ऊर्जा संसाधने (Energy resources)

घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा ( उष्णता, प्रकाश किंवा वीज ) मिळविण्यासाठी जे पदार्थ अथवा वस्तू वापरल्या जातात, त्यांना ऊर्जा संसाधने म्हणतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे…

ज्वालामुखी (Volcano)

एक पर्यावरणीय आपत्ती. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर होणाऱ्या तप्त पदार्थांच्या हालचाली. या हालचालींमुळे भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे किंवा भूपृष्ठावर ढकलले जातात. याला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. पृथ्वीचा अंतर्भाग…

परिग्राम (Ecovillage)

परिसंस्थासमृद्ध वस्ती किंवा पर्यावरणपूरक वस्ती. नैसर्गिक पर्यावरणाला बाधा न आणता आरोग्यदायी मानवी विकास आणि भविष्यातील यशस्वी जीवनास पोषक कार्ये करणाऱ्या लोकसमूहाची वस्ती. सामाजिक, आर्थिक तसेच पारिस्थितिकी दृष्टीने शाश्वतक्षम जीवनाच्या ध्येयाने…

पर्यावरण व्यवस्थापन (Environment management)

मानवी कृतींमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयांसाठी जाणीवपूर्वक केलेली कृती. पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक…

पर्यावरणीय आपत्ती (Environment hazards)

नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक…

कृषी प्रदूषण (Agricultural pollution)

कृषी व्यवसायाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या कार्यांमुळे उद्‍भवणारे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाचे मानव व इतर सजीवांस अपायकारक असणारे प्रदूषण, म्हणजे कृषी प्रदूषण. कृषी व्यवसायात बी-बियाणे, पाणी, खते, कीटकनाशके, मानवी श्रम आणि ऊर्जा…

अवसादन (Sedimentation)

जलसंस्करण (शुद्धीकरण) प्रक्रियेत पाण्याचे गाळण करण्यापूर्वी त्या पाण्यातील घनद्रव्ये बाहेर काढण्याची क्रिया. अवसादनात द्रव व सूक्ष्म घन पदार्थ यांच्या मिश्रणातील घन पदार्थ वेगळे केले जातात. अपशिष्ट जल व घन पदार्थांमुळे…

आर्द्रभूमी परिसंस्था (Wetland ecosystem)

भूमी आणि जलाशय यांच्या संक्रमण पट्ट्यातील परिसंस्था. भौमिक आणि जलीय प्रणालींच्या संक्रमण भागातील साधारणपणे जलपृष्ठाजवळ किंवा जलपृष्ठाइतकी जलपातळी असलेल्या भूमीवरील परिसंस्था म्हणजे ‘आर्द्रभूमी परिसंस्था’ होय. सागरी किनारा, खारफुटी क्षेत्र, प्रवाळ…

आल्पीय वनस्पती (Alpine plants)

पर्वतावरील वृक्षरेषेहून अधिक उंचीच्या प्रदेशात वाढणार्‍या वनस्पती. उंच पर्वताच्या शिखराकडे वर जाताना आणि ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना वृक्षरेषेपुढील क्षेत्रात वृक्षांची वाढ होऊ शकत नाही. आल्प्स, हिमालय आणि इतर उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये…

अभयारण्य (Sanctuary)

भारतामध्ये केंद्र शासनाने वन्य जीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत. हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व राज्यस्तरीय वनोद्याने या तीन प्रमुख प्रकारांत आढळून येतात. वन्य जीव व त्यांचे…

अपघटन (Decomposition)

परिसंस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया. मृत सेंद्रियघटकांतील सेंद्रिय रेणूंचे साध्या व कमी ऊर्जेच्या असेंद्रियसंयुगांमध्ये सावकाश रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे 'अपघटन'. संकीर्ण पदार्थ क्षीण होऊन त्याचे तुकडे होण्याच्या क्रियेससुद्धा अपघटन म्हणतात. हे संकीर्ण…

अध:पृष्ठीय जल (Sub-surface water)

पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ म्हणतात. अध:पृष्ठीय जलाचे वर्गीकरण संतृप्त क्षेत्र आणि वातन क्षेत्र असे केले जाते. संतृप्त क्षेत्रामध्ये…

Read more about the article अनाच्छादन (Denudation)
अनाच्छादित भूप्रदेश, वेल्लारी, कर्नाटक राज्य

अनाच्छादन (Denudation)

पर्यावरणातील एक प्रभावी प्रक्रिया. अनाच्छादन म्हणजे आवरण किंवा आच्छादन निघणे किंवा काढणे. भूपृष्ठ हे पृथ्वीचे आवरण आहे. हे आवरण अनेक थरांचे आहे. अपक्षय, वहन, क्षरण आणि निक्षेपण या परस्पर पूरक…

अजेन्डा-२१ (Agenda-21)

एकविसाव्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबत केलेला एक आराखडा. इ.स. १९९२ मध्ये ब्राझीलमधील रीओ दे जानेरो येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषद(युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरनमेंट अँड डेव्हलपमेंट) झाली. ही…

त्सुनामी (Tsunami)

परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटा. जपानी भाषेत या लाटांना त्सुनामी म्हणतात. हाच शब्द आता सर्वत्र वापरला जातो. महासागर अथवा मोठ्या जलाशयाच्या तळभागावर भ्रंश किंवा भेगा पडल्यास त्या…