(डॉस; DOS). संगणक आणि वापरकर्ता यांचा संवाद व्हावा यासाठी माध्यमाची गरज असते. हा संवाद आज्ञावलीच्या माध्यमातून साधला जातो, त्या आज्ञावलीला परिचालन प्रणाली असे म्हणतात. परिचालन प्रणाली ही सॉफ्टवेअरचा महत्त्वाचा भाग आहे. डॉस ही एक परिचालन प्रणाली आहे. संगणकाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी डॉस हे एक महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे. सर्वप्रथम परिचालन प्रणाली म्हणून डॉसचा वापर करण्यात आला. डॉसला टिमोथी पॅटरसननी तयार केले आणि नंतर १९८१ मध्ये त्याला मायक्रोसॉफ्ट कंपनीने लोकांसमोर आणले, त्याला नंतर एमएस-डॉस (MS-DOS) असे नाव देण्यात आले. हि परिचालन प्रणाली पूर्णपणे कमांडवर (आदेशावर) आधारित असल्यामुळे, जर संगणकाकडून काही काम करून घ्यायचे असेल तर त्याला कमांड द्यावी लागत असे. ही कॉन्सोलमोड आधारित प्रणाली असल्यामुळे ह्या मध्ये माउस आणि ग्राफिक्सचा वापर केला जात नव्हता. यामध्ये असलेल्या फाइल्सची यादी बघू शकतो आणि आपल्या संगणकामध्ये किती जागा आहे ह्याची पण माहिती मिळते. नवीन फाइल बनवणे, डिलीट करणे, फाइलचे नाव बदलवणे हे काम अगदी सहजपणे केले जात होते. या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एका वेळेस एकच काम करू शकतो. डॉस हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील दुवा आहे. ह्यामध्ये सर्वात अगोदर परिचालन प्रणाली मेमरीमध्ये भारित (लोड) करणे खूप गरजेचे असते. ह्या प्रणालीमध्ये संगणकाला अशा कमांड दिल्या जातात की, त्या अगदी सहनजरीत्या समजतील. ह्या कंमान्ड्सला हार्डडिस्क मध्ये साठवल्या जातात आणि नंतर हार्डडिस्क मधून मेमरी मध्ये लोड केल्या जातात.

डॉसच्या खालील कमांड्स आहेत :

  • CD    : डीरेक्टरीला बदलण्यासाठी
  • Dir    : डीरेक्टरीमधील यादी दाखवण्यासाठी
  • Copy : फाइल कॉपी करण्यासाठी
  • Edit   : फाइलमध्ये बदल करण्यासाठी
  • Move : फाइलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी
  • Ren    :  फाइलचे नाव बदलण्यासाठी
  • Del     : फाइल काढून टाकण्यासाठी
  • Cls      : स्क्रीन क्लिअर करण्यासाठी
  • Format : डिस्कला फॉरमॅट करण्यासाठी

एसएस-डॉस (मायक्रोसॉफ्ट-डिस्क ऑपरेटिंग सिस्टम; MS-DOS)

मायक्रोसॉफ्ट कंपनीने १९८१ मध्ये डॉसला विकत घेतले. मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टमचे संक्षिप्त नाव एमएम-डॉस हे आहे. एमएम-डॉस हे x86- डीओएसचे पुनर्निमित रूप होय. ही परिचालन प्रणाली x86- आधारित असून त्याचा वापर वैयक्तिक संगणकासाठी केला जातो. एमएस-डॉस 1980 आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीस आयबीएम-पीसी सुसंगत वैयक्तिक संगणकांसाठी मुख्य परिचालन प्रणाली होती. सुरुवातीला एमएस-डॉसचा वापर संगणक हार्डवेअरवर चालणाऱ्या इंटेल-8086 प्रोसेसरवर करण्यात आला. एका वर्षाच्या आत मायक्रोसॉफ्टने एमएस-डॉस वर 70 पेक्षा जास्त कंपन्यांना परवाना दिला. ते एक परिचालन प्रणाली बनण्यासाठी आरेखित करण्यात आले होते जे 8086-फॅमिली संगणकावर चालू शकेल, प्रत्येक संगणकामध्ये स्वतःचे वेगळे हार्डवेअर आणि एमएस-डॉसची स्वत:ची आवृत्ती असेल जी सीपी/एमसाठी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीसारखीच असते आणि एमएस-डॉस सह वेगवेगळ्या हार्डवेअर प्लॅटफॉर्मसाठी सीपी/एम म्हणून समान व्यासपीठ करते. एमएस-डॉसमध्ये वापरकर्ता कुठलेही कार्य समाप्त करण्यासाठी जो आदेश देतो त्याला कमांड असं मानतात. ह्यामध्ये प्रत्येक कमांड देण्यासाठी आदेश दिला जातो, वापरकर्ता आपल्या आवश्यकतेनुसार त्या कमांडचा  उपयोग करतात. कमांडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

1. इंटरनल कमांड – अंतर्गत आदेश – (Internal Commands) – इंटरनल कमांडमध्ये फाइल किंवा डीरेक्टरीवर मूलभूत प्रक्रिया करण्यासाठी वापर केला जातो. ह्या कमांड्स Command.com नावाने साठविल्या जातात. त्यामुळे पुन्हा ह्या कमांड चालवण्यासाटी वेगळ्या फाइल्सची आवश्यकता भासत नाही . उदा.,  cls, dir, Date, Time, ver, Copycon.

2. एक्सटर्नल कमांड – बाह्य आदेश – (External Commands) – एक्‍सटर्नल कमांड हे Command.com ने साठवता येत नाही, ती वेगळ्या फाइलमध्ये साठवण्यात येतात आणि ती फाइल जर प्रणालीमध्ये असेल तरच तिचा वापर होऊ शकतो. उदा., chkdsk, diskcopy, format, label , scandisk.

पर्सनल कम्प्युटर – डिस्क ऑपरेटिंग सिस्टम (PC-DOS)

(आयबीएम पीसी-डॉस). 1970च्या दशकात वैयक्तिक संगणकाचा शोध लावला, आयबीएमकडे वेगळा आणि असंबंधित डॉस (डिस्क ऑपरेटिंग सिस्टम) होता, जो लहान व्यावसायिक संगणकावर चालणारा होता. आयबीएमच्या व्हीएसई (Virtual Storage Extended) परिचालन प्रणालीची जागा घेण्यात आली. पीसी-डॉस वैयक्त‍िक संगणकामध्ये वापरली जाणारी प्रथम व्यापकरीत्या स्थापित केलेली परिचालन प्रणाली होती. आयबीएमसाठी बिल गेट्स आणि त्याच्या नवे मायक्रोसॉफ्ट कॉर्पो.ने आयबीएम पीसीच्या पहिल्या ओळींमध्ये इन्स्टॉलेशनसाठी विकसित केले होते. गेट्सने एमएस-डॉस नामक परिचालन प्रणालीची जवळजवळ एकसारखी आवृत्ती तयार केली. डॉस प्रणालीतील बहुतेक वापरकर्त्यांनी सहसा त्यांच्या प्रणालीला केवळ डीओएस म्हणून संदर्भित केले आहे.  एमएस-डॉसप्रमाणे, पीसी-डॉस एक नॉन-ग्राफिकल, लाइन-ओरिएंटेड कमांड-संचालित परिचालन प्रणाली होती, तुलनेने सोप्या इंटरफेससह परंतु जास्त “अनुकूल” वापरकर्ता इंटरफेस नव्हते. कमांड प्रविष्ट करण्यासाठी त्याचा प्रॉम्प्ट असे दिसते, प्रथम मायक्रोसॉफ्ट विंडोज परिचालन प्रणाली खरोखरच एक ऍप्लिकेशन होते जे एमएस-डॉस परिचालन प्रणालीवर होते. आज विंडोज परिचालन प्रणालीचे अनुकरण करून खास उद्देशांसाठी डॉसचे समर्थन करत आहेत.

पीसी-डॉसच्या खालीलप्रमाणे आवृत्त्या आहेत :

 • पीसी-डॉस 1.x
 • पीसी-डॉस  2.x
 • पीसी-डॉस  3.x
 • पीसी-डॉस 4.x
 • पीसी-डॉस 5
 • पीसी-डॉस 6.1
 • पीसी-डॉस 7
 • पीसी-डॉस 2000
 • पीसी-डॉस 7.1

कळीचे शब्द : #परिचालनप्रणाली #मायक्रोसॉफ्ट #पीसीडॉस #कमांड #हार्डवेअर #सॉफ्टवेअर

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख