(इलेक्ट्रॉनिक डेटाबेस). संगणकाद्वारे जलद शोध आणि पुनर्प्राप्तीसाठी विशेषीकृत सुसंघटीत केलेला माहितीचा संग्रह. डेटाबेसची संरचना विविध माहिती-प्रक्रियांसह माहितीची साठवणुक (storage), पुनर्प्राप्ती (retrieval), सुधारित (modification) आणि गाळणे (delete) इ. क्रियांना सुलभ करण्यास मदत करते. डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (database management system; DBMS; डिबीएमएस) विचारलेली चौकशी उत्तराच्या माहिती स्वरूपात डेटाबेसमधून देते.

डेटाबेस निर्माता सामान्यत: माहितीच्या प्रक्रियेस समर्थन देणाऱ्या मार्गाने प्रत्यक्षात घडवण्याच्या पद्धतीमध्ये माहितीचे आयोजन करतात, उदा., हॉटेलमधील खोल्यांची अशा पद्धतीने मांडणी करणे जेणेकरून रिक्त असलेल्या खोल्या शोधण्यास मदत होते.

फाइल (File) किंवा फाइलचा संच या स्वरूपात डेटाबेस साठवला जातो. या फाइलमधली माहिती कदाचित रेकॉर्डच्या (Record) स्वरूपात मोडली जाऊ शकते. प्रत्येक रेकॉर्ड ही एक किंवा अधिक अशा फील्डस् (Fields) असतात. फील्ड हे माहिती साठवण्याचे एकक आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये डेटाबेसने वर्णन केलेल्या एका बाबीवर किंवा संपूर्ण गुणधर्माशी संबंधित विशिष्ट माहिती असते. रेकॉर्ड यांची सारण्यांच्या (Tables) स्वरूपात मांडणी करण्यात येते, त्यात विविध फील्डमधील असणारा संबंध माहितीच्या स्वरूपात असताे.

संगणकातील फाइलमधील माहितीच्या संग्रहास डेटाबेस सहजपणे लागू गेला जात असला तरी, डेटाबेस हा समर्थपणे संदर्भ-पडताळणीची (क्रॉस-रेफरेन्सिंग; cross-referencing) क्षमता प्रदान करतो. कळीचे शब्द (Keywords) आणि विविध प्रकारचे आदेश (commands) यांचा वापर करून वापरकर्ता जलद शोध, पुनर्व्यवस्थापित, गट तयार करणे आणि विविध रेकॉर्ड परत मिळविण्याकरिता फील्डची निवड करणे किंवा विशिष्ट संचयित माहितीवर अहवाल तयार करणे इ. कामे करू शकतो.

एसक्यूएलने निवडलेला  तक्ता आणि त्याचा परिणाम

डेटाबेस मधील रेकॉर्ड आणि फाइलची माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी व्यवस्थित आयोजित केलेल्या असतात. एखाद्या बाबीची चौकशी ही डेटाबेसमधील माहिती पुनर्प्राप्त करण्याचा मुख्य मार्ग आहे. सारण्यांनी दिलेल्या मूलभूत गोष्टीपासून नवीन संबंध परिभाषित करणे आणि त्याचा वापर विचारलेल्या चौकशीला प्रतिसाद देण्याकरिता करणे, ही डिबीएमएसची क्षमता आहे. थोडक्यात, वापरकर्ता वर्णाची मालिका (String of Character) प्रदान करतो आणि संगणक संबंधित श्रेणीतील डेटाबेसचा शोध घेतो आणि ज्यात ती वर्ण असतात त्यातील मूळ स्रोत प्रदान करतो/प्रदर्शित करतो. तसेच वापरकर्ता संपूर्ण रेकॉर्डमधील ज्या फील्डमध्ये विशिष्ट मजकूर आहे त्याचा शोध घेऊ शकतो.

मोठा डेटाबेस वापरणारे पुष्कळसे वापरकर्ते दिलेल्या वेळेत त्वरीत माहिती मिळविण्याकरिता सक्षम असतात. शिवाय मोठे व्यवसाय आणि इतर संस्था यांमध्ये संबंधित आणि आच्छादित डेटा (overlapping data) असलेली अनेक स्वतंत्र फाइल तयार करण्याची प्रवृत्ती असते आणि त्यांच्या माहिती-प्रक्रिया क्रियांमध्ये बऱ्याचदा अनेक फाइलीमधील माहितीची दुवा साधणे आवश्यक असते. सपाट (flat), श्रेणिबद्ध (hierarchical), नेटवर्क (network), संबंध (relational) आणि वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्ट ओरिएंटेड; Object-oriented) या प्रकारच्या गरजांना साहाय्य करण्यासाठी विविध प्रकारच्या डिबीएमएस विकसित करण्यात आले आहेत.

डेटाबेसचे प्रकार : सुरुवातीला प्रणालींची रचना क्रमवारीनुसार करण्यात आली होती. उदा., वर्णक्रमानुसार, संख्यात्मक किंवा कालक्रमानुसार. माहिती साठवणुकीच्या उपकरणांच्या विकासामुळे अनुक्रमणिकांद्वारे माहितीमध्ये सहजरित्या प्रवेश करणे शक्य झाले. सपाट डेटाबेसमध्ये (Flat database) रेकॉर्ड सोप्या यादीनुसार आयोजित केला जातो. वैयक्तिक संगणकामधील साधे डेटाबेस या सपाट पद्धतीनेच आयोजित करण्यात येतात. श्रेणिबद्ध डेटाबेसमध्ये (Hierarchical database) रेकॉर्ड झाडासारख्या संरचनेत आयोजित करण्यात येतो. रेकॉर्डमधील प्रत्येक स्तर हा फांद्यांप्रमाणे छोट्या श्रेणींच्या संचात विभाजित असतो. श्रेणिबद्ध डेटाबेसमध्ये विविध स्तरातील रेकॉर्डच्या संच्याचा एक दुवा असताे. या उलट नेटवर्क डेटाबेसमध्ये (Network database) दुव्यांद्वारे अथवा पाँटरद्वारे विविध संचात अनेक दुवे तयार करण्यात येतात. नेटवर्क डेटाबेसची गती आणि विविधांगी उपयोग यांमुळे व्यापार आणि ई-कॉमर्समध्ये त्यांचा व्यापक वापर करण्यात येतो. फाइल किंवा रेकॉर्ड यांमधील संबंध जर दुव्यांद्वारे दाखविण्यासाठी संबंध डेटाबेस (रिलेशनल डेटाबेस; Relational Database) वापरण्यात येतो. यामध्ये एक साधी सपाट यादी एका सारणीची एक पंक्ती किंवा “संबंध” दर्शविते आणि त्यातील एकाधिक संबंध इच्छित माहिती मिळविण्यासाठी गणिताशी संबंधित असू शकतात. संबंध डेटाबेसकरिता एसक्यूएलचे (SQL; Structured Query Language) विविध प्रकार डिबीएमएसमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. वस्तुनिष्ठ डेटाबेस (Object oriented database) आधिक जटिल स्वरूपाची माहिती साठवू आणि हाताळू शकतात, त्यालाच “वस्तू (object)” असे म्हणतात, त्याला श्रेणिबद्ध वर्गात आयोजित करण्यात येते. ही डेटाबेस संरचना सर्वात लवचिक आणि सहज जुळवून घेण्यायोग्य आहे.

इतिहास : डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली एक संगणक सॉफ्टवेअर अनुप्रयोग ‍(Software application) आहे, ज्याद्वारे अंतिम-वापरकर्त्यांसह, इतर अनुप्रयोगांसह आणि डेटाबेसशी परस्परसंवाद साधून डेटाचे विश्लेषण करण्यात येते. सामान्य प्रयोजन डिबीएमएस डेटाबेसची परिभाषा, निर्मिती, चौकशी, अद्यतन आणि प्रशासन यांसाठी परवानगी देतो. डेटाबेस साधारणपणे डिबीएमएस विशिष्ट स्वरूपात संग्रहित केला जातो जो पोर्टेबल नाही, परंतु भिन्न डिबीएमएस म्हणजे एसक्यूएल (MySQL) आणि ओडिबीसी (ODBC) किंवा जेडिबीसी (JDBC) सारख्या मानदंडाद्वारे माहिती सामायिक करू शकतात.

संगणकशास्त्रज्ञ डेटाबेस व्यवस्थापन प्रणालींचे वर्गीकरण करू शकतात. 1980च्या दशकात संबंध डेटाबेस प्रभावी ठरले. ही नमुना माहिती सारण्यांच्या मालिकेमध्ये पंक्ती आणि स्तंभ म्हणून आणि बहुसंख्य माहिती लिहिण्यासाठी आणि चौकशीसाठी एसक्यूएल (SQL) वापरतात. 2000 च्या दशकात अ-संबंधित डेटाबेसेस लोकप्रिय झाले, त्यांना वेगळ्या चौकशी (query) भाषेचा वापर करता यावा म्हणून त्यांना एनओएसक्यूएल (NoSQL) असे म्हटले जाते.

माहितीची पंक्ती, स्तंभ आणि सारण्यांमध्ये मांडणी केली जाते आणि संबंधित माहिती शोधण्यासाठी अधिक सोपे होते. माहिती अद्ययावत, विस्तारित आणि गाळणे करणे शक्य आहे. मोठ्या मेनफ्रेम प्रणालींमध्ये डेटाबेस प्रचलित आहेत, परंतु लहान वितरीत कार्यस्थान आणि आयबीएमच्या एएस/400 आणि वैयक्तिक संगणकांसारखे मध्य-श्रेणी प्रणालीमध्ये देखील डेटाबेस उपलब्ध आहेत.

अनुप्रयोग : व्यावसायिक डेटाबेस अनुप्रयोगांमध्ये (database application) विमान आरक्षणे, उत्पादन व्यवस्थापन कार्ये, रुग्णालयांमधील वैद्यकीय नोंदी आणि विमा कंपन्यांच्या कायदेशीर नोंदींचा समावेश आहे. सर्वात मोठा डेटाबेस सामान्यत: सरकारी संस्था, व्यवसाय संस्था आणि विद्यापीठांद्वारे व्यवस्थापित केला जातो. या डेटाबेसमध्ये सारांश, अहवाल, कायदेशीर कायदे, वायर सेवा, वर्तमानपत्र आणि जर्नल्स, विश्वकोश आणि विविध प्रकारच्या सामग्रीचे मजकूर असू शकतात. संदर्भ डेटाबेसमध्ये ग्रंथसंग्रह किंवा अनुक्रमणिका असतात जी पुस्तके, नियतकालिक आणि अन्य प्रकाशित साहित्यातील माहितीच्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून काम करतात. कायदे, औषधोपचार आणि अभियांत्रिकीपासून ते वृत्तांत आणि सद्य घटना, खेळ, वर्गीकृत जाहिराती आणि शिकवण्या पाठ्यक्रमांपर्यंतचे विषय व्यापून टाकणारे हे हजारो सार्वजनिकरित्या प्रवेश करण्यायोग्य डेटाबेस आता अस्तित्त्वात आहेत.

पूर्वी डेटाबेस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात माहिती-वखार (डेटा वेअरहाउस; Data warehouse) म्हणून एकत्रित केले जात असे. व्यवसाय आणि सरकारी संस्था विविध नमुन्यांकरिता माहितीच्या अनेक पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी माहिती-खनन (डेटा मायनिंग; Data mining) सॉफ्टवेअर वापरतात.

कळीचे शब्द : #database #data #datawarehouse  #datamining #संगणक #electronicdatabase #storage

संदर्भ :

समीक्षक  : विजयकुमार नायक