगण्य मंच आहे. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया,…

वंध्यत्व (Infertility)

(इन्‌फर्टिलिटी). प्रजनन करण्याची असमर्थता. सूक्ष्मजीवांपासून ते वनस्पती, प्राणी, मानवापर्यंत सर्व प्रकारांच्या सजीवांसाठी वंध्यत्व ही संज्ञा लागू होते. एखाद्या वनस्पतीला अविकसित प्रजोत्पादक अवयवांमुळे वंध्यत्व येऊ शकते. जर पुंकेसर आणि जायांग अविकसित…

ताळ्ळपाक अन्नमाचार्य (Tallapaka Annamacharya)

ताळ्ळपाक अन्नमाचार्य : (सु. १४०८–१५०३). प्रख्यात कीर्तनरचनाकार, गायक, संगीतकार व तेलुगू कवी. अन्नमाचार्यांना ‘गीतसाहित्य-पितामह’, ‘वाग्गेयकार’, ‘संकीर्तनाचार्य’ इत्यादी सार्थ बिरुदे लावली जातात. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील ताळ्ळपाक या गावी नारायण सूरी…

आनुवंशिकता (Heredity)

एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही – ही प्रक्रिया घडून येते. आधुनिक मानवी संस्कृती स्थिर होण्यापूर्वी…

मानकुतूहल आणि राग दर्पण (Maankutuhal and Raag Darpan)

फकीरुल्ला कृत ‘रागदर्पण’ या संगीतविषयक ग्रंथाचा विचार सुटेपणाने न करता ‘मानकुतुहल’ या ग्रंथासह एकत्रितपणे त्याचा परामर्श घेणे उचित ठरते, कारण ‘रागदर्पण’ हा ग्रंथ ‘मानकुतूहल’ ह्या ग्रंथाचा, काहीशी भर घालून केलेला,…