(विंडोज; विंडोज ओएस; विंडोज परिचालन प्रणाली). मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनद्वारे वैयक्तिक संगणकावर चालविण्याकरिता विकसित केलेली संगणक परिचालन प्रणाली. आयबीएमच्या वैयक्त‍िक संगणकाशी मिळता जुळता वापरकर्ता आंतरपृष्ठ आलेखिकी (graphical user interface; GUI; जीयूआय) च्या वैशिष्ट्यांसह असलेला विंडोज परिचालन प्रणालीने वैयक्तिक संगणक विश्वात लवकरच अधिराज्य मिळविले. सुमारे 90 टक्के वैयक्तिक संगणकावर विंडोजच्या आवृत्त‌्या कार्यरत असतात. विंडोजची पहिली आवृत्ती १९८५ साली तयार करण्यात आली आणि ती फक्त मायक्रोसॉफ्टच्या विद्यमान डिस्क परिचालन प्रणाली किंवा एम-एसडॉस यांना जीयूआय प्रदान करणारे विस्तारित रूप होते.

इतिहास : नोव्हेंबर १९८३ मध्ये ॲपल लिसा “विंडोज” या नावाने घोषित करण्यात आले होते, परंतु नोव्हेंबर १९९५ पर्यंत विंडोज १.० प्रकाशित करण्यात आले नाही. विंडोस १.०ची ॲपलच्या परिचालन प्रणालीशी स्पर्धा झाली, परंतु  त्यात विंडोज १.० हिच लोकप्रिय ठरली. विंडोज १.० संपूर्ण परिचालन प्रणाली नाही; त्याऐवजी, ते एमएस-डॉस (MS-DOS) चे विस्तृत स्वरूप आहे.

डिसेंबर १९८७ मध्ये विंडोज २.० प्रकाशित करण्यात आले आणि विंडोज २.० हे पूर्ववर्ती पेक्षाही अधिक लोकप्रिय ठरले. यात वापरकर्ता आंतरपृष्ठ आलेखिकी आणि स्मृती व्यवस्थामध्ये अनेक सुधारणा केल्या गेल्या.

विंडोज २.१ : हे दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झाले : विंडोज/२८६ आणि विंडोज/३८६. विंडोज/३८६ने इंटेल ८०३८६च्या आभासी पद्धतीचा वापर केला आहे, ज्यामुळे अनेक डॉस आज्ञावली आणि पॅकेज हे विस्तारित स्मृती अनुकरण करण्यासाठी किंवा उपलब्ध स्मृतीची प्रतिकृती तयार करण्यासाठी आखलेले आहेत.

विंडोज ३.x : १९९० मध्ये प्रकाशित विंडोज ३.० ने सर्वसाधारण रचना सुधारित केले, कारण बहुतेक आभासी स्मृती आणि भर टाकण्यायोग्य आभासी डिव्हाइस ड्राइव्हर्स (VxDs) असल्यामुळे विंडोजने बहुकार्य केलेल्या डॉसमध्ये अनियंत्रित साधने सामायिक करण्याची परवानगी दिली. १ मार्च १९९२रोजी विंडोज ३.१ सर्वसाधारणपणे उपलब्ध केले गेले. ऑगस्ट १९९३ मध्ये, विंडोजसाठी कार्यसमूह, एकात्मिक सहकारी (Peer to Peer) एकमेकांशी जोडलेल्या वैशिष्ट्यांसह ३.११ आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. हे विंडोज ३.१ सोबत विकले गेले. विंडोज ३.१ साठीचे समर्थन ३१ डिसेंबर, २००१ रोजी समाप्त झाले.

विंडोज ९.x : ग्राहक-आधारित विंडोज २४ ऑगस्ट १९९५ रोजी विंडोज-९५ म्हणून प्रसिद्ध करण्यात आले. एमएस-डॉस-आधारित उर्वरित असताना, विंडोज-९५ने मुळ ३२-बिट अनुप्रयोग, जोडा व वापरा हार्डवेअर, प्री-एम्पटीव बहुकार्य (Preemptive Multitasking), २५५ वर्णांपर्यंतचे फाइलचे नाव आणि पूर्ववर्ती वरील वाढीव स्थिरता प्रदान केली. विंडोज-९८ २५ जून १९९८ रोजी प्रसिद्ध झाले, ज्याने विंडोज ड्रायव्हर नमुना, यूएसबी (USB) संयुक्त डिव्हाइसेससाठी समर्थन, ACPI निष्क्रियता आणि मल्टि-मॉनिटर संरचनासाठी समर्थन पुरविले.

विंडोज-एनटी : विंडोज-एनटी मायक्रोसॉफ्टद्वारे उत्पादित परिचालन प्रणाली कुटुंब आहे, जिची पहिली आवृत्ती जुलै १९९३ मध्ये प्रकाशित झाली. हि प्रोसेसर-स्वतंत्र, बहुविध प्रक्रिया व बहु-वापरकर्ता परिचालन प्रणाली आहे. विंडोज-एनटीची पहिली आवृत्ती विंडोज-एनटी-३.१ होती आणि वर्कस्टेशन्स (Workstation; कार्यथांबे) आणि सर्व्हर (Server) संगणकसाठी उत्पादित करण्यात आले होते. विंडोस-एनटी हि ‘सी’ आणि ‘सी++’ याभाषेंमध्ये लिहिली गेली, तसेच थोड्या प्रमाणात संमीलित भाषा (assemble language) देखील वापरली गेली.

विंडोज ७ : विंडोज-७ ही एक वैयक्तिक संगणक परिचालन प्रणाली आहे, जी मायक्रोसॉफ्टने विंडोज-एनटीच्या परिचालन प्रणालीचा भाग म्हणून उत्पादित केली होती. ही २२ जुलै २००९ रोजी उत्पादनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आणि साधारणतः २२ ऑक्टोबर २००९ रोजी उपलब्ध झाली. ही विंडोज ७च्या नवीन वैशिष्ट्यांमध्ये हस्तलेखन ओळख, आभासी हार्ड डिस्कसाठी समर्थन, बहु-गाभीय (Multi-Core) प्रोसेसरमध्ये सुधारित कार्यक्षमता, सुधारित बूटिंग कार्यप्रदर्शन, थेट प्रवेश आणि कर्नल सुधारणा यांचा समावेश आहे.

विंडोज-८व -८.१ : विंडोज-७ ची उत्तराधिकारी विंडोज-८ ही सर्वसाधारणपणे २६ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाली. विंडोज इंटरफेसच्या सुरूवातीस विंडोज-८ वर अनेक महत्त्वपूर्ण बदल केले गेले. इतर बदलांमध्ये क्लाउड सेवा आणि इतर ऑनलाइन मंचसह वाढीव एकत्रीकरण समाविष्ट आहे.

विंडोज-१० : ३० सप्टेंबर २०१४ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज-१० ची विंडोज-८.१ची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. २९ जुलै २०१५ रोजी ती प्रकाशित झाली. बदलांमध्ये सुरुवात मेनूची परतफेड, आभासी डेस्कटॉप प्रणाली आणि डेस्कटॉपवर विंडोज संग्रह ॲप्स चालविण्याची क्षमता समाविष्ट आहे.

संदर्भ :

समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर